mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

तरुणांनो सावधान! सोलापुरात लग्नासाठी मुलगी दाखवून दीड लाखाची केली फसवणूक

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
November 11, 2022
in सोलापूर
बंटी और बबली! मंगळवेढ्यात लग्न करून नातेवाईकांकडे आलेल्या नवदांपत्यांने एक लाखांच्या दागिन्यावर मारला डल्ला

टीम मंगळवेढा टाईम्स ।

लग्नाकरिता मुलगी दाखवून त्या बदल्यात दीड लाखापेक्षा अधिक रक्कम उकळून पोबारा करून फसवणूक केल्याप्रकरणी

मुबारक महंमद मुल्ला, धानम्मा बिराजदार, शामल चव्हाण, सुरेखा चव्हाण, सुरेखा पुजारी व महानंदा ( पूर्ण नाव माहित नाही ) यांच्या विरोधात सोलापुरातील एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

यातील तक्रारदार बाळासाहेब रमेश मोरे (वय २७ , रा . जळकेवाडी , ता . कर्जत , जि . अहमदनगर ) हे आपल्या आई , वडील व मोठ्या भावासह राहत असून मोठा भाऊ बापूसाहेब यांच्यासाठी फिर्यादी व त्यांचे नातेवाईक लग्न स्थळ बघत होते.

दि.३ नोव्हेंबर २०२२ रोजी फिर्यादी यांनी निलेश विठ्ठल यादव यांना दत्तात्रय दळवी यांच्याकडे स्थळ बघण्याकरता सांगितले. दळवी यांनी शामल चव्हाण ( रा.गोरे वस्ती , वाघोली , पुणे ) यांच्याकडे जावा, असे सांगितले.

चव्हाण यांना निलेश यादव यांनी संपर्क साधला असता सोलापूर येथे मुलगी आहे. पण ती मुलगी बघण्यासाठी सोलापूरला यावे लागेल व लग्नासाठी दीड लाख रुपये खर्च येईल, असे त्यांनी सांगितले.

ठरल्याप्रमाणे फिर्यादी व त्यांचे कुटुंब मुलगी बघण्याकरिता सोलापुरातील टेंभुर्णी येथे आले. तिथून ते सर्वजण चारचाकी वाहनामधून सोलापूर येथे आले.

सोलापुरात मुबारक मोहम्मद मुल्ला ( वय ४० , रा . जत ) यांची ओळख करून दिली त्यांच्यासोबत धानम्मा नागनाथ बिराजदार ही महिला होती. या दोघांनी फिर्यादीच्या नातेवाईकांना जुने घरकुल येथील पत्र्याच्या घरात घेऊन गेले.

तेथे दोघांनी सुरेखा पुजारी नावाच्या मुलीचे स्थळ दाखवले मुलीचे आई-वडील मयत झाले आहेत, असे सांगितले. मुबारक मुल्ला व धानम्मा बिरादार या दोघांनी लग्नाचे पेपर तयार करून घेण्यासाठी म्हणून सुरुवातीला १० हजार रुपये फोन पे मागून घेतले.

दुसऱ्या दिवशी बॉन्ड लिहून घेत असताना धानम्मा बिराजदार यांच्या बँक अकाउंटवर १ लाख १० हजार रुपये पाठवण्याकरिता सांगितले.

फिर्यादीने मोबाईल अॅपद्वारे बिराजदार यांच्या अकाउंटवर ६० हजार रुपये तसेच निलेश यादव यांनी रोख ५० हजार रुपये असे १ लाख १० हजार रुपये बिराजदार यांना दिले.

शामल चव्हाण यांच्या अकाऊंटवर १५ हजार रुपये पाठवले. मुबारक मुल्ला यांच्या मोबाईलवर १५ हजार रुपये पाठवले. त्यानंतर धानम्मा बिराजदार हिने माझ्या अकाउंटवर पैसे आले नाहीत म्हणून तिथून पळ काढून निघून गेली.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: फसवणूक

संबंधित बातम्या

शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारणाऱ्या बँकांची आता गय नाही; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन स्वतः करणार अर्जांची तपासणी; ‘या’ ४ बँकांना नोटिसा

नागरिकांनो! सोलापूर जिल्ह्यातील केसरी रेशन कार्डधारकांना ‘इतके’ महिने मोफत अन्नधान्य मिळणार

November 28, 2026
चिमुकल्यांच्या हाती शिक्षणाची शिदोरी, स्वप्नांना मिळाली नवी उभारी; उद्योजक सागर नागणे यांच्या वतीने खोमनाळ व हिवरगाव येथे आ.आवताडेंच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्य वाटप

चिमुकल्यांच्या हाती शिक्षणाची शिदोरी, स्वप्नांना मिळाली नवी उभारी; उद्योजक सागर नागणे यांच्या वतीने खोमनाळ व हिवरगाव येथे आ.आवताडेंच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्य वाटप

November 26, 2026

बँक मॅनेजरच्या नावाचा वापर करत साडेपाच कोटींच्या कर्जाचे आमिष; नोकरदाराला १० लाखांचा गंडा; दाम्पत्यासह ‘या’ बँकेच्या व्यवस्थापकावर गुन्हा

November 24, 2026
दुष्काळाचे चटके तीव्र! मंगळवेढ्यात चारा, पाणी आणि रोजगारासाठी अनिल सावंत यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे धाव; कागदोपत्री आढावे नकोत, थेट बांधावर मदत द्या

दुष्काळाचे चटके तीव्र! मंगळवेढ्यात चारा, पाणी आणि रोजगारासाठी अनिल सावंत यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे धाव; कागदोपत्री आढावे नकोत, थेट बांधावर मदत द्या

November 22, 2026
मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

स्वीकृत सदस्य निवडीचा बिगुल वाजला!सोलापूर जिल्हा परिषद व पंचायत समितीत वाढणार ‘एवढे’ स्वीकृत सदस्य; पाहा कोणत्या पक्षाला मिळणार किती जागा?

November 21, 2026
मोठी बातमी! उपसा सिंचन योजनेच्या कामाचे निघाले टेंडर; आ.आवताडे यांच्या प्रयत्नामुळे प्रत्यक्षात कामाला लवकरच होणार सुरुवात

शेतकरी आणि बेरोजगार तरुणांचे नशीब बदलणारा २६ नोव्हेंबरचा निर्णय; २४ तास आधीच ‘हे’ दोन आयडी तयार ठेवा; आमदार समाधान आवताडे यांनी केले जनतेला आवाहन

November 21, 2026
लाडकी बहीणनंतर लाडक्या भावांसाठीही योजना, दरमहा खात्यात येणार ‘इतकी’ रक्कम; पंढरपूरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा

कार्तिकी एकादशीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पंढरपूर दौऱ्यावर; प्रशासनाची तारेवरची कसरत; असा असणार दौरा

November 19, 2026
मंगळवेढ्यात ‘आवताडे राज’ कायम! बबनरावांच्या ३५ वर्षांच्या वर्चस्वाला सिद्धेश्वर यांच्या बिनविरोध निवडीची झळाळी; जिल्हा बँकेच्या संचालक मंडळात ‘साडू भावां’ची दमदार एन्ट्री

मंगळवेढ्यात ‘आवताडे राज’ कायम! बबनरावांच्या ३५ वर्षांच्या वर्चस्वाला सिद्धेश्वर यांच्या बिनविरोध निवडीची झळाळी; जिल्हा बँकेच्या संचालक मंडळात ‘साडू भावां’ची दमदार एन्ट्री

November 18, 2026
ठराव गोळा करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु; सोलापूर जिल्हा बॅंकेची निवडणूक पुढे ढकलली

सोलापूर जिल्हा बँक निवडणूक! ‘या’ आठ जागांचा फैसला मुख्यमंत्री करणार; बैठकीत निर्णय, आज अंतिम यादी राजन पाटील वाचणार

November 17, 2026
Next Post
चिंताजनक! मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावातील जनावरात लंपीची लक्षणे? पशुधन अधिकाऱ्यांनी तपासणीसाठी नमुने पाठवले

धक्कादायक! गर्भवती महिलांचं इंजेक्शन गायी-म्हशींना; सहा जणांना अटक

ताज्या बातम्या

Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

धक्कादायक! ‘जीबीएस’ आजारमुळे 11 वर्षीय शाळकरी मुलाच्या मृत्यू, घरोघरी सर्वेक्षण सुरू; नेमका काय आहे आजार?

November 28, 2026
शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारणाऱ्या बँकांची आता गय नाही; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन स्वतः करणार अर्जांची तपासणी; ‘या’ ४ बँकांना नोटिसा

नागरिकांनो! सोलापूर जिल्ह्यातील केसरी रेशन कार्डधारकांना ‘इतके’ महिने मोफत अन्नधान्य मिळणार

November 28, 2026
डाळिंबातील ‘बी’ श्‍वासनलिकेत अडकल्याने बालिकेचा मृत्यू; सोलापूरातील ‘या’ गावातील दुर्दैवी घटना!

बाळंतपणात आई आणि बाळाची काळजी घेण्यासाठी पुरुषांनाही 15 दिवसांची पॅटरनिटी लीव्ह; मुख्यमंत्री यांची मोठी घोषणा

November 27, 2026

धक्कादायक! तलाठी कार्यालयात घुसून वाळू माफियाचा तलाठ्यावर हल्ला; रुग्णालयात उपचार सुरू, कर्मचाऱ्यांकडून आंदोलनाचा इशारा

November 27, 2026
चिमुकल्यांच्या हाती शिक्षणाची शिदोरी, स्वप्नांना मिळाली नवी उभारी; उद्योजक सागर नागणे यांच्या वतीने खोमनाळ व हिवरगाव येथे आ.आवताडेंच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्य वाटप

चिमुकल्यांच्या हाती शिक्षणाची शिदोरी, स्वप्नांना मिळाली नवी उभारी; उद्योजक सागर नागणे यांच्या वतीने खोमनाळ व हिवरगाव येथे आ.आवताडेंच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्य वाटप

November 26, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

हृदयद्रावक! शेतीतील नुकसान आणि कर्जाच्या विळख्यात अडकलेल्या मंगळवेढ्यातील तरुण शेतकऱ्याने संपवले जीवन

November 26, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा