टीम मंगळवेढा टाईम्स।
दामाजी एक्सप्रेस सामाजिक बांधिलकी जपत तळागळापर्यंत जावून काम करणारे वृत्तपत्र आहे.पत्रकारिता करत असताना समरस होऊन काम केले तर त्यामध्ये उज्ज्वल यश मिळते.
याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे दै दामाजी एक्सप्रेस होय. दै दामाजी एक्सप्रेसने पत्रकारितेत गेल्या 13 वर्षांपासून आपल्या लेखणीव्दारे समाजकारणात वेगळा ठसा उमटविला असून निःस्वार्थ भावनेने काम केले आहे असे प्रतिपादन माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी केले.
दै दामाजी एक्सप्रेस पंढरपूर विभागीय कार्यालय 7 व्या वर्धापन दिनानिमित्त रखुमाई सभागृह पोलिस संकुल पंढरपूर आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी जि.प.सदस्य वसंतनाना देशमुख होते तर व्यासपीठावर विठ्ठल शुगर्सचे चेअरमन अभिजीत पाटील,स्वेरीचे संस्थापक डॉ.बी.पी.रोंगे,उध्दव ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख संभाजीराजे शिंदे,
शिंदे गटाचे सोलापूर लोकसभा मतदार संघाचे संपर्क प्रमुख महेश साठे, मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अर्जुन चव्हाण,संभाजी ब्रिगेडचे किरणराज घाडगे,वंचित बहुजन आघाडीचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष अरूणभाऊ कोळी,
अभियंता संघटनेचे जिल्हाध्यक्ष पंडीत भोसले,सामाजिक कार्यकर्ते डॉ.सर्जेराव सावंत, कायदे सल्लागार अॅड.अखिलेश वेळापुरे,अ.भा.म.नाटय नियामक मंडळाचे माजी सदस्य दिलीप कोरके,
बी.एस.एन.एलचे उपमंडल अभियंता सतीश काळुंगे,काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष हणुमंत मोरे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुधीर भोसले,संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष दत्ता ताड, मंगळवेढयाचे नगरसेवक प्रविण खवतोडे, संपादक दिगंबर भगरे आदी उपस्थित होते.
प्रशांत परिचारक म्हणाले, दै दामाजी एक्सप्रेस 13 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात यशस्वी वाटचाल करत आपल्या लेखणीच्या माध्यमातून आपली एक स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.
लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून आपली जबाबदारी आणि कर्तव्ये योग्य प्रकारे पार पाडत सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आवाज उठविण्याचे काम करण्याबरोबरच विविध सामाजिक उपक्रमात दामाजी एक्सप्रेस चा हिरीरीने सहभाग असतो.
आपण ज्या समाजात वावरतो त्या समाजाचे काहीतरी देणं लागतो ही भावना जपत त्यांनी आजवर विविध सामाजिक उपक्रमात सक्रिय योगदान दिले आहे.
सत्य व वास्तव आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी तसेच महिला, बेरोजगार युवक, गोरगरीब आणि उपेक्षितांचा आवाज बुलंद करण्यासाठी लेखणीच्या माध्यमातून सकारात्मक पत्रकारिता करत आहेत.
दै दामाजी एक्सप्रेस चे पत्रकारितेतील कार्य असेच निरंतर चालू राहो या शुभेच्छा देत मनोगत व्यक्त केले.
अध्यक्ष स्थानावरून बोलताना वसंतनाना देशमुख म्हणाले, दामाजी एक्सप्रेसने पत्रकारिता जिल्ह्यात पोहचवली.त्यामुळे आज दै दामाजी एक्सप्रेस ची वेगळी ओळख निर्माण झाली आहे.
स्थानिक प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम दै दामाजी एक्सप्रेस ने नेहमीच केले आहे .पुरस्कार निवड योग्य असून पुरस्कार प्राप्त लोकांना एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे.दै दामाजी एक्सप्रेस चे कार्य कौतुकास्पद असून असेच कार्य निरंतर राहो या शुभेच्छा देत मनोगत व्यक्त केले.
यावेळी अभिजित पाटील,संभाजी शिंदे,महेश साठे व अरूणभाऊ कोळी यांनीही आपल्या मनोगतातून शुभेच्छा दिल्या.
नागेश फाटे,दिलीप धोत्रे,निशिकांत प्रचंडराव,डॉ.विजयालक्ष्मी हिरवे,शिवाजीराव शिंदे,बाळासाहेब शिंगाडे,दिलीप कोरके,संजय ननवरे,मुझम्मील कमलीवाले,संग्राम जाधव,अखिल भारतीय कोळी महासंघ,पंढरपूर,नादब्रह्म कला फौंडेशन,करकंब आदींना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
सुरवातीस श्री.विठ्ठल मुर्तीचे पूजन प्रशांत परिचारक यांचे हस्ते करण्यात आले.तर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.
या कार्यक्रमात सूरसंगम ग्रुपचे लहू ढगे,संतोष ढावरे,नवनाथ सावळे,निशिकांत प्रचंडराव,अनिल गायकवाड,अजय सरवदे आदिंनी हिंदी व मराठी गीते कराओके टॅ्रकवर सादर केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेंद्रकुमार जाधव यांनी केले.अध्यक्षीय सूचना महेश वठारे यांनी मांडली त्यास अनुमोदन वासुदेव जोशी यांनी दिले. सूत्रसंचालन संतोष मिसाळ यांनी केले तर उपस्थित मान्यवरांचे आभार पंढरपूर विभागीय कार्यालयाचे प्रमुख अविनाश साळुंखे यांनी मानले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज