mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

दहशत! मंगळवेढ्यातील कारखान्याच्या कर्मचाऱ्यास गळा आवळून सुमारे ५० हजाराचा मुद्देमाल लुटला

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
April 6, 2022
in मंगळवेढा
धक्कादायक! राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारावर गोळीबार; थोडक्यात बचावले

टीम मंगळवेढा टाईम्स। 

मंगळवेढा-अकोले या मार्गावर नंबर प्लेट नसलेल्या इंडिका कारमधून आलेल्या दोघांनी दत्तात्रय आप्पा मोटे (वय ४५) या मोटर सायकलस्वारास अडवून

त्याचा गळा धरून खिशातील मोबाईल व रोख रक्कम असा एकूण ४९ हजार ९०० रुपये किमतीचा मुद्देमाल जबरदस्तीने काढून घेवून पोबारा केल्याची घटना घडली असून या प्रकरणी अज्ञात दोघांविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.

दरम्यान, या घटनेचे वृत्त पोलिस निरिक्षक रणजित माने यांना समजताच त्यांनी तात्काळ सर्वत्र नाकाबंदी केली मात्र रात्री उशीरापर्यंत ते दोघेही हाती लागू शकले नाहीत.

पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, यातील फिर्यादी दत्तात्रय मोटे हे युटोपियन साखर कारखाना येथे हेल्पर म्हणून कामास आहेत.

दि.१ रोजी सायंकाळी ४.३० वा . मंगळवेढा येथे किराणा साहित्य खरेदी करण्यासाठी आले. फिर्यादी हे प्लॅटिना (गाडी क्र एम एच १३ सी डब्ल्यू ५७४१) वरून ते गणेशवाडी मार्गे येवून इंडियन ऑईल पंपावरील स्वॅब मशिनवरून ३७ हजार ४०० रुपये काढून

येथे येवून १५०० रुपयांचा किराणा बाजार घेवून उर्वरीत ३९ हजार ५०० रुपये खिशात ठेवून सायंकाळी ७.२० वा. फिर्यादी परत जात असताना

अचानक पांढऱ्या रंगाची इंडिका कार येवून मोटर सायकलच्या आडवी लावल्याने फिर्यादीने ब्रेक लावून मोटर सायकल थांबवली असता कारमधील दोघेजण खाली उतरून त्यातील एकाने शर्टाचे डावे खिशातील मोबाईल काढून घेतला तसेच मोटर सायकलची चावी काढून घेतली.

यावेळी त्या चोरटयाने फिर्यादीचा गळा  धरून त्यातील एकाने पँटच्या खिशात हात घालून ३९ हजार ९०० रुपये काढून घेतले. त्यातील एका आरोपीने फिर्यादीचा गळा धरल्याने दुसरा आरोपी समीर हत्यार लेके आवो असे इंडिका कारकडे बघून मोठयाने बोलला व खिशातील मोबाईल काढून घेतला असल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

या घटनेनंतर ते दोघे चोरटे मंगळवेढयाच्या दिशेने निघून गेले. या इंडिका कारला समोर व पाठीमागे नंबर प्लेट नव्हती.

दरम्यान, या घटनेचे वृत्त समजताच पोलिस निरिक्षक रणजित माने यांनी तात्काळ या घटनेची दखल घेवून पोलिसांच्या मदतीने शहरातील चारी बाजूला नाकाबंदी करून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची तपासणी केली मात्र इंडिका कारवाले ते दोघे चोरटे मिळून आले नाहीत.

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: मंगळवेढा पोलीस स्टेशन

संबंधित बातम्या

जनता संभ्रमात! भगीरथ भालकेंचे नेमकं चाललंय तरी काय, दोन दिवसात दोन वेगवेगळ्या पक्षाकडून भरले अर्ज; पंढरपूर-मंगळवेढ्याच्या जागेबाबत सस्पेन्स आणखी वाढला?

भगीरथदादा आता प्रवास पुरे! ‘पक्षांतराचा प्रवास आता थांबवा’; सिद्धाराम म्हेत्रेंचा भगीरथ भालकेंना रोखठोक सल्ला

April 13, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

मंगळवेढेकरांची प्रतीक्षा आता संपणार ! महात्मा बसवेश्वर स्मारकाची जागा निश्चित; निधी कमी पडू देणार नाही; आमदार समाधान आवताडेंची ग्वाही

April 13, 2026
Breaking! मंगळवेढ्याच्या दोन ‘नायब तहसीलदारां’ची तहसीलदार पदावर पदोन्नती

संतापजनक! घरजागा नावावर करण्यास नकार; पोटच्या मुलानेच वृद्ध आईला घराबाहेर हाकलले; न्यायासाठी वृद्धेची पोलिस अधीक्षकांकडे धाव

April 12, 2026
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड, १० लाख रुपयांचे बक्षीस; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा होणार सन्मान

Breaking! मंगळवेढ्यात शासकीय नियमांची ऐशीतैशी; दालनात वाढदिवस साजरा करणे पडणार महागात; गटविकास अधिकारी यांचा अहवाल सादर करण्याचे पुण्यातून फर्मान

April 12, 2026
तगडा उमेदवार! पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा; भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत निवडणूक लढवणार?

अनिल सावंत ‘स्वगृही’ तर भालके ‘नाथांच्या’ चरणी; मंगळवेढा-पंढरपूरच्या राजकारणात ‘विठ्ठल’ कोणाला पावणार?

April 12, 2026
प्रियकराच्या सांगण्यावरूनच जन्मदात्या आईने 9 महिन्याच्या बाळाचा गळा घोटला

मोठी बातमी! मंगळवेढ्यात सख्खा भाऊच बनला ‘यमदूत’; कुऱ्हाडीच्या एका वाराने होत्याचे नव्हते झाले; खुनामागचं खरं कारण वाचून अंगावर येईल काटा

April 11, 2026
एकाच छताखाली २५ स्टॉल्स, सेवांचा पाऊस; एकाच दिवशी तब्बल ‘इतके’ हजार लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य उमटले; पाटकळ महसूल विभागात विक्रमी कामकाज

एकाच छताखाली २५ स्टॉल्स, सेवांचा पाऊस; एकाच दिवशी तब्बल ‘इतके’ हजार लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य उमटले; पाटकळ महसूल विभागात विक्रमी कामकाज

April 11, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

कारागृहातील ‘यारी’ पडली भारी! मंगळवेढ्यात भरदिवसा निर्जन स्थळी थरार; ३ लाखांचे दागिने आणि रोकड लंपास; गुन्हेगारांचे धाडस वाढले

April 11, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

मोठी बातमी! माजी सरपंचाची टोकाच्या पाऊलाने जीवनयात्रा संपली; विकासाचा ‘बालेकिल्ला’ ढासळला; मंगळवेढा तालुक्यात खळबळ

April 10, 2026
Next Post
राजमाता अर्बन बँक रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; दामाजी चौकात बँकेची 24 तास ATM सेवा सुरू

राजमाता अर्बन बँक रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; दामाजी चौकात बँकेची 24 तास ATM सेवा सुरू

ताज्या बातम्या

जनता संभ्रमात! भगीरथ भालकेंचे नेमकं चाललंय तरी काय, दोन दिवसात दोन वेगवेगळ्या पक्षाकडून भरले अर्ज; पंढरपूर-मंगळवेढ्याच्या जागेबाबत सस्पेन्स आणखी वाढला?

भगीरथदादा आता प्रवास पुरे! ‘पक्षांतराचा प्रवास आता थांबवा’; सिद्धाराम म्हेत्रेंचा भगीरथ भालकेंना रोखठोक सल्ला

April 13, 2026
दुर्दैवी घटना! सांगोल्यातील ‘या’ गावात दोन बहिणींचा शेततळ्यात बुडून मृत्यू

काळीज पिळवटून टाकणारी घटना! शेततळ्यात बुडून बहीण-भावाचा अंत; आजीसमोरच काळाचा घाला; सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

April 13, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

मंगळवेढेकरांची प्रतीक्षा आता संपणार ! महात्मा बसवेश्वर स्मारकाची जागा निश्चित; निधी कमी पडू देणार नाही; आमदार समाधान आवताडेंची ग्वाही

April 13, 2026
Breaking! मंगळवेढ्याच्या दोन ‘नायब तहसीलदारां’ची तहसीलदार पदावर पदोन्नती

संतापजनक! घरजागा नावावर करण्यास नकार; पोटच्या मुलानेच वृद्ध आईला घराबाहेर हाकलले; न्यायासाठी वृद्धेची पोलिस अधीक्षकांकडे धाव

April 12, 2026
न्यूरोसर्जन डॉ.शिरीष वळसंगकर प्रकरणाला वेगळं वळण; आरोपी महिलेच्या वकिलाचा मोठा खुलासा

बापरे..! सोलापुरातील वकिलास जीएसटीची १२१ कोटी दंडाची नोटीस; काय आहे नेमके प्रकरण?

April 12, 2026
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड, १० लाख रुपयांचे बक्षीस; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा होणार सन्मान

Breaking! मंगळवेढ्यात शासकीय नियमांची ऐशीतैशी; दालनात वाढदिवस साजरा करणे पडणार महागात; गटविकास अधिकारी यांचा अहवाल सादर करण्याचे पुण्यातून फर्मान

April 12, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..