mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

सोलापूर जिल्हा परिषदेचे ‘एवढे’ शिक्षक झाले मुख्याध्यापक; शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
September 20, 2021
in सोलापूर
शिक्षकांसाठी मोठी बातमी! रोजगाराच्या लढ्याला पहिले यश, शिक्षक भरतीवरील स्थगिती शासनाने उठवली

टीम मंगळवेढा टाईम्स। 

सोलापूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमधील शिक्षकांच्या प्रलंबित असलेल्या पदोन्नतीच्या प्रश्नाला गुरूवारी मुहूर्त लागला.

ऑनलाईन समुपदेशनाद्वारे २०० शिक्षकांना पदोन्नतीने मुख्याध्यापकांसाठी पात्र ठरविण्यात आले. प्रश्न मार्गी लागल्यामुळे शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांनी कोरोना महामारीमुळे शाळा बंद असतानाही आरोग्य व शिक्षणाचेही काम केले. यंदा या शिक्षकांना उन्हाळी सुटीही अनुभवता आली नाही. दुसरी लाट ओसरू लागल्यावर पदोन्नतीसाठी शिक्षकांनी आग्रह सुरू केला.

सन २०१९ पासून पदोन्नतीबाबत पाठपुरावा सुरू होता. कोरोना महामारीच्या प्रतिबंधक नियमावलीमुळे जिल्ह्यातील पदोन्नतीसाठी पात्र शिक्षकांना एकत्र बोलावून पदोन्नतीची प्रक्रिया पार पाडणे शक्य नव्हते.

त्यामुळे ऑनलाईन प्रक्रिया राबविण्याचा निर्णय झाला. एकदा ऑनलाईन प्रक्रियेत तांत्रिक समस्या निर्माण झाल्याने पदोन्नती पुढे गेली तर एकदा प्राधान्यक्रमावरून वाद झाला.

शेवटी शिक्षक संघटनांशी चर्चा करून मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी गुरूवारी ही प्रक्रिया पार पाडण्याबाबत शिक्षणाधिकारी संजयकुमार राठोड यांना सूचना दिली होती. त्यानुसार ही प्रक्रिया पार पडली.

ठरल्याप्रमाणे दिव्यांगांना प्राधान्य देण्यात आले. दिव्यांगांचा अनुशेष २००५ पासून प्रलंबित होता. त्यानुसार अस्थी व्यंग : ४७, कर्णबधिर : ५, अल्प दृष्टी : ४ असे ५६ तर सर्वसाधारण गटातील १४४ अशा २०० शिक्षकांना पदोन्नती देण्यात आली.

अनुशेष मधील जागांवर भरती न झाल्याने ७ जागा पुढील तीन वर्षासाठी रिक्तच राहणार आहेत. उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, शिक्षणाधिकारी राठोड, उपशिक्षणाधिकारी संजय जावीर, प्रभारी कार्यालयीन अधीक्षक मुतवली, कक्ष अधिकारी संजय रूपनर, संजय कांबळे, पवार, तांत्रिक सहायक इम्तीयाज चंदरकी, प्रवीण प्रक्षाळे यांनी या प्रक्रियेत सहभाग घेतला.

शिक्षक संघटनांनी पदोन्नतीचा प्रश्न धसास लावला होता. त्यामुळे सीईओ स्वामी यांनी शिक्षणाधिकारी राठोड यांची उस्मानाबादला बदली झाली तरी त्यांना पदावरून मुक्त केले नव्हते.

प्रभारी कार्यालयीन अधीक्षक मुतवल्ली यांच्यासह पाच कर्मचारी बदलीस पात्र असताना बदल्या केल्या नव्हत्या. पदोन्नतीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अधिकाऱ्यांच्या बदलीचा प्रश्न मार्गी लावण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: शिक्षक

संबंधित बातम्या

विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षांसाठी वीजपुरवठा सुरळीत ठेवा

दुहेरी संकट! दुष्काळात ‘करंट’चा झटका; अंगाची लाही अन् विजेचा खोडसाळपणा; भीषण दुष्काळात सोलापूर जिल्ह्यात भारनियमनाचा घाव

October 11, 2026
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिलासा: पंचनामे पूर्ण; केंद्रीय पथक पाहणीसाठी दाखल; आज मंगळवेढ्यात; मदत कधी आणि किती मिळणार?

October 10, 2026
सोन्याच्या पावलांनी गौराई आली…; गौरी पूजनासाठी लागणारे साहित्य कोणते? ‘अशी’ करा पूजेची मांडणी

नवरात्र नऊ नाही, यंदा तब्बल १० दिवसांचे! सप्तमी तिथी वाढली; असा आहे घटस्थापनेचा मुहूर्त

October 10, 2026
पालकमंत्रिपदी नियुक्त झाल्यानंतर पहिल्यांदाच जयकुमार गोरे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

मागणी करा, चारा डेपो लगेच सुरू होणार; सोलापूरच्या शेतकऱ्यांना पालकमंत्र्यांचा मोठा दिलासा; रब्बी पेरणीपूर्वी ‘हे’ तपासण्याचे आवाहन

October 8, 2026
दिपावलीचा दुसरा हप्ता कारखान्यांनी देऊन शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी; ऊस उत्पादक शेतकरी बालाजी गरड यांचे भावनिक आवाहन

मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी उपसरपंच बालाजी गरड यांची आक्रमक भूमिका; सर्व शेतकऱ्यांना विनाविलंब आर्थिक मदत व दुष्काळ निधी देण्याची मागणी

October 6, 2026
मोठी बातमी! सिद्धेश्वर रणे यांच्याकडे मंगळवेढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची धुरा; खा.धैर्यशील मोहिते पाटील यांनी सोपवली जबाबदारी

मोठी बातमी! सिद्धेश्वर रणे यांच्याकडे मंगळवेढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची धुरा; खा.धैर्यशील मोहिते पाटील यांनी सोपवली जबाबदारी

October 5, 2026
सबजेल हाऊसफुल्ल पंढरपूरचे कैदी मंगळवेढ्यात वर्ग; कोरोना संसर्गाची कैद्यांना भीती

मोठी बातमी! ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळीला अटक; एक वर्षासाठी येरवडा कारागृहात स्थानबद्ध, नेमकं कारण काय?

October 5, 2026

ई-पीक पाहणीसाठी शेतकऱ्याकडे ५०० रुपयांची खंडणी; साहाय्यकाची हकालपट्टी करत पोलिसांत गुन्हा दाखल; ​दुष्काळी अनुदानाची भीती दाखवून पैशांची मागणी

October 4, 2026
वाळू माफियांची मुजोरी तहसिलदारांच्या अंगावर गाडी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न

मंगळवेढ्यात संतापाची लाट! आजपासून तालुका बेमुदत बंद; खोटे ॲट्रॉसिटी गुन्हे मागे घेण्यासह १२ आरोपींच्या तात्काळ अटकेची जोरदार मागणी; संपूर्ण जिल्ह्याचे लागले लक्ष

October 3, 2026
Next Post
आई-बाबा होण्याचे स्वप्न होणार साकार; शिर्के हॉस्पिटलमध्ये निःशुल्क वंध्यत्व शिबिर, येथे करा नावनोंदणी

आई-बाबा होण्याचे स्वप्न होणार साकार; शिर्के हॉस्पिटलमध्ये निःशुल्क वंध्यत्व शिबिर, येथे करा नावनोंदणी

ताज्या बातम्या

नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत द्या! आमदार समाधान आवताडेंचे केंद्रीय पथकाला १७ कलमी मागण्यांची सनद; कर्जमाफी, चारा छावण्या अन् मोफत पाणी

October 11, 2026
विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षांसाठी वीजपुरवठा सुरळीत ठेवा

दुहेरी संकट! दुष्काळात ‘करंट’चा झटका; अंगाची लाही अन् विजेचा खोडसाळपणा; भीषण दुष्काळात सोलापूर जिल्ह्यात भारनियमनाचा घाव

October 11, 2026
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिलासा: पंचनामे पूर्ण; केंद्रीय पथक पाहणीसाठी दाखल; आज मंगळवेढ्यात; मदत कधी आणि किती मिळणार?

October 10, 2026
मंगळवेढा तालुक्यात एकाच दिवशी कोरोनाने घेतला दोघांचा बळी; आज 10 जणांना लागण

मृतांच्या टाळूवरचं लोणी! कोरोनातील २२ मृतांवर कागदोपत्री ‘उपचार’ दाखवून लाटले २ कोटी; मृत्यूनंतर ६ वर्षांनी ‘उपचार’?

October 11, 2026
सोन्याच्या पावलांनी गौराई आली…; गौरी पूजनासाठी लागणारे साहित्य कोणते? ‘अशी’ करा पूजेची मांडणी

नवरात्र नऊ नाही, यंदा तब्बल १० दिवसांचे! सप्तमी तिथी वाढली; असा आहे घटस्थापनेचा मुहूर्त

October 10, 2026
पालकमंत्रिपदी नियुक्त झाल्यानंतर पहिल्यांदाच जयकुमार गोरे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

मागणी करा, चारा डेपो लगेच सुरू होणार; सोलापूरच्या शेतकऱ्यांना पालकमंत्र्यांचा मोठा दिलासा; रब्बी पेरणीपूर्वी ‘हे’ तपासण्याचे आवाहन

October 8, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..