टीम मंगळवेढा टाईम्स ।
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या सोलापूर जिल्हा शाखेच्या वतीने पंढरपूर विभागातील कार्यकर्त्यांसाठी मरवडे येथे रविवार दि. १३ रोजी एक दिवसाचे प्रेरणा शिबीर आयोजित करण्यात आल्याची माहिती शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष अनिल कादे यांनी दिली.
न्यायाची चाड व अन्यायाची चीड हे ब्रीद घेऊन गेल्या सहा दशकांपासून संपूर्ण महाराष्ट्रात शिक्षक समिती कार्यरत आहे. १९६० च्या दशकात सोलापूरचे स्व.वि.भा.येवले यांनी या संघटनेच्या स्थापनेत मोठे योगदान दिले होते.
महाराष्ट्रातील प्रख्यात विचारवंत स्व.दत्तो वामन पोतदार यांनी पहिले अध्यक्ष म्हणून तर स्व.येवले यांनी सरचिटणीस म्हणून धुरा सांभाळली होती. त्या काळांपासून शिक्षक समिती या चळवळीवर प्रेम करणारे हजारो कार्यकर्ते सोलापूर जिल्ह्यात देखील कार्यरत आहेत.
संघटनेचे कार्य व ध्येय्य धोरणे तळागाळापर्यंत पोहचविण्याचे काम तालुका शाखांतील केंद्र संघटकच्या माध्यमातून होत असते. संघटनेचा कणा असलेल्या कार्यकर्त्यांची बांधणी व सकारात्मक ऊर्जा देण्याचे अभियान शिक्षक समितीने हाती घेतल्याचे जिल्हा सरचिटणीस अमोगसिद्ध कोळी यांनी सांगितले.
त्याचाच एक भाग म्हणून पंढरपूर विभागातील चार तालुका शाखांतील तालुका कार्यकारिणी पदाधिकारी, महिला आघाडी पदाधिकारी व तालुका शिक्षक पतसंस्थांचे संचालक अशा प्रमुख २०० कार्यकर्त्यांचे पहिल्या टप्प्यात प्रेरणा शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
शिक्षक समितीचे राज्यनेते सुरेश पवार यांच्या निवासस्थानी रविवार दि. १३ रोजी स.११ ते ४ या वेळेत ही कार्यशाळा होणार आहे.
यामध्ये तालुका शाखांचा कार्य आढावा, संघटना बांधणी, राज्य व जिल्हा शिक्षक समितीचे कार्य, संघटनात्मक कार्याचा प्रचार – प्रसार ,आगामी काळासाठी ध्येय धोरणे या विषयावर दोन सत्रात मार्गदर्शन केले जाणार आहे.
याशिवाय कार्यकर्त्यांकडून प्राप्त होणाऱ्या सूचना , प्रश्न व उपक्रमांचे संकलन देखील करण्यात येणार आहे.
त्याचबरोबर दुसऱ्या सत्रात मोहोळ येथील मनोहरभाऊ डोंगरे प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या नूतन संचालक मंडळाचा सत्कार करण्यात येणार असून मंगळवेढ्यातील वैद्यकीय शिक्षण प्रवेश पात्र तसेच शिष्यवृत्ती धारक शिक्षक पाल्यांचा सत्कार देखील करण्यात येणार आहे.
हे शिबीर यशस्वी करण्यासाठी तालुकाध्यक्ष विठ्ठल ताटे (मंगळवेढा ) सुनिल कोरे (पंढरपूर ) भारत लवटे ( सांगोला ) , धर्मराज चवरे ( मोहोळ ) यांच्यासह स्थानिक मंगळवेढा शाखेतील प्रमुख कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज