mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

खोटा बेबाकी दाखला तयार करून पतसंस्थेची 20 लाखांची फसवणूक; कर्जदारासह तलाठी, मंडलाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
December 7, 2022
in क्राईम, सोलापूर
सोलापूर जिल्ह्यातील शासकीय कार्यालयात आता प्रतिज्ञापत्रासाठी स्टॅम्प पेपरची आवश्यक नसणार

टीम मंगळवेढा टाईम्स। 

पतसंस्थेचे कर्जापोटी जमीन गहाण असलेली सात बारा उताऱ्यावरील नोंद बनावट कागदपत्रांच्या आधारे कमी करून पतसंस्थेची २० लाख ३४ हजार ३६० रुपयांची फसवणूक केली.

याप्रकरणी कर्जदारासह गुरसाळेचे तलाठी आणि मंडलाधिकारी यांच्या विरोधात पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

कर्जदार शालिवाहन भागवत कोळेकर, सहकर्जदार विजया शालिवाहन कोळेकर, विष्णू सदाशिव फडतरे, मंडलाधिकारी बाळू चंद्रकांत औसेकर, रतिलाल वाघमारे, सीताराम निंबाळकर ही सशयित आरोपींची नावे आहेत.

तुंगत ता. पंढरपूर येथील कर्मयोयी सु. रा.परिचारक पतसंस्थेचे जनरल मॅनेजर दिगंबर नरहरी शिंदे यांनी पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली आहे.

पतसंस्थेच्या पंढरपूर शाखेतून २ डिसेंबर २०१० रोजी शालिवाहन भागवत कोळेकर यांनी ६ लाख ५० हजार रुपये जमीन तारण कर्ज घेतले होते.

या कर्जासाठी शालिवाहन कोळेकर यांनी स्वताची गुरसाळे ता. पंढरपूर येथील १४ एकर २५ गुंठे जमीन गहाण ठेवली. विजया शालिवाहन कोळेकर यांना सहकर्जदार होत्या. मुदतीत कर्ज फेड झाली नाही.

३१ मार्च २०१८ अखेर या कर्जाची एकूण रक्कम २० लाख ३४ हजार ३६० रुपये झाली. २०१३ला जिल्हा सहकारी न्यायालयात संस्थेने कर्ज वसुलीचा दावा दाखल केल्यावर या संदर्भात सदर जमिन विक्री अथवा हस्तांतरणास कोर्टाने मनाई केली होती.

अशी झाली पतसंस्थेची फसवणूक

कर्जदार शालिवाहन भागवत कोळेकर यांच्यासह यांनी संस्थेचे कर्ज नसल्याचा बनावट बेबाकी दाखला खोटे प्रमाण पत्र खोटे शिक्के वापरून तयार केले होते.

गाव कामगार तलाठी विष्णू सदाशिव फडतरे, मंडलाधिकारी बाळू चंद्रकांत औसेकर, गावातील रतिलाल वाघमारे आणि सीताराम निंबाळकर यांच्या मदतीने बोजा निम्मी करून तसा पंचनामा तयार केला होता.

यासंदर्भात संस्थेला माहिती होताच कर्मयोयी सु. रा. परिचारक पतसंस्थेचे जनरल मॅनेजर दिगंबर नरहरी शिंदे यांनी पंढरपूर तालुका पोलीसात फिर्याद दिली.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: फसवणूक

संबंधित बातम्या

न्यूरोसर्जन डॉ.शिरीष वळसंगकर प्रकरणाला वेगळं वळण; आरोपी महिलेच्या वकिलाचा मोठा खुलासा

खुनाचा प्रयत्न प्रकरणातून आरोपीची मुक्तता; मंगळवेढ्यात ॲड.ओंकार भुसे यांच्या न्यायालयीन कौशल्याची चर्चा

July 14, 2026

निवडणूक कामात हलगर्जीपणा; सोलापूर जिल्ह्यातील शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल; दिलेले काम मुदतीत केले नसल्याचा ठेवला ठपका

July 14, 2026
धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

भयंकर! लग्नामध्ये सत्कारात नाव पुकारला नाही, रागाच्या भरात तलाठ्यानं तरुणाच्या डोक्यात टाकला लोखंडी माईक

July 14, 2026
विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षांसाठी वीजपुरवठा सुरळीत ठेवा

कर्नाटकात ८ तास, महाराष्ट्रात फक्त २ तास वीज? भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांचा आक्रोश; शेती धोक्यात; आम्हाला कर्नाटकात जाऊ द्या; शेतकऱ्यांचा सरकारला थेट इशारा

July 12, 2026
जिल्हा दूध संघ अध्यक्ष निवडीची बैठक ‘या’ महिन्यात; आज सर्वच संचालक गैरहजर

तुकाराम मुंडे पॅटर्नचा सांगोल्यात थरकाप! ग्राहकांच्या जिवाशी खेळणारे रॅकेट रडारवर; १५ लाखांचे ३७ हजार लिटर भेसळयुक्त दूध ओतले गटारात

July 12, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

कागदपत्रे बनावट, विद्यार्थीही खोटे! सोलापुरात केंद्र सरकारच्या योजनेत मोठा गैरव्यवहार; बनावट विद्यार्थी दाखवून केंद्राची शिष्यवृत्ती लाटली

July 11, 2026
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

बँकेचे पैसे बुडवणे भोवले! धनश्री मल्टीस्टेटची आक्रमक वसुली; कारखान्याच्या माजी संचालकाची थेट तुरुंगात रवानगी; न्यायालयाचा मोठा दणका

July 10, 2026
Transfer! मंगळवेढा पोलिस ठाण्याकडील ‘या’ पोलिस कर्मचार्‍यांच्या अन्यत्र बदल्या; नवीन ‘हे’ आले

मंगळवेढ्यात बुलेट राजांना दणका! पोलिसांची धडक कारवाई; मॉडिफाईड सायलेन्सर अन् विना नंबर प्लेटच्या ‘या’ वाहनांवर ‘ॲक्शन’

July 10, 2026
खळबळ! मंगळवेढा तालुक्यात पंतप्रधान किसान सन्मान योजनेत तब्बल २ हजार ६०० बोगस लाभार्थी

पुनर्वसनाच्या जमिनीवर डोळा! जमीन तुमची, आधार कार्ड खोटे अन् अंगठा दुसऱ्याचाच; मंगळवेढ्यात उजनी जमीन घोटाळ्याचा थरार, वाचून थक्क व्हाल; एजंट मालामाल

July 10, 2026
Next Post
पवार साहेब तुम्हीच न्याय मिळवून द्या! विठ्ठल कारखान्याच्या ऊस बिलासाठी शेतकऱ्याचा बेमुदत उपोषणाचा इशारा

दिलदार चेअरमन! 'विठ्ठल'च्या कामगारांच्या वारसांना 'एवढ्या' लाखांची केली आर्थिक मदत; अभिजित पाटील यांनी केले 'हे' आवाहन

ताज्या बातम्या

न्यूरोसर्जन डॉ.शिरीष वळसंगकर प्रकरणाला वेगळं वळण; आरोपी महिलेच्या वकिलाचा मोठा खुलासा

खुनाचा प्रयत्न प्रकरणातून आरोपीची मुक्तता; मंगळवेढ्यात ॲड.ओंकार भुसे यांच्या न्यायालयीन कौशल्याची चर्चा

July 14, 2026
पावसाचा कहर! उजनीतून दीड लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग, भीमाकाठी सावधानतेचा इशारा 

शेतकऱ्यांना दिलासा द्या, उजनी धरणातून पाणी सोडा; मंगळवेढ्यातून प्रा.शिवाजीराव काळुंगे यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे

July 14, 2026

निवडणूक कामात हलगर्जीपणा; सोलापूर जिल्ह्यातील शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल; दिलेले काम मुदतीत केले नसल्याचा ठेवला ठपका

July 14, 2026
धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

भयंकर! लग्नामध्ये सत्कारात नाव पुकारला नाही, रागाच्या भरात तलाठ्यानं तरुणाच्या डोक्यात टाकला लोखंडी माईक

July 14, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

भेसळीच्या विळख्यातून महाराष्ट्राला वाचवण्यासाठी तुकाराम मुंढेंचा ‘हा’ मास्टरप्लॅन; नागरिकांना केली मोठी विनंती

July 14, 2026
शिक्षक बँकेवर ‘गुरुजीं’चा डंका! शिवाजी पाटील गुरुजी व गुलाबराव पाटील यांच्या निवडीनंतर मुंढेवाडीत जल्लोष, भव्य नागरी सत्कार संपन्न

शिक्षक बँकेवर ‘गुरुजीं’चा डंका! शिवाजी पाटील गुरुजी व गुलाबराव पाटील यांच्या निवडीनंतर मुंढेवाडीत जल्लोष, भव्य नागरी सत्कार संपन्न

July 13, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा