mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

राजे जिंकले! छत्रपती संभाजी राजेंच्या उपोषणापुढे ठाकरे सरकार नमले; सर्व मागण्या मान्य

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
February 28, 2022
in राज्य
राजे जिंकले! छत्रपती संभाजी राजेंच्या उपोषणापुढे ठाकरे सरकार नमले; सर्व मागण्या मान्य

टीम मंगळवेढा टाईम्स ।

ठाकरे सरकारने सर्व मागण्या मान्य केल्यानंतर अखेर खासदार संभाजी छत्रपती यांनी आज उपोषण मागे घेतले. तीन दिवसानंतर त्यांनी उपोषण मागे घेतले.

राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील आणि सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांनी संभाजी राजे यांची आझाद मैदानात भेट घेऊन त्यांच्या मागण्या मान्य केल्याचं लेखी उत्तर दिलं.

तसेच एकनाथ शिंदे यांनी या मागण्या सर्वांसमोर वाचून दाखवल्या. एवढेच नव्हे तर संभाजीराजे यांनी केवळ सात मागण्या केल्या होत्या, आम्ही त्यात आणखी मागण्यांची भर घालून त्या पूर्ण केल्या आहेत.

काहीच ठेवायचं नाही असा निर्णयच सरकारने घेतला असून या सर्व मागण्या मार्गी लावण्यात येत असल्याचं शिंदे यांनी सांगितलं. त्यानंतर संभाजीराजे यांनी उपोषण मागे घेत असल्याचं जाहीर केलं.

खासदार संभाजी छत्रपती यांनी राज्यसरकारकडे सात मागण्या केल्या होत्या. मात्र या मागण्या मान्य झाल्या नव्हत्या. त्यामुळे संभाजी छत्रपती यांनी उपोषण करण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार त्यांनी उपोषणही सुरू केलं होतं. आज त्यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस होता. त्यांचा रक्तदाबही वाढला होता.

सरकारकडून चर्चेला येण्याचं त्यांना निमंत्रण दिलं होतं. मात्र, राजेंनी चर्चेला जाण्यास नकार दिला होता. शिष्टमंडळाला त्यांनी सरकारकडे चर्चेला पाठवलं.

त्यानंतर गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांनी आझाद मैदानात जाऊन सरकारने दिलेलं लेखी आश्वासन संभाजी राजेंना वाचून दाखवलं. त्यानंतर या तिन्ही मंत्र्यांनी राजेंना उपोषण मागे घेण्याची विनंती केली.

मागण्या मान्य झाल्याने संभाजी राजे यांनी लहान मुलाच्या हस्ते ज्युस पिऊन उपोषण सोडलं. त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नीनेही तीन दिवस काहीच खाल्लं नव्हतं. त्यांनाही ज्युस देऊन संभाजीराजेंनी त्यांचंही उपोषण सोडलं.

या मागण्या मान्य

सारथीकडून कौशल्य विकासाचे कार्यक्रम एका महिन्यात सुरू करण्यात येईल. सारथीच व्हीजन डॉक्युमेंट 30 जूनपर्यंत ठेवलं जाईल.

सारथीतील पदं ही 30 जूनपर्यंत भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सारथीच्या उपकेंद्रासाठी जमीन देण्याचा प्रस्ताव 15 मार्च पर्यंत ठेवला जाईल.

अण्णासाहेब पाटील महामंडळाला 100 कोटी निधी उपलब्ध करण्याचा निर्णय घेतलाय. कर्जाची मुदत ही 10 लाख रुपये होती ती 15 लाख रुपये केलीये. 15 मार्चपर्यंत संचालक मंडळांची नियुक्ती केली जाईल.

उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून यादी घेऊन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वसतिगृह सुरू करण्यात येईल.

कोपर्डीतील घटनेतील केस महाधिवक्त्यांकडून मेंशन करण्यात येईल म्हणजे ही केस बोर्डावर आणली जाईल.
मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासाठी प्रत्येक महिन्याला बैठक घेण्यात येईल.

तसेच या आंदोलनात ज्यांचा सहभाग नव्हता त्यांच्यावरील गुन्हे मागे घेतले जातील. सीसीटीव्ही फुटेज पाहून हा निर्णय घेतला जाईल.

मराठा आंदोलनात मृत पावलेल्या 18 जणांना नोकऱ्या मिळाल्यात. इतरांना ताबडतोब नोकरी देण्याचा निर्णय घेतला.

स्थिगितीपूर्वी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना निवडीचा पर्याय देऊन अधिसंख्येची पदं निर्माण करून त्या भरण्याची संभाजी राजेंची मागणी होती. याबाबत एका महिन्यात मंत्रीमंडळासमोर हा प्रस्ताव ठेवला जाईल.(स्रोत:TV9 मराठी)

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: संभाजीराजे छत्रपती

संबंधित बातम्या

बळीराजाला मोठा दिलासा! शेतकरी कर्जमाफीची घोषणा; देवेंद्र फडणवीसांची घोषणा; कोणाचे कर्ज होणार माफ?

बळीराजाला मोठा दिलासा! शेतकरी कर्जमाफीची घोषणा; देवेंद्र फडणवीसांची घोषणा; कोणाचे कर्ज होणार माफ?

June 2, 2026
विद्यापीठाची पोलिसात धाव, अंतिम परीक्षेवर सायबर अटॅक

कामाची बातमी! व्हॉट्सअपवर लग्नाची पत्रिका अन् धोका, तुमचं बँक अकाऊंट होऊ शकतं रिकामं; सायबर पोलिसांकडून महत्त्वाचं आवाहन

June 1, 2026
महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

शेतकऱ्यांनो! सरकारने दिली बळीराजांची चिंता वाढविणारी अपटेड; मान्सून लांबणार, पेरणीची घाई करू नका…

June 1, 2026
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पांडुरंग परिवाराकडून गावोगावी बैठकांचे सत्र सुरू; विधानसभेसाठी मोर्चेबांधणी की…; कार्यकर्त्यांकडून असा आग्रह

सोलापूर विधानपरिषदेत भाजपचा मोठा डाव; प्रशांत परिचारकांना डावलून राजेंद्र राऊतांना उमेदवारी, परिचारक गट नाराज?

June 1, 2026
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

जमिनीच्या तुकड्यासाठी कोर्टाची पायरी चढणाऱ्यांनी एकदा वाचाच; वडिलांच्या निधनानंतर मुलांनी घराच्या अंगणातच केलं असं काही पंचक्रोशीतून होतंय प्रचंड कौतुक

June 1, 2026
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

मनोज जरांगेंनी लढाई जिंकली, उपोषण सोडलं; सरकारकडून मागण्या मान्य; अंतरवालीत मध्यरात्री काय घडलं?

May 31, 2026
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पांडुरंग परिवाराकडून गावोगावी बैठकांचे सत्र सुरू; विधानसभेसाठी मोर्चेबांधणी की…; कार्यकर्त्यांकडून असा आग्रह

ब्रेकिंग न्यूज! सोलापूर विधान परिषदेसाठी प्रशांत परिचारक फायनल? अधिकृत घोषणा बाकी; मात्र भाजपच्या ‘त्या’ नेत्याच्या एन्ट्रीने सस्पेन्स वाढला

May 30, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

तब्बल पावणे सतरा लाखांचा गैरव्यवहार; ग्रामपंचायतीच्या सरपंचांचे थेट निलंबन, विभागीय आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय

May 30, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

मेहनत विद्यार्थ्यांची, मलिदा चोरांचा! NEET पेपरफुटीच्या टेन्शनमुळे १९ वर्षांच्या तरुणाची आत्महत्या; डॉक्टर होण्याचे स्वप्न भंगले

May 30, 2026
Next Post

उन्हाळा महोत्सव आणि लोन मेळावा! अमर इलेक्ट्रॉनिक्स & मोबाईल शॉपीमधून आता फक्त 1 रुपया भरून खरेदी करा A.C आणि महिना भरा फक्त 1950 रुपये

ताज्या बातम्या

बळीराजाला मोठा दिलासा! शेतकरी कर्जमाफीची घोषणा; देवेंद्र फडणवीसांची घोषणा; कोणाचे कर्ज होणार माफ?

बळीराजाला मोठा दिलासा! शेतकरी कर्जमाफीची घोषणा; देवेंद्र फडणवीसांची घोषणा; कोणाचे कर्ज होणार माफ?

June 2, 2026
चमकदार कामगिरी! सोलापूर पोलिसांनी उध्वस्त केला बनावट नोटांची छपाई करणारा अड्डा

खळबळ! कर्नाटक हादरवणारे गोविंदपूर हत्याकांड; सिद्धापूर कनेक्शन’ उघड, पोलिसांकडून एका संशयिताला अटक

June 2, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

मदरशात धार्मिक शिक्षणाच्या नावाखाली अश्लील चाळे; सोलापूरच्या नराधम मौलानाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या; पीडितांचा आकडा वाढण्याची भीती

June 2, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

धक्कादायक! पंढरपूरनजीकच्या ‘त्या’ विचित्र अपघाताने हिरावला उमदा तरुण; मंगळवेढ्यातील भावी वकिलाची मृत्यूशी झुंज अपयशी

June 2, 2026
बडा मासा! मंगळवेढा प्रांत कार्यालयातील तलाठी निघाला लाचखोर; लाचेची रक्कम घेऊन केला पोबारा; लाच कुणाच्या सांगण्यावरून?

मोठी बातमी! जन्म दाखल्याच्या ऑर्डरसाठी २ हजारांची लाच घेताना महसूल सहाय्यकाला रंगेहाथ पकडले

June 2, 2026
विद्यापीठाची पोलिसात धाव, अंतिम परीक्षेवर सायबर अटॅक

कामाची बातमी! व्हॉट्सअपवर लग्नाची पत्रिका अन् धोका, तुमचं बँक अकाऊंट होऊ शकतं रिकामं; सायबर पोलिसांकडून महत्त्वाचं आवाहन

June 1, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा