टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा शहरालगत असलेल्या चोखामेळा नगर व दामाजी नगर या ग्रामपंचायतीच्या सरपंच निवडीची प्रक्रिया पार पडली.
त्यामध्ये चोखामेळा नगर ग्रामपंचायतीत सरपंच व उपसरपंच निवडीत नाट्यमय घडामोडी घडत सरपंचपदी शिवाजी सरगर तर उपसरपंच पदी स्वाती जावळे यांची मतदान प्रक्रियेतून निवड झाली.
दामाजी नगर ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी बबनराव अवताडे गटाचे जमीर सुतार यांचा व उपसरपंच पदासाठी संजय जगताप यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची निवड बिनविरोध करण्यात आली.
तालुक्यात नुकतीच चोखामेळा नगर, दामाजी नगर, धर्मगाव, सलगर खुर्द या चार ग्रामपंचायतीची निवडणूक प्रक्रिया पार पडली. त्यामध्ये धर्मगाव व सलगर खुर्द या ग्रामपंचायतीची मुदत संपवण्यात अजून कालावधी शिल्लक असल्यामुळे त्यांची निवड लांबणीवर आहे.
तर चोखामेळा नगर या ग्रामपंचायतीच्या सरपंच निवडीपूर्वी नाट्यमय घडामोडी घडल्या बबनराव अवताडे गटाचे यामध्ये आठ सदस्य विजयी झाले.
त्यामधील शिवाजी सरगर व साधना लेंडवे यांनी सरपंच पदासाठी आ समाधान आवताडे यांच्या गटातील सदस्याची मदत घेऊन शिवाजी सरगर यांनी सरपंच पद मिळवले.
सरपंच उपसरपंच पदासाठी गुप्त मतदान घेण्यात आले. सरपंच शिवाजी सरगर व उपसरपंच स्वाती जावळे यांना प्रत्येकी सात मते पडली व ते एका मताने विजयी झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी धनंजय इंगोले यांनी घोषित केले.यावेळी ग्रामसेवक अरुण मोरे उपस्थित होते.
या ठिकाणच्या सरपंच निवडीपूर्वी तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाल्यामुळे पो. नि. रणजीत माने, सपोनी अंकुश वाघमोडे,पोउ नि अमोल बामणे, पुरुषोत्तम धापटे यांच्यासह बंदूकधारी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात केला.
तर दामाजी नगर येथे सरपंच पदासाठी बबनराव अवताडे गटाचे जमीर सुतार यांचा व उपसरपंच पदासाठी संजय जगताप यांचा एकमेव अर्ज आल्याने ते बिनविरोध निवडल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी सोमनाथ जाधव यांनी जाहीर केले.
यावेळी तलाठी बालेरखान शेख ग्रामसेवक गोरख जगताप उपस्थित होते. त्यामुळे आजच्या निवडीत चोखामेळा नगर ग्रामपंचायतवर आ.समाधान आवताडे गटाचे तर दामाजी नगर ग्रामपंचायतीवर बबनराव अवताडे गटाचे वर्चस्व अबाधित राहिले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज