टीम मंगळवेढा टाईम्स । महाराष्ट्रात कोरोनाने थैमान घातले आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. उस्मानाबादमध्ये रोज नवनवीन आदेश काढण्यामुळे चर्चेत असणाऱ्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी आणखी एक नवा आदेश काढला असून त्यामुळे नाराजी व्यक्त केली जात आहे.
आजपासून जिल्ह्यातील दुकाने 9 ते 3 पर्यंतच सुरू राहणार असल्याचा आदेश जिल्हाधिकारी दीपा मुंडे यांनी काढला आहे. जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार, आता सकाळी 9 ते 7 पर्यंत सुरू असणारी दुकाने आता 9 ते 3 या वेळेत सुरू राहणार आहे. यात प्रामुख्याने अत्यावश्यक सेवा पुरवणारे दुकाने ही आता 3 पर्यंत सुरू ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर 3 च्या नंतर फिरण्यास ही बंदी घालण्यात आली आहे.
रुग्णसंख्या वाढत असल्याचे कारण देत हा आदेश काढला असून अत्यावश्यक सेवा सुविधा असतील किंवा मार्केट बाबत जो जिल्हाधिकारी यांनी निर्णय घेतला आहे, त्याबद्दल अनेक व्यापारी आणि नागरिकांना नाराजी व्यक्त केली आहे.
रुग्णसंख्या वाढत असेल तर आरोग्य सेवा पुरवणाऱ्या मार्केटच्या वेळेत बदल करून नागरिक व सामान्य माणसाचे हाल करू नये, अशी व्यथा व्यापाऱ्यांनी मांडली आहे.
New order of lockdown in Osmanabad, excitement among traders and citizens
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज