टीम मंगळवेढा टाईम्स।
कर्नाटकातून सांगोलाकडे अवैध गुटखा वाहतूक करण्या-या वाहनावर मंगळवेढा पोलिसांनी केलेल्या कारवाईत पीकअपसह 26 लाख 32 हजार 200 रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला.
याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. पंधरा दिवसात गुटख्यावरील पोलिसांची दुसरी मोठी कारवाई ठरली. तरीही गुटखा बंदी असताना गुटखा वाहतूकीचे सत्र काही केल्या थांबेना.
याबाबत पोलिस सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, 15 फेब्रुवारी रोजी पो. नि. रणजित माने यांना चडचण (कर्नाटक ) येथून एक अशोक लेलंड कंपनीची वाहनामधून गुटखा महमदाबाद येथील ओढयातील कच्च्या रस्त्यावरून अवैधरित्या गुटखा येणार आहे.
अशी बातमी मिळाल्यानंतर पो. नि. रणजीत माने, परि. पोसई पुरूषोत्तम धापटे सो, पोहेकॉ महेश कोळी, पोकॉ मळसिध्द कोळी, पोकॉ अजित मिसाळ, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाकडील पोकॉ प्रशांत चव्हाण असे पथक तात्काळ खाजगी वाहनाने रवाना झाले.
महमदाबाद ता. मंगळवेढा येथील ओढयातील कच्च्यारोडवर 6.45 वा. चे सुमारास समोरून एक अशोक लेलंड कंपनीचे वाहन एम. एच ४५ ए. एफ. ३७७१ आले त्यावेळी आम्ही सदर वाहन थांबविले त्यामध्ये एक चालक होता.
चौकशीअंती बाजीराव विष्णु बाबर (वय ३८ वर्षे रा. मु.पो आलेगांव ता. सांगोला) असे नाव सांगितले. वाहनाच्या हौदयात काय आहे असे विचारले असता तो उडवा उडवीची उत्तरे देत असल्याने आम्ही त्यांना विश्वासात घेवून चौकशी केली असता त्यांनी सदर वाहनाच्या हौदयात गुटखा असल्याचे सांगितले.
सदर गुटखा माल व वाहन हे कोणाचे मालकीचे आहे असे विचारले असता त्याने सदरचा गुटखा हा दिलीप रामचंद्र मस्के (रा. मस्के कॉलनी सांगोला ता. सांगोला) असे असल्याचे सांगितले.
सदर गुटखा श्रीशैल उर्फ अप्पु कलमनी रा. चडचण, ता. चडचण, जि. विजापूर याच्याकडून आणल्याचे सांगत आहे.
वाहनात 8 लाख 73 हजार 600 विमल पान मासालाचे 7280 पाऊच प्रत्येक पाऊचची किंमत 120 रूपये प्रमाणे 2 लाख 18 हजार 400 व्ही- 1 तंबाखुचे 7280 पाऊच प्रत्येक पाऊचची किंमत 30 रूपये प्रमाणे.
2 लाख 44 हजार 800 रू सुपर पान मसालाचे 2040 पाऊच प्रत्येक पाऊचचे किंमत 120 रूपये प्रमाणे 30 हजार 600 नचमत 999 चे तंबाखुचे पाऊच प्रत्येक पाउचचे किंमत 15 रुपये प्रमाणे
2 लाख 40 हजार 600 त्यात आर. एम. डी पान मसालाचे 320 पाऊच प्रत्येक पाऊचची किंमत 780 रूपये 1लाख 15 हजार 200 एम सेंटेंट तंबाखुचे 320 पाऊच प्रत्येक पाऊचची किंमत 360 रूपये प्रमाणे 9 लाख किंमतीचे चारचाकी अशोक लेलंड कंपनीचे वाहन असा 26 लाख 32 हजार 200 मुद्देमाल मिळून आला. याप्रकरणी वाहन चालक, गुटखा खरेदी व विक्रेता यासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. राज्यात गुटखा बंदी असताना वारंवार गुटखा सापडत असताना अन्न भेसळ खाते याकडे सोयीस्कररित्या त्या दुर्लक्ष करत आहे त्यांनी देखील कारवाईची मोहीम तीव्र करण्याची गरज आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज