टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा आगारातील गेल्या पाच महिन्यापासून संपावर असलेले 281 कर्मचार्यांपैकी 218 कर्मचारी न्यायालयाच्या आदेशानंतर हजर झाले असून अखेर हजर झाल्याने ग्रामीण भागासह सोलापूर मार्गावर
पुर्वी प्रमाणे पुर्ण क्षमतेने एस.टी.बस धावू लागल्याने गेली पाच महिने त्रस्त झालेल्या प्रवाशांच्या चेहर्यावर आनंद दिसून येत आहे.
दरम्यान, मंगळवेढा आगाराची एस.टी.पूर्ण क्षमतेने चालू झाल्याने प्रवाशांनी एस.टी.मधूनच प्रवास करून आपला जीव सुरक्षीत ठेवावा असे आवाहन आगारप्रमुख मधुरा जाधवर यांनी केले आहे.
एस.टी.कर्मचार्यानी आपल्या विविध मागण्यांसाठी आक्टोबर शेवटच्या आठवडयापासून संप पुकारला होता.संप पुकारल्यापासून एस.टी.रस्त्यावर धावत नसल्यामुळे सर्वसामान्य प्रवाशी वर्गाचे मोठे हाल झाले.
तसेच प्रवास कसा करावा याबाबत त्यांच्यापुढे मोठा गहन प्रश्न होता. काही प्रवाशांनी खाजगी वाहनातून प्रवास करीत जीव गमावल्याच्याही घटना घडल्या.
जवळपास साडे पाच महिने हा संप चालू राहिल्याने एस.टी. महामंडळातील एक अलिखीत इतिहास घडल्याची चर्चा प्रवाशी वर्गातून होत आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने कर्मचार्यांना दि.22 एप्रिल अखेर कामावर हजर होण्याचा शेवटचा इशारा दिला होता.याचे पालन करीत कर्मचारी गेली दोन दिवस टप्याटप्प्याने हजर होत असल्याने एस.टी.च्या फेर्याही वाढू लागल्या आहेत.
दि.19 एप्रिल अखेर 218 कर्मचारी कामावर हजर झाले. अदयापही 32 कर्मचारी येणे बाकी असून ते दि.22 पर्यंत येण्याची शक्यता एस.टी.च्या सुत्रांकडून वर्तविण्यात आली.
तर 31 कर्मचारी बडतर्फ असल्याने ते अपिलात गेले आहेत. सोलापूर मार्गावर प्रति अर्ध्या तासाला 46 फेर्या पुर्ण क्षमतेने सुरु आहेत.
मंगळवेढा -सोलापूरकडे जाणार्या बसेसची वेळ सकाळी 6.00, 6.30, 7.00, 7.30, 8.00, 8.30, 9.00, 9.30, 10.00, 10.30, 11.00, 11.30, 12.00, 12.30, 1.00, 1.30, 2.30, 3.00, 3.30, 4.00, 4.30, 5.00, 5.30, 6.00, 6.30, 7.00, 8.00.
सोलापूरहून मंगळवेढयाकडे येणार्या गाडया-
सकाळी 6.15, 6.45, 7.15, 7.45, 8.30, 9.00, 9.30, 10.00, 10.30, 11.00, 11.30, 12.00, 12.30, 1.00, 1.30, 2.00, 2.30, 3.00, 3.30, 4.30, 5.00,
5.30, 6.00, 6.30, 7.00, 7.30, 8.30. आदी गाडया या वेळेप्रमाणे धावणार आहेत.
पंढरपूर मार्गावर 32 फेर्या असून पंढरपूरहून रात्री 9.00 वा. मंगळवेढयाकडे येणारी शेवटची बस ठेवण्यात आली आहे.
निजामाबाद-1, पुणे -13, कुर्ला-2, चिपळूण -1,नगर -1, बोरिवली 2, आळंदी -1, जत -4 अशा लांब पल्ल्याच्या फेर्या सुरु करण्यात आल्या आहेत.
मंगळवेढा ग्रामीण भागात बठाण,शिरनांदगी,पडोळकरवाडी,नंदूर,सिध्दापूर,अरळी,मारोळी,लवंगी,रेवतगाव आदी ठिकाणी एस.टी.फेर्या चालू केल्या आहेत.
एस.टी.पूर्ण क्षमतेने सुरु झाल्याने बसस्थानक प्रवाशांनी भरून जात असून एस.टी.ला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे स्थानक प्रमुख गुरुनाथ रणे यांनी प्रसिध्दी माध्यमांना सांगून प्रवाशांनी खाजगी वाहनाव्दारे प्रवास न करता एस.टी.ने प्रवास करावा
तसेच विदयार्थी पास,ज्येष्ठ नागरिक,स्मार्ट कार्ड,मासिक व त्रैमासिक पास,चार दिवस व सात दिवस आवडेत तेथे प्रवास याचा लाभ प्रवाशांनी घ्यावा
तसेच प्रासंगिक करारावर लग्न सोहळा,धार्मिक कार्यक्रम आदींना बसेस देणेस प्रारंभ झाला असून संबंधितानी महामंडळाकडे नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज