टीम मंगळवेढा टाईम्स ।
सोलापूर जिल्ह्याचे सहकार रत्न म्हणून ओळखले जाणारे मा.बबनराव आवताडे यांचे चिरंजीव खरेदी विक्री संघाचे चेअरमन मा.सिद्धेश्वर अवताडे यांचा आज वाढदिवस… सिद्धेश्वर आवताडे म्हणजे युवकांच्या गळ्यातील ताईत, सोलापूर जिल्ह्यातील तमाम युवा कार्यकर्त्यांचे प्रेरणास्रोत…
“ज्यांचं मन सुंदर असतं,
ज्यांचं ध्येय सुंदर असतं,
ज्यांचा विचार सुंदर असतो,
त्यांचं वागणं बोलणं आणि जगणंही सुंदर असतं.”
याची प्रचिती सिद्धेश्वर आवताडे यांच्या वाणीतून आणि देहबोलीतून दिसून येते. सिद्धूच्या आयुष्यामध्ये आई हे एक खऱ्या अर्थाने संस्कार पीठ. एक दाना पेरावा तेव्हा धरती अनेक दाण्यांनी भरलेलं कणीस देते.
माणूस ही तसाच असतो प्रेमाचा शब्द मिळाला तर भारावून जातो. मग त्यासाठी प्रेमाची शब्द गंगा मुक्तपणे उधळायला तयार होतो. प्रेमाने जोडलेली चार माणसं व त्यासाठी लागणारे दोन गोड शब्द हे वैभव ज्याच्या जवळ आहे.
तोच या जगात श्रीमंत असे गौरव उद्गार सिद्धेश्वर अवताडे यांचे कट्टर समर्थक शंभू (मामा) नागणे यांनी काढले.
शंभू मामा सारखी अनेक माणसं एखाद्या रत्नपारख्याने तोलून-मोलून, घासून-पुसून पारखावी तशी सिध्देश्वर आवताडे यांनी पारखली. त्यांचे व्यक्तिमत्व खूप काही शिकवतं आणि विचार करायला प्रवृत्त करतं.
दरारा प्रतिष्ठानच्या माध्यमातून विशाल (बाबा) जाधव यांनी सुद्धा सिद्धूच्या संगतीत राहून आपल्या जीवनाचे सार्थक केल्याचं जाणवतं बाबा सारखी पोरं लहानपणापासूनच सिद्धूचे चाहते बनलेली.
जीवाला जीव देणारी दोस्ती अनुभवायची असेल तर एकदा का होईना अध्यक्षांच्या सहवासात यावच अशी भावना विशालने व्यक्त केली. त्यांच्या विविध सामाजिक उपक्रमामध्ये हिरीरीने भाग घेऊन स्वतःला झोकून देणारा सच्चा कार्यकर्ता म्हणजे विशाल जाधव.
“अहंकार घेता दुसऱ्यास तुच्छ मानितो,
स्वतःस मानितो सर्वश्रेष्ठ,
नामाची पायरी, सेवकाची पायरी, तेथे नसे काही भेदभाव” यापेक्षा वेगळेपण सिद्धूमध्ये नाही.
नामधारी सेवकांमध्ये अहंकार नसतो. तो त्याच्या नाम सेवेतून ईश्वरा प्रति पोहोचतो. भेदभाव आपोआप गळून पडतो. मी पणा झडून जातो आणि माणसातील माणूसपण जागे होऊन अलगदपणे प्रत्येकाच्या हृदय गाभाऱ्यात विसावतो.
सारं काही अध्यक्षांच्या सानिध्यात आल्यापासून असाच बदल घडतो यासाठीच त्यांची संगत त्यांचा सहवास अनेकांना हवाहवासा वाटतो.
मंगळवेढ्याच्या राजकारणात विशेष करून सहकारामध्ये स्वतःचा दबदबा आणि नैतिकता टिकवून ठेवलेले सहकार रत्न मा.श्री. बबनराव आवताडे यांचा राजकीय वारसा पुढे चालवण्याचे प्रामाणिक कर्तव्य श्री.सिद्धेश्वर आवताडे बजावत आहेत.
सामाजिक क्षेत्रातील बहुअंगी सेवेचे व्रत त्यांनी पत्करलं असून विविध उपक्रम करण्याचं काम त्यांनी घेतलेल असून त्यासाठी तरुणाईची एक फळी सतत त्यांच्या पाठीशी असते.
” नाते हे हृदयात असले पाहिजे, शब्दात नाही आणि नाराजी ही शब्दात असलु पाहिजे हृदयात नाही.”या उक्तीप्रमाणे नाराज झालेल्यांना सुद्धा आपल्या हसतमुख चेहऱ्याने जवळ करून स्वतंत्र ठसा निर्माण केला.
सामाजिक सेवेबरोबरच धार्मिकतेमध्ये महाशिवरात्री, आषाढी एकादशी, प्रत्येक श्रावणी सोमवार, या दिवशी फराळाचे वाटप करणे असेल स्वच्छ व थंड पाण्याची सोय करणे असेल मंदिर परिसर स्वच्छता असेल अशी विविध कामे करत असताना
ग्रामीण भागातील सर्व जाती धर्माच्या मुला-मुलींना शिकण्यासाठी प्रवृत्त करणे तर काही गरीब मुलांचा शैक्षणिक खर्च उचलणे अशीही नैतिक जबाबदारी त्यांनी आपल्या कार्यातून पूर्ण केलेली आहे.
“आपल्याला किती लोक ओळखतात यापेक्षा ते आपल्याला का ओळखतात.”
याला महत्त्व आहे याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे श्री सिद्धेश्वर आवताडे.
त्यांची युवक वर्गातील वाढती लोकप्रियता खूप काही सांगून जाते. आयुष्याचा खरा आनंद भावनेच्या ओलाव्यात असतो.
कुठलच नातं ठरवून जोडता येत नाही ते आपोआप जोडलं जातं खरी आपुलकी माया ही दुर्मिळ असते हे दान ज्याला लाभतं तो धन्यच हे धन्यता त्यांच्याकडून सर्वच त्यांच्या जिवलगांनी अनुभवले.
त्यांच्यातील आपुलकी, जिव्हाळा, प्रेम, सत्यता, निस्वार्थीपणा या जोरावर त्यांनी अल्पावधीतच सर्व मान्यता मिळविली. कोणीही हेवा करावं असं व्यक्तिमत्व.
येणाऱ्या भविष्यामध्ये तरुणांसाठी सर्व सोयीने युक्त असे वाचनालय, अभ्यासिका, विविध स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असे केंद्र चालू करण्याचा मानस त्यांनी आपल्या मित्रांसमवेत बोलून दाखवला होता.
गरीब, होतकरू कष्टाळू हे युवकांसाठी नक्कीच ते विविध उपक्रम करून अनेक बेरोजगारांच्या हाताला काम ही देण्याचं स्वप्न त्यांनी उराशी बाळगल्याचं दिसून येतं.
तुपाचं अस्तित्व जसं दुधात असतं, तसं निखळ मैत्रीचं प्रामाणिक अस्तित्व त्यांच्यामध्ये आहे, जे न दाखवता जाणता येतं. त्यांच्यातील अनेक उर्जित उपक्रमामुळे तळागाळातील तरुण वर्ग त्यांच्यासोबत राहिला. शेवटी एक सांगता येईल,
“आयुष्य मिळणं हा नशिबाचा भाग आहे, मृत्यू येणं हा काळाचा भाग आहे पण लोकांच्या मनात जिवंत राहणं हा कर्माचा भाग आहे”. हे कर्म ज्याला मिळलं, लाभलं तो खरा धन्य. सिद्धूच्या हातून सर्वसमावेशक अशी सेवा घडावी त्याला उदंड आणि खूप आयुष्य लाभो एवढी ईश्वरचरणी प्रार्थना करून वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा..!
मंगळवेढा शहरालगत असलेल्या ग्रामपंचायतमध्ये एकहाती सत्ता मिळवून नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या त्यांनी दूर केले आहेत. विकासात्मक काम त्यांनी करून दाखवले आहे. (शब्दांकन-श्री.सिद्धेश्वर ईश्वर अवघडे सर साठेनगर मंगळवेढा 9156542309.)
सिध्देश्वर आवताडे यांच्या वाढदिवसानिमित्त गोपाळपूर येथील आश्रमातील वृध्दांना स्नेह भोजन
मंगळवेढा तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन तथा श्री संत दामाजी सहकारी कारखान्याचे साखर संचालक सिध्देश्वर बबनराव आवताडे यांच्या ३३ व्या वाढदिवसानिमित्त आज मंगळवार दि.१ नोव्हेंबर रोजी दुपारी १.०० वा . गोपाळपूर येथील मातोश्री वृध्दाश्रमातील वृध्दांना स्नेह भोजन सरकार परिवार , श्री संत चोखामेळा ग्रामपंचायत , विशाल जाधव , अमित गवळी , भारत नगर शिंदे , मंजुषा गवळी , उल्का तोडकरी व छाया चौगुले यांच्यावतीने देण्यात येणार आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज