टीम मंगळवेढा टाईम्स ।
संत बसवेश्वर व संत चोखामेळा या दोन्ही स्मारकासाठी निधी उपलब्ध करून देणार असल्याची ग्वाही उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.
आवताडे फार्म हाऊस येथे आयोजित केलेल्या भाजप कार्यकर्त्या मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते.
याप्रसंगी आमदार समाधान आवताडे, आमदार राजेंद्र राऊत, माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, जिल्हा सरचिटणीस शशिकांत चव्हाण, माजी नगराध्यक्ष धनंजय खवतोडे, माजी तालुकाध्यक्ष राजेंद्र सुरवसे, अँड.धनंजय जाधव, तालुका अध्यक्ष गौरीशंकर गुरुकुल, जिल्हा उपाध्यक्ष औदुंबर वाडदेकर, आदित्य हिंदुस्तानी यांच्यासह तालुक्यातील विविध गावचे सरपंच उपस्थित होते.

ना.पाटील पुढे बोलताना म्हणाले की, येणाऱ्या कॅबिनेट बैठकीमध्ये मंगळवेढा सिंचन उपसाचा प्रश्न मार्गी लावण्यात येणार आहे. तसेच मंगळवेढा तालुक्यातील चारा छावणी चालकांची बिले प्रलंबित आहेत. याप्रसंगी निवेदन देण्यात आले.
येत्या काळामध्ये उच्च व तंत्र शिक्षणामध्ये आमूलाग्र बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासोबत कौशल्य विकसीत पध्द्त व्हावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
महाविकास आघाडी सरकारने शिक्षण क्षेत्रामध्ये जे अन्यकारक निर्णय घेतले होते. ते सर्व निर्णय मागे घेऊन आमच्या सरकारने तयार केलेला नवीन विद्यापीठ कायदा प्रमाणे येत्या काळात निर्णय लागू होतील.

पंढरपूर तीर्थक्षेत्र आराखडा, पाणी प्रश्न व स्मारकासाठी आ.आवताडे आग्रही
पंढरपूर येथील तीर्थक्षेत्र आराखडयानुसार विकास केला जावा, त्याकरिता स्थानिक नागरिकांना विश्वासात घेऊन येत्या काळात पंढरपूरचा विकास केला जावा.

तसेच मंगळवेढा येथील प्रलंबित असलेला पाणी प्रश्न व संत चोखामेळा , संत बसवेश्वर स्मारकासाठी आमदार समाधान आवताडे यांनी आग्रही भूमिका मांडली.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज














