टीम मंगळवेढा टाइम्स ।
लवंगी (ता.मंगळवेढा) येथील भैरवनाथ शुगर वर्क्स लि.,यूनिट नं. 03 चे व्हा.चेअरमन मा.अनिल सावंत यांचा वाढदिवस कारखाना कार्यस्थळावर उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी कारखान्याच्या वतीने स र्व अधिकारी व कर्मचारी यांचे वतीने मा.अनिल(दादा) सावंत यांचा यथोचित वाढदिवस साजरा करण्यात आला.
त्याच बरोबर लवंगी, सलगर, शिवनगी, उमदी,हुलजंती व पंचक्रोशीतील विविध मान्यवरांनेही अनिल (दादा) सावंत यांचे अभिष्टचिंतन केले.
वाढदिवसानिमित्य कारखाना कार्यस्थळावर श्री.लहू ढगे यांचा सुगम संगीताचा कार्यक्रम घेण्यात आला व मुक्ताई मतिमंद व मुकबधिर शाळेत मुलांना खाऊ वाटप करण्यात आले. तसेच लवंगी व सलगर येथे पाणपोईचे उद्घघाटन मा.अनिल सावंत यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी भैरवनाथ शुगरचे जनरल मॅनेजर रविंद्र साळुंखे, नितिन पाटील (पं.स), रामचंद्र जाधव, श्रीपती(आप्पा) माने-सरकार, इंद्रजीत पवार, चंद्रकांत देवकर, तानाजी चव्हाण, रामकृष्ण चव्हाण, तानाजी पवार, गुलाब थोरबोले , ज्ञानेश्वर कोंडूभैरी, आप्पा सावंजी, महादेव देवकर, डॉ.कृष्णांत माने, सुरेश पवार, शिवाजी जाधव, सुरेश गोणे, बंडु शेणवे, शिवशंकर भांजे व पत्रकार बांधव उपस्थित होते.
तसेच भैरवनाथ शुगरचे अधिकारी व कर्मचारी यांनी मा.आनिल सावंत यांचा सत्कार केला.यावेळी सर्व अधिकारी व कर्मचारी, शेतकरी, तोडणी-वाहतूक कंत्राटदार मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज