टीम मंगळवेढा टाईम्स।
सोलापुरात एका गुन्हयाचे प्रकरण मिटविण्यासाठी साडेसात लाख रुपयांची लाच स्वीकारताना पोलिस निरीक्षक व सहाय्यक पोलिस निरीक्षकांना सापळा लावून पकडण्यात आले.
शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. सलगर वस्ती पोलिस ठाण्याचे निरीक्षक संपत पवार व सहाय्यक पोलिस निरीक्षक खांडेकर अशी दोघांची नावे आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती.
याबाबत माहिती अशी की, सलगर वस्ती पोलिस ठाण्याच्या हद्दीत एक गुन्ह्याचा तपास सुरू आहे. ते प्रकरण मिटविण्यासाठी पवार व खांडेकर यांनी मोठी रक्कम मागितली होती. त्यापैकी साडेसात लाख रुपये आज द्यायचे ठरले होते.
त्या संदर्भात संबंधितांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला कळविले होते. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या उपअधीक्षकांसह टीमने सापळा रचला.
रात्री दहानंतर रक्कम स्वीकारताना संपत पवार व खांडेकर यांना पथकाने रंगेहात पकडण्यात आले.
यानंतर पोलिस ठाण्यात आणून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची रात्री उशिरा कारवाई सुरू होती. त्यामुळे तपशील मिळू शकला नाही.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज