mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

ऊसाची पहिली उचल 2500 जाहिर करा व अंतीम बिल 3100 द्या; स्वाभिमानी शेतकरी संघटना या मागणीवर ठाम

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 30, 2022
in मंगळवेढा, सोलापूर
ऊसाची पहिली उचल 2500 जाहिर करा व अंतीम बिल 3100 द्या; स्वाभिमानी शेतकरी संघटना या मागणीवर ठाम

टीम मंगळवेढा टाईम्स ।

उसाला पहिली उचल 2500 रुपये व अंतिम बिल 3100 रुपये त्वरित जाहीर करावे या मागणीसाठी सकाळी 11.00 वा. मंगळवेढा-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर माचणूूर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह भिमा नदीकाठच्या सर्व शेतकर्‍यांनी एकत्र येवून रास्ता रोको आंदोलन केले. दरम्यान रास्ता रोकोमुळे दोन्ही बाजूला वाहनांची कोंडी झाल्याचे चित्र होते.

ऊस आंदोलनाची व्याप्ती आता जिल्हाभर वाढली असून जिल्ह्यातील सर्व ऊस उत्पादक शेतकरी ऊस दरासाठी विविध ठिकाणी आंदोलने होत असल्याने शेतकरी वर्ग आक्रमक होत असल्याचे दिसून येत आहे.

वेगवेगळ्या ठिकाणी रस्त्यावर येऊन उसाची वाहतूक रोखणे, टोळ्या बंद करणे, रस्ता रोको आंदोलन करणे अशा प्रकारे वेगवेगळ्या आंदोलनाच्या माध्यमातून प्रशासनाचे व साखर कारखानदाराचे लक्ष वेधून घेतले जात आहे.

मागील दोन वर्षे कोरोना असल्यामुळे शेतकर्‍यांनी कारखाना जे बिल देईल त्याप्रमाणे स्विकारले मात्र आता वाढती महागाई लक्षात घेता शेतकरी वर्ग यंदा आक्रमक झाल्याचे चित्र आहे.परिणामी सर्व शेतकरी वर्गातून एकजुटी निर्माण होवून वाहने अडवली जात आहेत.

यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अ‍ॅॅड राहुल घुले यांनी जिल्ह्यातील कारखानदारांनी ऊस दराची मागणी वेळीच मान्य न केल्यास भविष्यातील परिणामाला सामोरे जाण्याची कारखानदारांनी तयारी ठेवावी असा निर्वाणीचा इशारा दिला.

युवराज घुले म्हणाले की, दि 31 ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकार्‍यांच्या बैठकीत साखर सम्राटांनी योग्य भूमिका घ्यावी अन्यथा 1 नोव्हेबर पासून आंदोलन तीव्र करून कारखानदारांना सळो की पळो करून सोडू.

तालुक्यातील एकही कारखाना चालू राहणार नाही असा इशारा दिला. शेतकर्‍यांचा कोणी वाली राहिला नाही असे विकास पुजारी, अनिल बिराजदार यांनी मत मांडले.

यावेळी अ‍ॅॅड राहुल घुले, जिल्हा संघटक युवराज घुले, शेतकरी संघटनेचे रामभाऊ सारवडे, पोपट पडवळे, स्वाभिमानीचे तालुकाध्यक्ष श्रीमंत केदार, गणेश गावकरे,तानाजी पाटील, शरद कोळी, पांडुरंग बाबर, विश्वास बाबर,राजेंद्र रणे,  चंद्रकांत बाबर,

मोहन घोडके, भरत शेटे, सूर्यकांत बेदरे, सत्यवान शिंदे, नवनाथ पुजारी, सुनील बिराजदार, संतोष सोनगे, सज्जनबापू पाटील, मधुकर पाटील, विकास पवार, उपसरपंच आण्णासाहेब पाटील, समाधान पाटील,

आण्णासाहेब पुजारी, बाळकृष्ण मोरे, रवी पाटील, धनंजय सरवळे, बाबा चव्हाण, नागेश कुंभार, रमेश चव्हाण, शंकर संगशेट्टी आदी उपस्थित होते.

या आंदोलनात माचणूर, ब्रह्मपुरी, बठाण, उचेठाण, रहाटे वाडी , तांमदर्दी, अरळी, बोराळे, सिद्धापूर, ताडोर , डोणज या गावातील शेतकरी उपस्थित होते.

शेतकरी संघटनेच्या मागण्याचे निवेदन मंगळवेढयाचे मंडल अधिकारी धनंजय इंगोले यांना देण्यात आले. अनुचित प्रकार होऊ नये यासाठी पोलीस निरीक्षक रणजित माने यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

अ‍ॅब्युलन्सला जाण्यासाठी तात्काळ मार्ग मोकळा करून दिला

आंदोलनादरम्यान एक अ‍ॅब्युलन्स मंगळवेढयाकडून सोलापूरकडे रुग्णांना घेवून निघाली होती. माचणूर येथे आंदोलनामुळे रस्ता बंद होता. आंदोलकांनी तत्परता दाखवून या अ‍ॅब्युलन्सला जाण्यासाठी तात्काळ मार्ग मोकळा करून दिला.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: ऊस बिल

संबंधित बातम्या

अंगणवाडी सेविकांची निघाली भरती, सोलापूर जिल्ह्यात ‘एवढ्या’ जागा; शिक्षण अट, उमेदवार निवडीचा अधिकार, अर्ज प्रक्रिया सविस्तर माहिती जाणून घ्या..

महिलांनो! सोलापूर जिल्ह्यात अंगणवाड्यांमध्ये नोकरभरती; पगार, पात्रता ते अर्जाचा शेवट दिवस; जाणून घ्या सर्व माहिती

July 17, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

मोठी बातमी! पंढरपुरात आषाढी वारीच्या तोंडावर खळबळ; ‘या’ प्रसिद्ध मिसळ सेंटरसह हॉटेल्सवर तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई; तक्रारींसाठी नागरिकांनी ‘या’ क्रमांकावर संपर्क साधावा

July 17, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

शेतकऱ्यांसाठी देवमाणूस ठरले आ.समाधान आवताडे! उजनी आणि म्हैसाळमधून थेट शेतात पोहोचणार पाणी

July 17, 2026
दुर्दैवी घटना! सांगोल्यातील ‘या’ गावात दोन बहिणींचा शेततळ्यात बुडून मृत्यू

मंगळवेढ्यात खळबळ! मॉलमध्ये काम करणाऱ्या २१ वर्षीय तरुणाचा भीमा नदीच्या पुलावरून पडून मृत्यू; घातपाताचा संशय?

July 16, 2026
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

डोळ्यांदेखत स्वप्ने जळतायत! पाऊस नसल्याने उभी पिके करपली; मंगळवेढ्यासह संपूर्ण जिल्ह्यात पाण्याची तीव्र टंचाई; ‘सोलापूर जिल्हा दुष्काळी जाहीर करा’, शेतकऱ्यांची आर्त हाक

July 15, 2026
सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

बहिणीची दादागिरी! सोन्याच्या दुकानात पूर्ण भागीदारीसाठी भावाला धमकी; ज्वेलर्ससमोर गोंधळ घालणाऱ्या बहिणीवर गुन्हा

July 15, 2026
न्यूरोसर्जन डॉ.शिरीष वळसंगकर प्रकरणाला वेगळं वळण; आरोपी महिलेच्या वकिलाचा मोठा खुलासा

खुनाचा प्रयत्न प्रकरणातून आरोपीची मुक्तता; मंगळवेढ्यात ॲड.ओंकार भुसे यांच्या न्यायालयीन कौशल्याची चर्चा

July 14, 2026
पावसाचा कहर! उजनीतून दीड लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग, भीमाकाठी सावधानतेचा इशारा 

शेतकऱ्यांना दिलासा द्या, उजनी धरणातून पाणी सोडा; मंगळवेढ्यातून प्रा.शिवाजीराव काळुंगे यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे

July 15, 2026

निवडणूक कामात हलगर्जीपणा; सोलापूर जिल्ह्यातील शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल; दिलेले काम मुदतीत केले नसल्याचा ठेवला ठपका

July 14, 2026
Next Post
मुख्यमंत्री उजनीचे पाणी इंदापूरला देण्याचा निर्णय रद्दची घोषणा करत नाहीत; तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही : आ.परिचारक

आ.आवताडेंचा दामाजी कारखान्यामध्ये पराभव केल्यानंतर आता परिचारकांच्या भूमिकेला भीमा कारखान्यामध्ये महत्व प्राप्त

ताज्या बातम्या

अंगणवाडी सेविकांची निघाली भरती, सोलापूर जिल्ह्यात ‘एवढ्या’ जागा; शिक्षण अट, उमेदवार निवडीचा अधिकार, अर्ज प्रक्रिया सविस्तर माहिती जाणून घ्या..

महिलांनो! सोलापूर जिल्ह्यात अंगणवाड्यांमध्ये नोकरभरती; पगार, पात्रता ते अर्जाचा शेवट दिवस; जाणून घ्या सर्व माहिती

July 17, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

मोठी बातमी! पंढरपुरात आषाढी वारीच्या तोंडावर खळबळ; ‘या’ प्रसिद्ध मिसळ सेंटरसह हॉटेल्सवर तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई; तक्रारींसाठी नागरिकांनी ‘या’ क्रमांकावर संपर्क साधावा

July 17, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

शेतकऱ्यांसाठी देवमाणूस ठरले आ.समाधान आवताडे! उजनी आणि म्हैसाळमधून थेट शेतात पोहोचणार पाणी

July 17, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

ग्रामपंचायत निवडणुकांचा बिगुल वाजला! मतदार यादीचा अधिकृत कार्यक्रम जाहीर; ‘या’ तारखेला प्रसिद्ध होणार प्रारूप यादी

July 17, 2026
मोठी बातमी! वर्षाला ‘इतके’ गॅस सिलिंडर मोफत देणार; युती सरकार आणा, पुढील 5 वर्षे वीज मोफत.; भरसभेत अजित पवारांची मोठी घोषणा

अजित पवारांच्या जयंतीचा समावेश राष्ट्रपुरुष आणि थोर पुरुषांच्या यादीत, दादांची जयंती शासकीय कार्यालय, शाळा-महाविद्यालयात साजरी होणार; ‘या’ तारखेला राज्यभर पहिली शासकीय जयंती

July 16, 2026
दुर्दैवी घटना! सांगोल्यातील ‘या’ गावात दोन बहिणींचा शेततळ्यात बुडून मृत्यू

मंगळवेढ्यात खळबळ! मॉलमध्ये काम करणाऱ्या २१ वर्षीय तरुणाचा भीमा नदीच्या पुलावरून पडून मृत्यू; घातपाताचा संशय?

July 16, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा