mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

MPSC भरतीची कधी निघणार जाहिरात; उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली माहिती

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
September 25, 2021
in राज्य, शैक्षणिक
MPSC भरतीची कधी निघणार जाहिरात; उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली माहिती

टीम मंगळवेढा टाईम्स ।

MPSC भरती प्रक्रिया या वर्षी होणार की नाही? अशी शंका असणाऱ्या स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. एमपीएससीची जाहिरात पुढील वर्षी निघेल, अशा चर्चा होत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी MPSC भरतीबाबत महत्वाची माहिती दिली आहे.

एमपीएससी रिक्त पदांच्या भरतीला मान्यता देण्यात आली आहे. ३० सप्टेंबरपर्यंत विविध विभागातील किती पदे भरायचे आहेत, याविषयी माहिती द्यावी, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी त्या-त्या विभागाला दिले आहेत.

याबाबत माहिती देताना अजित पवार म्हणाले की, भरती प्रक्रियेबात एमपीएससीच्या सचिवांशी चर्चा झाली. त्यावेळी रिक्त पदांची माहिती मिळालीय.

ज्या काही याद्या असतील ती पदे आम्ही भरू. त्यानुसार जाहिरीती निघतील. रिक्त पदांची माहिती देण्याचे सर्व विभागांना मुख्यमंत्र्यांचे आदेश आहेत. ३० सप्टेंबरपर्यंत सर्व रिक्त पदांची माहिती देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

सैनिक भरतीत युवक-युवतींना स्थान मिळेल, असेही ते म्हणाले. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची 15 हजार 511 पदांची भरती अखेर जाहीर झाली आहे. राज्य शासनाचे साधारणपणे तीन टक्के कर्मचारी दरवर्षी निवृत्त होतात.

चार-पाच वर्षांपासून राज्यातील भरती प्रक्रिया बंद असल्याने रिक्त पदांची संख्या वाढली आहे. त्यामुळे कर्मचार्‍यांवर अतिरिक्त कामाचा ताण वाढला असून शासकीय कामकाजावर परिणाम होत आहे.

ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन विविध खात्यांतील रिक्‍त पदांची माहिती तत्काळ संकलित करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले होते. या भरतीची घोषणा त्यांनी विधिमंडळ अधिवेशनातच केली होती.

त्यानुसार गट अ, गट ब व गट क श्रेणीतील कार्यकारी पदे भरतीप्रक्रियेद्वारे तातडीने उपलब्ध करुन देण्यात आली आणि 2018 पासूनच्या एकूण 15 हजार 511 पदांच्या भरतीस मान्यता मिळाली.

दरम्यान, राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२० ची तारीख जाहीर जाहीर करण्यात आली आहे. येत्या चार डिसेंबरला ही परीक्षा घेतली जाईल. याबाबत आयोगाकडून परिपत्रक प्रसिद्ध केले आहे.

आयोगाने परिपत्रकात म्हटल्याप्रमाणे, राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२० दिनांक ४, ५ व ६ डिसेंबर, २०२१ रोजी मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती व नागपूर या जिल्हाकेंद्रावर घेण्यात येणार आहे. तसेच, अधिक तपशिलासाठी आयोगाच्या संकेतस्थळावरील अधिसूचनेचे अवलोकन करावे, अशी माहिती देण्यात आली आहे.

राज्य शासनाच्या सेवेतील विविध संवर्ग/ सेवांमधील भरतीकरीता आयोगामार्फत दिनांक २१ मार्च २०२१ रोजी घेण्यात आलेल्या राज्य सेवा पूर्व परीक्षा-२०२० च्या दिनांक ६ सप्टेंबर २०२१ रोजी जाहीर करण्यात आलेल्या निकालाआधारे,

मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र उमेदवारांची राज्य सेवा मुख्य परीक्षा २०२०, दिनांक ४, ५ व ६ डिसेंबर २०२१ रोजी अमरावती, औरंगाबाद, मुंबई, नागपूर, नाशिक व पुणे जिल्हा केंद्रावर घेण्यात येणार आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: उपमुख्यमंत्री अजित पवारएमपीएससी

संबंधित बातम्या

ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

ग्रामपंचायत निवडणुकांचा बिगुल वाजला! मतदार यादीचा अधिकृत कार्यक्रम जाहीर; ‘या’ तारखेला प्रसिद्ध होणार प्रारूप यादी

July 16, 2026
मोठी बातमी! वर्षाला ‘इतके’ गॅस सिलिंडर मोफत देणार; युती सरकार आणा, पुढील 5 वर्षे वीज मोफत.; भरसभेत अजित पवारांची मोठी घोषणा

अजित पवारांच्या जयंतीचा समावेश राष्ट्रपुरुष आणि थोर पुरुषांच्या यादीत, दादांची जयंती शासकीय कार्यालय, शाळा-महाविद्यालयात साजरी होणार; ‘या’ तारखेला राज्यभर पहिली शासकीय जयंती

July 16, 2026
‘मी देवेंद्र फडणवीस शपथ घेतो की.’, महाराष्ट्रात ‘देवेंद्र’ पर्वाला सुरुवात; आजपासूनच फडणवीस यांच्यापुढे असतील ‘हे’ 5 आव्हान

कर्जमाफीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा, शेतकऱ्यांची वीजबिलाची पाटी कोरी केली, जुनं वीजबिलही…

July 15, 2026
मोठी बातमी! ‘त्या ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा, कारवाई सुरू; ‘या’ जिल्ह्यात जे झालं…

लाडक्या बहिणीं’ची प्रतीक्षा वाढली! जूनचा हप्ता जमा न झाल्याने महिलांची बँकेत चकरा; कधी मिळणार पैसे? लगेच करा ‘हे’ काम; अन्यथा हप्ता अडकू शकतो

July 15, 2026
धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

भयंकर! लग्नामध्ये सत्कारात नाव पुकारला नाही, रागाच्या भरात तलाठ्यानं तरुणाच्या डोक्यात टाकला लोखंडी माईक

July 14, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

भेसळीच्या विळख्यातून महाराष्ट्राला वाचवण्यासाठी तुकाराम मुंढेंचा ‘हा’ मास्टरप्लॅन; नागरिकांना केली मोठी विनंती

July 14, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

कागदपत्रे बनावट, विद्यार्थीही खोटे! सोलापुरात केंद्र सरकारच्या योजनेत मोठा गैरव्यवहार; बनावट विद्यार्थी दाखवून केंद्राची शिष्यवृत्ती लाटली

July 11, 2026
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

शेतकऱ्यांसाठी गूडन्यूज! कर्जमाफीच्या दोन अटी केल्या रद्द, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; कुणाला मिळणार फायदा?

July 12, 2026
मोठी बातमी! ‘त्या ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा, कारवाई सुरू; ‘या’ जिल्ह्यात जे झालं…

लाडकी बहीण’ योजनेचे पैसे वाढणार? मोदींच्या सल्लागार परिषदेचा मोठा अहवाल; पण ‘या’ महिलांसाठी चिंतेची बातमी

July 10, 2026
Next Post
मंगळवेढ्यातील दुकानाची वेळ आजपासून ‘ही’ असणार, ‘या’ नियमांचे असणार बंधन

मंगळवेढा नगरपरिषदेस विविध विकास कामासाठी ३ कोटी ८३ लाख रुपये मंजूर : अजित जगताप

ताज्या बातम्या

भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

मोठी बातमी! पंढरपुरात आषाढी वारीच्या तोंडावर खळबळ; ‘या’ प्रसिद्ध मिसळ सेंटरसह हॉटेल्सवर तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई; तक्रारींसाठी नागरिकांनी ‘या’ क्रमांकावर संपर्क साधावा

July 16, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

शेतकऱ्यांसाठी देवमाणूस ठरले आ.समाधान आवताडे! उजनी आणि म्हैसाळमधून थेट शेतात पोहोचणार पाणी

July 16, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

ग्रामपंचायत निवडणुकांचा बिगुल वाजला! मतदार यादीचा अधिकृत कार्यक्रम जाहीर; ‘या’ तारखेला प्रसिद्ध होणार प्रारूप यादी

July 16, 2026
मोठी बातमी! वर्षाला ‘इतके’ गॅस सिलिंडर मोफत देणार; युती सरकार आणा, पुढील 5 वर्षे वीज मोफत.; भरसभेत अजित पवारांची मोठी घोषणा

अजित पवारांच्या जयंतीचा समावेश राष्ट्रपुरुष आणि थोर पुरुषांच्या यादीत, दादांची जयंती शासकीय कार्यालय, शाळा-महाविद्यालयात साजरी होणार; ‘या’ तारखेला राज्यभर पहिली शासकीय जयंती

July 16, 2026
दुर्दैवी घटना! सांगोल्यातील ‘या’ गावात दोन बहिणींचा शेततळ्यात बुडून मृत्यू

मंगळवेढ्यात खळबळ! मॉलमध्ये काम करणाऱ्या २१ वर्षीय तरुणाचा भीमा नदीच्या पुलावरून पडून मृत्यू; घातपाताचा संशय?

July 16, 2026
‘मी देवेंद्र फडणवीस शपथ घेतो की.’, महाराष्ट्रात ‘देवेंद्र’ पर्वाला सुरुवात; आजपासूनच फडणवीस यांच्यापुढे असतील ‘हे’ 5 आव्हान

कर्जमाफीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा, शेतकऱ्यांची वीजबिलाची पाटी कोरी केली, जुनं वीजबिलही…

July 15, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा