टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा येथील दामाजी चौकामध्ये असलेले राजमाता अर्बन को-ऑप बँक ही रोपे महोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहे.
त्यानिमित्ताने बँकेने 24 तास एटीएम सेवा सुरू केल्याची माहिती बँकेचे व्यवस्थापक नवनाथ दिवसे यांनी दिली आहे.
गेली 25 वर्ष राजमाता अर्बन को-ऑप बँक ग्राहक, सभासद व हितचिंतकांच्या जोरावर बँकेने आजपर्यंत तत्पर सेवा दिली असून खातेदारांची व ग्राहकांची हक्काची बँक म्हणून राजमाता अर्बन को-ऑप बँकेकडे पाहिले जाते.
चेअरमन डॉ.अशोक सुरवसे, व्हा.चेअरमन प्रकाश वणगे व सर्व संचालक मंडळाने या बँकेच्या माध्यमातून शेतकरी, व्यापारी, कष्टकरी यांना मानाचे स्थान दिले आहे.
राजमाता अर्बन को-ऑप बँकेच्या ‘या’ आहेत तत्पर सेवा
ठेवींवर व कर्जावर आकर्षक व्याजदर मिळवून देणारी अग्रगण्य बँक आहे.
RTGS व NEFT ची ग्राहकांना जलद सेवा देणारी बँक., सोने तारण कर्जाची सोय, कोअर बँकिंग,
सिटीएस चेकबुक सुविधा तसेच मासिक त्रैमासिक व्याज प्राप्त ठेव योजना सुध्दा बँकेने उपलब्ध करून दिली आहे.
हॉटेल बाळकृष्ण शेजारी राजमाता अर्बन को-ऑप बँकेने नागरिकांच्या सोयीसाठी 24 तास एटीएम सेवा सुरू केली आहे त्यामुळे नागरिकांच्या वेळेची बचत होणार आहे.
सायकल चालवा इंधन वाचवा, पर्यावरण संरक्षण आरोग्य संवर्धन हे ब्रीदवाक्य घेऊन राजमाता अर्बन को-ऑप बँक गेली 25 वर्ष तत्परसेवा ग्राहकांना देत आहे.
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज