टीम मंगळवेढा टाईम्स ।
सोलापूर जिल्ह्यातील २२ ग्रामपंचायतींनी पंधराव्या वित्त आयोगातील विकास निधी वेळेत खर्च केला नाही.
यामुळे या बावीस ग्रामपंचायतींचे सरपंच, ग्रामसेवक यांच्यासह पंचायत समितीच्या नऊ गटविकास अधिकाऱ्यांवर कारवाईचा प्रस्ताव मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्याकडे देण्यात येणार आहे,
अशी माहिती जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे यांनी दिली.
यापूर्वीच शून्य व पन्नास टक्क्यांच्या आत खर्च असणाऱ्या ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामसेवक व पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना ग्रामपंचायत प्रशासन विभागाच्यावतीने नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
येत्या १३ डिसेंबर रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी स्वामी हे सहविचार सभा घेणार आहेत.
पंधराव्या वित्त आयोगाच्या निधी खर्चावरून जिल्हा परिषद ग्रामपंचायत प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे. निधी खर्चात मागे राहिलेल्या जिल्ह्यातील गटविकास अधिकारी, सरपंच व ग्रामसेवक यांच्यावर कारवाई होणार आहे.
जिल्ह्यातील काही ग्रामपंचायतींचा खर्च शून्य तर काही ग्रामपंचायतींचा खर्च ५० टक्क्यांच्या आत आहे. खर्च न करणाऱ्या ग्रामसेवक, सरपंच व गटविकास अधिकाऱ्यांसंदर्भात कारवाईचा निर्णय घेण्यात येणार असल्याचेही शेळकंदे यांनी सांगितले.
दि.१३ डिसेंबर रोजी होणाऱ्या सहविचार सभेत मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी हे कारवाई संदर्भात निर्णय घेतील.(स्रोत:लोकमत)
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज