टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील तांडोर येथे मागील भांडणाचा राग मनात धरून 35 वर्षीय इसमाच्या कपाळावर कोयत्याने मारून गंभीर जखमी केल्याप्रकरणी अजय कल्लाप्पा मळगे,कल्लाप्पा आण्णाप्पा मळगे या दोघांविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी,यातील फिर्यादी तथा जखमी शिवानंद मारुती मळगे व वरील आरोपी यांच्यात दि.5 रोजी रात्री 8.30 वा.सकाळी झालेल्या मागील भांडणाचा राग मनात धरून
फिर्यादीच्या कपाळावर कोयत्याने मारून गंभीर जखमी केले.तसेच शिवीगाळ,दमदाटी केल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.अधिक तपास पोलिस नाईक हेंबाडे हे करीत आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज