टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा शहरातील बोराळे नाका येथे असलेले महिला हॉस्पिटल & मल्टीस्पेशालिटी येथे दोन कॅथलॅब अँजिओग्राफी यशस्वीरित्या डॉ.दीपक गायकवाड यांनी पार पाडली आहे.
महिला मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डॉ.विलास तोंडे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महाआरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
या शिबिराचा मंगळवेढ्यातील नागरिकांनी चांगलाच प्रतिसाद दिला असून आत्तापर्यंत 195 लोकांना उपचार दिला आहे.
तरीदेखील दि.17 सप्टेंबरपर्यंत महाआरोग्य शिबिर सुरू आहे जास्तीत जास्त लोकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा.
महसुल पोलिस, पोस्टमन, वीजवितरण कंपनी, शिक्षक, आरोग्य कृषी, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामसेवक, तलाठी, मंडळ अधिकारीयांच्या सह इतर विभागातील अधिकारी आणि कर्मचारी
तसेच आशा स्वयंसेविका अंगणवाडी सेविका यांना शिबीरा मध्ये तपासणी साठी प्राधान्य देण्यात आले आहे.
दरम्यान, सर्व सामान्य नागरिकांनी ही या शिबीराचा लाभ घेतला आहे, वैद्यकीय क्षेत्रातील नामांकित तज्ञ डॉ.विलास तोंडे पाटील, डॉ.दिपक गायकवाड, डॉ.प्रमोद पवार, डॉ.अमजद सय्यद,
डॉ.सुनील शेवाळे यांच्या सह वैद्यकीय क्षेत्रातील टीम मोफत महाआरोग्य शिबीरात सेवा बजावत आहेत.
महिला हॉस्पिटल आणि मल्टीस्पेशालिटी मध्ये आज महाआरोग्य शिबीराचा शेवटचा दिवस असून बी.पी, शुगर, ईसीजी या टेस्ट मोफत केल्या जाणार आहेत.
2 डी इको, ट्रेड मील टेस्ट, इतर रक्ताच्या तपासण्या 50 टक्के सवलतीच्या दरात करण्यात येणार आहेत.
अॅन्जिओग्राफी टेस्ट करीता 3000 ( तीन हजार ) शुल्क आकारले जाणार आहे. केशरी आणि पिवळ्या रेशनकार्ड धारकांना अगदी मोफत अॅन्जिओप्लास्टीची सोय सुरू आहे.
प्रथमच मंगळवेढ्यात महिला हॉस्पिटल आणि मल्टीस्पेशालिटी मध्ये शुगर असणाऱ्या रुग्णांना नसांची तपासणी ( न्यूरोपॅथी ) करण्यासाठी अत्याधुनिक Neuro Touch मशिन उपलब्ध झाली आहे.
स्टार हेल्थ इन्शुरन्स धारकांना मेडीक्लेमची सेवा, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना उपलब्ध आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज