mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

बोर्ड परीक्षांसंदर्भांत मोठी बातमी! ‘या’ नावाची नवी परीक्षा येणार; कशी असेल परीक्षा वाचा…

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
September 2, 2022
in राज्य, राष्ट्रीय, शैक्षणिक
विद्यार्थ्यांनो! टीईटी आणि नेट परीक्षा एकाच दिवशी, एसटी संपामुळे उमेदवारांची गैरसोय; टीईटी परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी

टीम मंगळवेढा टाईम्स ।

नीट, जेईई, सीयूईटीनंतर आता बोर्डाच्या परीक्षांमध्ये मोठा बदल होणार आहे. भारत सरकार हा मोठा बदल करण्याच्या तयारीत गुंतलेले आहेत. त्यासाठी ‘PARAKH’ या नव्या परीक्षा नियामक संस्थेची निर्मिती करण्यात आली आहे.

असे करण्यामागे केंद्र सरकारचा एकच उद्देश आहे- देशभरातील बोर्डाच्या परीक्षांमध्ये समानता आणणे. दहावी आणि बारावीच्या स्तरावर विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करण्यासाठी एकसमान आराखडा तयार करणे.

सध्या सीबीएसई आणि आयसीएसई व्यतिरिक्त देशातील विविध राज्यांमध्ये राज्य मंडळाच्या परीक्षांचा स्तर वेगवेगळा आहे. यामुळे मुलांच्या गुणांमध्येही मोठा फरक पडतो. याच कारणास्तव विद्यार्थ्यांचे मूल्यमापन त्याच पातळीवर केले जात नाही.

बोर्डाच्या परीक्षा एकसमान करण्याचा केंद्राचा विचार गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे. राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने (एनसीईआरटी) राज्यांच्या राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेबरोबर (एससीईआरटी) अनेक बैठका घेतल्या आहेत.

या बैठकांचा परिणाम म्हणून, एक नवीन मूल्यांकन नियामक तयार केला जात आहे, ज्याचे नाव PARAKH आहे.

PARAKH हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा (NEP) भाग

PARAKH म्हणजे परफॉर्मन्स असेसमेंट, रिव्ह्यू अँड ॲनालिसिस ऑफ नॉलेज फॉर होलिस्टिक डेव्हलपमेंट. ही संस्था एनसीईआरटीचा एक भाग म्हणून काम करेल.

नॅशनल अचिव्हमेंट सर्व्हे अर्थात NAS आणि स्टेट अचिव्हमेंट सर्व्हे SAS आयोजित करण्याची जबाबदारीही PARAKH चीच असेल. PARAKH हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा (NEP) भाग आहेत.

या PARAKH मध्ये देशातील सर्व मान्यताप्राप्त शाळांसाठी समान नियम, मानके, मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यात येणार आहेत. मूल्यमापनाचा नमुना अशा प्रकारे ठेवला जाईल की मुलांना 21 व्या शतकात आवश्यक असलेल्या कौशल्यांचा विकास आणि मूल्यमापन करता येईल.

बोर्डाच्या परीक्षा वर्षातून दोनदा होणार?

शिक्षण मंत्रालयाने म्हटले आहे की, राज्यांशी झालेल्या चर्चेत असे दिसून आले आहे की, बहुतेक राज्ये वर्षातून दोनदा बोर्ड परीक्षा घेण्याच्या एनईपीच्या प्रस्तावाला पाठिंबा देत आहेत.

यापैकी एका परीक्षेच्या मदतीने मुले त्यांचे गुण सुधारण्यास मदत करतील. त्याचबरोबर मॅथ्समध्ये दोन प्रकारचे पेपर देण्याचेही राज्यांनी मान्य केले आहे. एक म्हणजे स्टँडर्ड मॅथ्स आणि दुसरं म्हणजे उच्चस्तरीय गणित.

याबाबत माहिती देताना शिक्षण मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने ‘यामुळे मुलांमधील गणिताची भीती कमी होईल आणि त्यांना शिकण्यासाठी प्रोत्साहन मिळेल’, असे सांगितले.(स्रोत:TV9 मराठी)

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: बोर्ड

संबंधित बातम्या

खास योजना! फक्त 90 दिवसांसाठी 9 टक्के सर्वाधिक व्याजदर; विठाई परिवार अर्बन बँकेची नवरात्रोत्सवानिमित्त घोषणा

फक्त भेट द्या आणि जिंका! नवरात्रीनिमित्त ‘विठाई परिवार मल्टीस्टेट’कडून मोफत लकी ड्रॉ कूपन योजना सुरू; प्रत्येक शाखेत नवदुर्गांचा सन्मान व होम मिनिस्टर कार्यक्रमांचे आयोजन

October 13, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ; सोलापूर शिक्षण विभागाचे शाळांना आदेश; शासनाच्या निर्णयानुसार ‘या’ परीक्षांसाठी शुल्कमाफी लागू

October 13, 2026
महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

हो पाऊस येणार! पंजाबराव डख यांनी थेट तारीख सांगितली; ‘जीवदान’ ठरणारा हवामान अंदाज समोर

October 13, 2026
गालबोट! मंगळवेढ्यात वर्ग वाटपावरून शिक्षक-मुख्याध्यापकात हमरीतुमरी, ‘या’ शाळेतील प्रकार; कारवाईसाठी ‘प्रहार’ संघटना आक्रमक

अद्भूत धाडस! विषारी ‘कोब्रा’ चावला, ब्लेडने रक्त काढले अन् सापाला सोबत घेऊन गाठला दवाखाना; मंगळवेढ्याच्या प्राचार्यांचा काळजाचा ठोका चुकवणारा थरार; अखेर मृत्यूवर मात

October 12, 2026
मंगळवेढा तालुक्यात एकाच दिवशी कोरोनाने घेतला दोघांचा बळी; आज 10 जणांना लागण

मृतांच्या टाळूवरचं लोणी! कोरोनातील २२ मृतांवर कागदोपत्री ‘उपचार’ दाखवून लाटले २ कोटी; मृत्यूनंतर ६ वर्षांनी ‘उपचार’?

October 11, 2026
सोलापूरचे नाव पुन्हा राज्यात उज्ज्वल! प्रा.डॉ. सागर पाटील यांना प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार; शिक्षण क्षेत्रातील बहुमोल योगदानाची दखल

सोलापूरचे नाव पुन्हा राज्यात उज्ज्वल! प्रा.डॉ. सागर पाटील यांना प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार; शिक्षण क्षेत्रातील बहुमोल योगदानाची दखल

October 6, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

नागरिकांनो! ग्रामपंचायतीला किती निधी आला, कुठे खर्च झाला? आता मोबाईलवरच पाहता येणार सगळा हिशेब

October 6, 2026
दिपावलीचा दुसरा हप्ता कारखान्यांनी देऊन शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी; ऊस उत्पादक शेतकरी बालाजी गरड यांचे भावनिक आवाहन

मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी उपसरपंच बालाजी गरड यांची आक्रमक भूमिका; सर्व शेतकऱ्यांना विनाविलंब आर्थिक मदत व दुष्काळ निधी देण्याची मागणी

October 6, 2026
शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा; पोलीस संरक्षणासह ‘ही’ फी बंद करणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

सावकारांनो सावधान! शेतकऱ्यांना अडचणीत आणाल तर थेट…. मंत्री बावनकुळेंचा इशारा, पोलिसांना सूचना, बँकांनांही दिली ताकीद

October 5, 2026
Next Post
Big Breaking! भाजप-‘शिंदे’सेना सरकारचा ‘या’ दिवशी शपथविधी होण्याची शक्यता? मंत्रीपदांचे वाटप असे होणार

पालकमंत्र्यांची घोषणा होणार, मंत्रिमंडळात पडणार 'इतक्या' मंत्र्यांची भर; थेट सांगितला आकडाच

ताज्या बातम्या

नागरिकांनो! धैर्यशील मोहिते पाटलांना विजयी करा, माढा, सोलापूर जिल्हा चमकेल; शरद पवारांनी पंढरपुरातील सभा गाजवली

मंगळवेढ्यात उद्या राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक; ​खा.धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली होणार रणनीती निश्चित

October 13, 2026
खास योजना! फक्त 90 दिवसांसाठी 9 टक्के सर्वाधिक व्याजदर; विठाई परिवार अर्बन बँकेची नवरात्रोत्सवानिमित्त घोषणा

फक्त भेट द्या आणि जिंका! नवरात्रीनिमित्त ‘विठाई परिवार मल्टीस्टेट’कडून मोफत लकी ड्रॉ कूपन योजना सुरू; प्रत्येक शाखेत नवदुर्गांचा सन्मान व होम मिनिस्टर कार्यक्रमांचे आयोजन

October 13, 2026

आमदारांचे आदेश धाब्यावर, माफीनामा नाहीच! संतप्त सर्वसमाजाचा मंगळवेढ्यात लोकशाही मार्गाने एल्गार; आजपासून सह्यांची मोहीम

October 13, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ; सोलापूर शिक्षण विभागाचे शाळांना आदेश; शासनाच्या निर्णयानुसार ‘या’ परीक्षांसाठी शुल्कमाफी लागू

October 13, 2026
महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

हो पाऊस येणार! पंजाबराव डख यांनी थेट तारीख सांगितली; ‘जीवदान’ ठरणारा हवामान अंदाज समोर

October 13, 2026
मंगळवेढ्यात पक्षाची धुरा आता सचिन नागणे यांच्या खांद्यावर; राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) शहराध्यक्षपदी नियुक्ती

मंगळवेढ्यात पक्षाची धुरा आता सचिन नागणे यांच्या खांद्यावर; राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) शहराध्यक्षपदी नियुक्ती

October 12, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा