mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

माणगंगा परिवार अर्बन बँक ही मंगळवेढेकरांचा विश्वास संपादन करून नावलौकिक मिळवेल; आ.समाधान आवताडे

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
November 16, 2022
in मंगळवेढा
माणगंगा परिवार अर्बन बँक ही मंगळवेढेकरांचा विश्वास संपादन करून नावलौकिक मिळवेल; आ.समाधान आवताडे

टीम मंगळवेढा टाईम्स ।

मंगळवेढयात माणगंगा परिवार नवखा असला तरी चांगले काम करून इथल्या लोकांचा विश्वास संपादन केल्यास हा परिवार एक अग्रगण्य परिवार म्हणून नावलौकिक मिळवेल अशा सदिच्छा आ.समाधान आवताडे यांनी व्यक्त केल्या.

मंगळवेढा येथील काशिद बिल्डींगमध्ये नव्याने सुरु झालेल्या माणगंगा अर्बन परिवार को-ऑप क्रेडीट सोसायटीचा शुभारंभ प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.अध्यक्षस्थानी राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष दिपकआबा साळुंखे पाटील होते.

आ.समाधान आवताडे पुढे बोलताना म्हणाले की, मंगळवेढा येथील धनश्री परिवार व यशोदा पतसंस्थेने सहकार क्षेत्रात चांगले काम करून लोकांचा विश्वास प्राप्त केला आहे असा विश्वास माणगंगा परिवारानेदेखील संपादन करावा.

इथली जनता भोळीभाबडी असली तरी प्रेमळ आहे, तुम्ही जनतेला जेवढे प्रेम दयाल त्यापेक्षा दुप्पट प्रेम जनता तुम्हाला देईल. सर्व सहकाऱ्यांच्या जोरावर हा परिवार भविष्यात निश्चितच भरारी घेईल.

माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील बोलताना म्हणाले की, सांगोल्यात दूध चळवळीत माणगंगा परिवाराचे योगदान मोठे आहे. मंगळवेढयातही त्यांनी दुध प्रकल्प सुरु करावा हॅटसनसारखा मोठा प्रकल्प परराज्यात गेला आहे.

मोठमोठे प्रकल्प आल्यास स्थानिक गरीब लोकांना रोजगार मिळू शकतो त्यामुळे अशा प्रकल्पांचे जनतेने स्वागत केले पाहिजे.

सांगोल्यातील सहकाऱ्यांनी माणगंगा चळवळ उभारली आहे त्यांची धडपड आहे. आकर्षक व्याजदराला भुलून गुंतवणूक करून अडचणीत येण्यापेक्षा व्याज दर कमी असेल तर चालेल परंतू संस्था चालविणारी माणसे कोण आहेत हे ठेवीदारांनी तपासले पाहिजे.

हे आमदार इथली जनता भोळीभाबडी आहे म्हणूनच समाधान आवताडे झाले . समाधानी लोकांनीच आवताडे यांचे समाधान केल्याचे आपल्या भाषणातून दिपकआबा साळुंखे पाटील यांनी सांगितले.

यावेळी सांगोल्याचे आमदार अॅड . शहाजीबापू पाटील , धनश्री परिवाराचे प्रमुख प्रा . शिवाजीराव काळुंगे यांनीही आपल्या भाषणातून माणगंगा परिवाराला शुभेच्छा दिल्या. सुरुवातीस यशोदा पतसंस्थेच्या संस्थापक चेअरमन निला अटकळे यांच्या हस्ते श्री लक्ष्मीच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर सर्व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.

सुरुवातीस माणगंगा परिवाराचे प्रमुख नितीन इंगोले यांनी प्रास्ताविकातून आपली भूमिका मांडून सर्वांच्या विश्वासास पात्र राहून काम करणार असल्याचे सांगितले.

सुत्रसंचालन भारत मुढे यांनी केले तर संस्थेच्या चेअरमन अर्चना इंगोले यांनी आभार मानले.

या कार्यक्रमास न.पा. पक्षनेते अजीत जगताप , माजी सभापती प्रदिप खांडेकर , माजी नगराध्यक्ष भारत नागणे , दामाजीचे संचालक गोपाळ भगरे , माजी संचालक विजय माने , अभियंता नामदेव काशिद , युवक नेते गुंडादादा खटकळे ,

धनलक्ष्मीचे चेअरमन आकाश पुजारी , शोभाश्रीचे चेअरमन किरण पुजारी , जगन्नाथ रेवे , प्रताप सावंजी , मधुकर भंडगे , विष्णू भुसे , साहेबराव उगाडे , बालाजी दत्तू , प्रकाश जाधव , प्रहारचे तालुकाध्यक्ष समाधान हेंबाडे ,

संस्थेचे व्हा . चेअरमन नितीन खटकाळे, संचालक सचिन इंगोले , सुखदेव रंदवे, विवेक घाडगे , विजय वाघमोडे, धनंजय पवार, संस्थेचे सचिव स्वप्नील काळुंगे, व्यवस्थापक सतीश गायकवाड यांचेसह विविध क्षेत्रातील मान्यवर व संस्थेचे कर्मचारी उपस्थित होते.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: माणगंगा परिवार अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटी

संबंधित बातम्या

अभिनंदनास्पद! तहसीलदार मदन जाधव यांना महसूल विभागातील क्षेत्रीय स्तरावरील ‘उत्कृष्ट अधिकारी’ म्हणून पुरस्कार जाहीर

ज्या टप्प्यावर आता प्रक्रिया थांबली होती, तिथून पुढच्या टप्प्याची निवडणूक प्रकिया राबवली जाणार; मंगळवेढा नगरपालिकेची संपूर्ण निवडणूक प्रक्रिया नव्याने नाही

November 30, 2025
महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका होण्याची परिस्थिती,भाजपच्या ‘या’ बड्या नेत्याचा दावा

मोठी बातमी! मंगळवेढा नगरपालिका निवडणूक नव्याने जाहीर; असा आहे सुधारित वेळापत्रक; उमेदवारांची धाकधूक वाढली

November 30, 2025
राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

‘मंगळवेढा टाईम्स’चे वृत्त तंतोतंत खरं! मंगळवेढा पालिकेची निवडणूक लांबणीवरच; २० डिसेंबरला होणार मतदान; आयोगाचा अधिकृत आदेश जारी; निवडणूक का पुढे गेली? नेमके कारण आले समोर

November 29, 2025
घड्याळ बघा! पांडुरंग शिवाजी नाईकवाडी यांची प्रभाग 9 मध्ये प्रचारात आघाडी; सामाजिक कामाची पोहच पावती मिळणार

घड्याळ बघा! पांडुरंग शिवाजी नाईकवाडी यांची प्रभाग 9 मध्ये प्रचारात आघाडी; सामाजिक कामाची पोहच पावती मिळणार

November 29, 2025
लिहून देते! निवडून आल्यानंतर महिलांच्या हाताला काम, झोपडपट्टी नियमितीकरण, कर्मचाऱ्यांना कायम करणे; उच्चशिक्षित विद्यागौरी अवघडे यांना प्रभाग 3 मधून सर्वसामान्य जनतेचा मोठा प्रतिसाद

लिहून देते! निवडून आल्यानंतर महिलांच्या हाताला काम, झोपडपट्टी नियमितीकरण, कर्मचाऱ्यांना कायम करणे; उच्चशिक्षित विद्यागौरी अवघडे यांना प्रभाग 3 मधून सर्वसामान्य जनतेचा मोठा प्रतिसाद

November 29, 2025
मोहमदमुस्तफा मुलाणी व संध्या कोंडूभैरी यांची प्रभाग 5 मध्ये प्रचारात जोरदार मुसंडी; विकासाचे व्हिजन जनतेसमोर केले जाहीर

मंगळवेढा नगराध्यक्ष निवडणुकीबाबत निवडणूक आयोगाचे दोन आदेश, निवडणूक घेण्याबाबत संभ्रमावस्था; आज निर्णायक आदेश येण्याची शक्यता

November 29, 2025
मी तुम्हाला शब्द देते! नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्यानंतर, शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेला प्रत्येक निर्णय लोककेंद्रित आणि पारदर्शक करणार; सुजाता जगताप

मी तुम्हाला शब्द देते! नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्यानंतर, शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेला प्रत्येक निर्णय लोककेंद्रित आणि पारदर्शक करणार; सुजाता जगताप

November 29, 2025
सौ.प्रीती तेजस सूर्यवंशी यांची प्रचारात आघाडी; प्रभाग क्र.5 मध्ये सूर्यवंशी यांना मतदारांचा जोरदार प्रतिसाद

सौ.प्रीती तेजस सूर्यवंशी यांची प्रचारात आघाडी; प्रभाग क्र.5 मध्ये सूर्यवंशी यांना मतदारांचा जोरदार प्रतिसाद

November 29, 2025
Next Post
मंगळवेढ्याच्या वैभवात भर! उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयाचे आज पालकमंत्र्यांच्या हस्ते उदघाटन

मंगळवेढ्याच्या वैभवात भर! उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयाचे आज पालकमंत्र्यांच्या हस्ते उदघाटन

ताज्या बातम्या

अभिनंदनास्पद! तहसीलदार मदन जाधव यांना महसूल विभागातील क्षेत्रीय स्तरावरील ‘उत्कृष्ट अधिकारी’ म्हणून पुरस्कार जाहीर

ज्या टप्प्यावर आता प्रक्रिया थांबली होती, तिथून पुढच्या टप्प्याची निवडणूक प्रकिया राबवली जाणार; मंगळवेढा नगरपालिकेची संपूर्ण निवडणूक प्रक्रिया नव्याने नाही

November 30, 2025
महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका होण्याची परिस्थिती,भाजपच्या ‘या’ बड्या नेत्याचा दावा

मोठी बातमी! मंगळवेढा नगरपालिका निवडणूक नव्याने जाहीर; असा आहे सुधारित वेळापत्रक; उमेदवारांची धाकधूक वाढली

November 30, 2025
राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

‘मंगळवेढा टाईम्स’चे वृत्त तंतोतंत खरं! मंगळवेढा पालिकेची निवडणूक लांबणीवरच; २० डिसेंबरला होणार मतदान; आयोगाचा अधिकृत आदेश जारी; निवडणूक का पुढे गेली? नेमके कारण आले समोर

November 29, 2025
घड्याळ बघा! पांडुरंग शिवाजी नाईकवाडी यांची प्रभाग 9 मध्ये प्रचारात आघाडी; सामाजिक कामाची पोहच पावती मिळणार

घड्याळ बघा! पांडुरंग शिवाजी नाईकवाडी यांची प्रभाग 9 मध्ये प्रचारात आघाडी; सामाजिक कामाची पोहच पावती मिळणार

November 29, 2025
लिहून देते! निवडून आल्यानंतर महिलांच्या हाताला काम, झोपडपट्टी नियमितीकरण, कर्मचाऱ्यांना कायम करणे; उच्चशिक्षित विद्यागौरी अवघडे यांना प्रभाग 3 मधून सर्वसामान्य जनतेचा मोठा प्रतिसाद

लिहून देते! निवडून आल्यानंतर महिलांच्या हाताला काम, झोपडपट्टी नियमितीकरण, कर्मचाऱ्यांना कायम करणे; उच्चशिक्षित विद्यागौरी अवघडे यांना प्रभाग 3 मधून सर्वसामान्य जनतेचा मोठा प्रतिसाद

November 29, 2025
सर्वात मोठी बातमी! लोकसभा निवडणुकीच्या तारखा ‘या’ दिवशी जाहीर होणार?; निवडणूक आयोगाच्या हालचाली सुरु

जिल्हा परिषद निवडणुका दोन टप्प्यात होण्याची शक्यता; १५ जिल्ह्यांमध्ये निवडणुका प्रथम; सुप्रीम कोर्टाने निवडणुकांना स्थगिती न देता ५० टक्के आरक्षणाची अट कायम ठेवली

November 29, 2025
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..