टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर शहरातील कोरोनाचा संसर्ग अद्यापही संपला नसून आज 54 जणांचे रिपोर्ट पाझिटिव्ह आले आहेत. तर दोघांचा मृत्यू झाला आहे. व सोलापुरातील मध्यवर्ती कारागृहात दोन दिवसांपूर्वी दाखल झालेल्या दोन कैदी पॉझिटिव्ह आले असून त्यांना विलगीकरण कक्षात हलविण्यात आले आहे.एकूण बाधितांची संख्या 6 हजार 505 वर गेली आहे. Another 54 new corona patients were found in the city of Solapur, killing two
आज ‘या’ परिसरात आढळले नवे कोरोना बाधित
सैनिक सोसायटी (विजयपूर रोड), कविता नगर पोलिस लाईन, संजय नगर (विजापूर नाका), तुकाराम अपार्टमेंट (चांदणी चौक), रेल्वे लाईन, हिरेहब्बू कॉम्प्लेक्सजवळ (बाळीवेस), मुमताज नगर (कुमठा नाका), बनशंकरी नगर, शुक्रवार पेठ, आसरा सोसायटी (सुरवसे शाळेजवळ), रामवाडी, लक्ष्मी नगर (बाळे), अक्षय सोसायटी, व्हीएमजीएससी महिला हॉस्टेल, जोडभावी पेठ, सोनी सिटी (दमाणी नगर), जुनी मिल चाळ, हरिपदम रेसिडेन्सी (सम्राट चौक), सोलापूर जेल, भूषण नगर, रेल्वे क्वॉर्टर, भवानी पेठ, चित्तूरचनम्मा नगर (सैफूल), दाजी पेठ, नटराज सोसायटी, धर्मराज नगर (शेळगी) ,
तर यशवंत हौसिंग सोसायटी (कुमठा नाका), श्रध्दा एम्पायर (रेल्वे लाईन), न्यू पाच्छा पेठ, भारती विद्यापीठजवळ (जुळे सोलापूर), बसवेश्वर नगर, अंत्रोळीकर नगर (होटगी रोड), उमा नगरी, आकाशवाणी केंद्राजवळ (एमआयडीसी), रंचना सोसायटी (आसरा), शरयू श्रीकांत नगर, साखर पेठ, सैफूल, वैष्णवी नगर, हत्तुरे वस्ती, आदित्य नगर, सोरेगाव, जवान नगर येथे आज नव्या रुग्णांची भर पडली.
आज ‘या’ परिसरातील दोघांचा मृत्यू
विजयपूर रोडवरील नम्रता सोसायटीतील 52 वर्षीय पुरुष, तर भवानी पेठेतील 44 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला आहे.
Another 54 new corona patients were found in the city of Solapur, killing two
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज