टीम मंगळवेढा टाईम्स ।
पुणे जिल्ह्यात वाबळेवाडी येथे आंतराष्ट्रीय शाळा उभी करणारे शिक्षक दत्तात्रय वारे यांना अनियमिततेचा ठपका ठेवून पुणे जिल्हा परिषदेने निलंबित केले आहे.
नाविण्यपूर्ण काम करणाऱ्या उपक्रमशील शिक्षकांवर अन्याय करणाऱ्या या कारवाईच्या निषेधार्थ दि.२३ डिसेंबर रोजी सोलापूर जिल्ह्यातील सर्व शिक्षक काळ्या फिती लावून काम करणार असल्याची माहिती शिक्षक समितीचे सोलापूर जिल्हाध्यक्ष अनिल कादे यांनी दिली.
महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्रात पुणे जिल्ह्यातील वाबळेवाडी शाळेने एक वेगळा इतिहास निर्माण केला असून ती आंतरराष्ट्रीय शाळा म्हणून लौकिकपात्र ठरली आहे.
शिवाय अनेकविध उपक्रमांमुळे महाराष्ट्रातील शिक्षकांचे प्रेरणास्थान झाली असून एक लाखापेक्षा जास्त शिक्षक आणि शिक्षण प्रेमींनी या शाळेला भेट दिली आहे.
या शाळेतील शिक्षक दत्तात्रय वारे यांना शैक्षणिक कार्यासाठी राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
मात्र स्थानिक राजकीय विवादातून वारे यांचेवर अनियमिततेचा ठपका ठेवून निलंबित करण्यात आले आहे.
‘तुम्ही जर नाविण्यपूर्ण, वेगळे काम कराल, तुमचा दत्तात्रय वारे होईल ‘ अशी म्हण आज शिक्षण व्यवस्थेत रुढ होवू लागली आहे.
दत्तात्रय वारे हे राज्याच्या शिक्षण क्षेत्रातील उपक्रमशीलतेचा चेहरा बनले आहेत. त्यांनाच निलंबित करुन अपमानित केल्यामुळे शिक्षकांत निराशेचे वातावरण पसरले आहे.
सोलापूर जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या मनांमध्ये देखील या संदर्भात मोठी अस्वस्थता दिसून येत आहे.
या असंतोषाला वाट करुन देण्यासाठी व या संपूर्ण प्रकाराची योग्य ती चौकशी होवून न्याय मिळावा या मागणीसाठी गुरुवार दि. 23 डिसेंबर रोजी जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शिक्षक बांधवांनी दिवसभर काळ्या फिती लावून शैक्षणिक कार्य करावे असे आवाहन शिक्षक समितीचे नेते राजेंद्र नवले, दयानंद कवडे, सुरेश पवार,
विकास उकिरडे, भारत कुलकर्णी , राजन सावंत, अमोघसिद्ध कोळी,बसवराज गुरव, सिद्धराम बिराजदार, प्रताप काळे, संतोष हुमनाबादकर, शिवानंद बिराजदार, चंद्रहास चोरमले, रंगनाथ काकडे, रमेश खारे ,
राजन ढवण, दयनंद चव्हाण यांच्यासह शिक्षक समितीच्या तालुका शाखांचे पदाधिकारी शंकर अजगोंडा, राजकुमार व्हटकर, बाबा माने,भारत लवटे, रामराजा ताकभाते, आदिनाथ देवकते, धर्मा चवरे, कैलास काशीद, सुनिल कोरे, शरद रुपनवर, विठ्ठल ताटे यांनी केले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज