टीम मंगळवेढा टाईम्स ।
सोलापूर जिल्हा दूध उत्पादक प्रक्रिया संघाच्या अध्यक्षपदी माढ्याचे आमदार बबनराव शिंदे यांचे पुत्र रणजितसिंह शिंदे यांची तर उपाध्यक्ष पदी दिपक माळी यांची बिनविरोध निवड झाली.
निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे यांनी पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहिले.
सोमवारी सायंकाळी शहरातील राष्ट्रवादी भवन मध्ये आमदार बबनराव शिंदे, माजी मंत्री दिलीप सोपल यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीला आमदार संजयमामा शिंदे, माजी आमदार राजन पाटील,दिलीप माने,
दीपक साळुंखे, सुरेश हसापुरे, रश्मी बागल, बबनराव आवताडे, चंद्रकांत देशमुख या नेत्यांची उपस्थिती होती. या बैठकीत अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची नावे निश्चित करण्यात आली.
मंगळवारी पीठासीन अधिकारी कुंदन भोळे यांच्या अध्यक्षतेखाली दूध संघाच्या कार्यालयात नूतन संचालक मंडळाची विशेष सभा घेण्यात आली.
या बैठकीला रणजितसिंह शिंदे, बबनराव आवताडे, दीपक माळी, मनोज गरड, अलका चौगुले, बाळासाहेब माळी, राजेंद्र मोरे, संभाजी मोरे, विजय येलपले, मारुती लवटे, औदुंबर वाडदेकर, वैशाली शेंबडे,
योगेश सोपल, निर्मला काकडे, छाया ढेकणे, राजेंद्रसिंह पाटील, हे 16 संचालक उपस्थित होते.
अध्यक्ष म्हणून रणजितसिंह शिंदे यांच्या अर्जावर सूचक म्हणून औदुंबर वाडदेकर, अनुमोदक विजय येलपले यांनी सही केली तर उपाध्यक्ष पदासाठी दीपक माळी यांचा एकमेव अर्ज आला.
त्यांच्या अर्जावर सूचक म्हणून मनोज गरड तर अनुमोदक बाळासाहेब माळी यांनी सही केली. अर्ज छाननीत दोन्ही अर्ज वैध ठरले.
त्यामुळे भोळे यांनी या दोघांची बिनविरोध निवड जाहीर केली.सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून आबासाहेब गावडे यांनी काम पाहिले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज