टीम मंगळवेढा टाईम्स ।
एकवीस वर्षीय तरूणीस लग्नाचे व शिक्षण पूर्ण करण्याचे अमिष दाखवून वेळोवेळी जबरी शारिरिक संबंध ठेवल्याप्रकरणी
काळू कोंडूभैरी याच्यासह शिवीगाळी , दमदाटी केल्याप्रकरणी रितेश कोंडुभैरी , बाळासाहेब कोंडुभैरी ( सर्व रा . भिमनगर ) या तीघांविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, यातील २१ वर्षीय पिडीत मुलीस वरील आरोपी काळू कोंडुभैरी याने शिक्षण पूर्ण करण्याचे तसेच पिडीतेबरोबर लग्न करण्याचे व सांभाळ करण्याचे
अमिष दाखवून २०२० पासून ते ३ मार्च २०२२ पर्यंत मंगळवेढा व मुंबई येथे शारिरिक संबंध ठेवले.
तसेच पिडीत मुलगी मुंबई येथे गेल्यानंतर आरोपीने पाठीमागे येवून पिडीतेच्या बहिणीला व
तीचे मुलाला जीवे मारण्याची फोनवरून धमकी दिली असल्याचे दिलेल्या फिर्यादीत पिडीतेने म्हटले आहे. अधिक तपास पोलिस उपनिरिक्षक शेटे हे करीत आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज