mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

रुग्णसंख्या घटूनही सोलापूर पूर्वीप्रमाणे लॉकच, ग्रामीणला दिलासा; काय चालू व काय बंद, वाचा सविस्तर

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
June 1, 2021
in सोलापूर
Lockdown! राज्यात लॉकडाऊन पुन्हा वाढवला; 15 मे पर्यंत असणार कडक निर्बंध

टीम मंगळवेढा टाईम्स ।

कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता राज्य शासनाच्या आदेशानुसार सोलापूर जिल्हा प्रशासनाने सोमवारी रात्री उशिरा १ ते १५ जून या कालावधीत ग्रामीण भागातील व्यापाऱ्यांना दिलासा देत जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सकाळी सात ते ११ वाजेपर्यंत तर कृषी संबंधित दुकाने सकाळी सात ते दुपारी दोन वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची मुभा दिली आहे.

सोलापूर शहरात पूर्वीप्रमाणेच जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सकाळी ७ ते ११ पर्यंत सुरू राहतील. या कालावधीत नागरिकांनी शारीरिक अंतर ठेवणे व मास्क वापरण्याच्या सूचना दिल्या आहेत. शासन आदेशाची अंमलबजावणी न केल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे आदेशात नमूद केले आहे.

हे आदेश सोलापूर शहर व जिल्ह्यासाठी लागू करण्यात आल्याचे महापालिका आयुक्त पी . शिवशंकर व जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आदेशात म्हटले आहे. ग्रामीण भागातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने स्थानिक स्तरावर संपूर्ण ग्रामीण भागात लॉकडाऊन केला होता.

आता सकाळी सात ते अकरा या वेळेत जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. अत्यावश्यक सेवांमध्ये हॉस्पिटल, डायग्नोस्टिक सेंटर, क्लिनिक , लसीकरण, वैद्यकीय विमा कार्यालय , फार्मसी कंपन्या , वैद्यकीय आणि आरोग्य सेवांमध्ये समाविष्ट असणारे उत्पादन वितरण करणारे घटक, मास्क , वैद्यकीय उपकरणे व त्याच्याशी निगडित सर्व सहाय्यक बाबी यांचा समावेश आहे.

पशुवैद्यकीय सेवा , पशू संगोपन केंद्र हेही सुरू राहतील. सर्व किराणा दुकाने , भाजीपाला दुकाने , फळांची दुकाने , डेअरी बेकरी आणि सर्व प्रकारच्या खाद्यपदार्थांची दुकाने सुरू राहतील. त्यामध्ये चिकन , मटण , मासे , अंडी , पाळीव प्राण्यांच्या खाद्याची दुकाने सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत.

कृषी निगडित सेवा अनेक कृषी उत्पादन सुरळीत सुरू राहण्यासाठी बियाणे , खते , कृषी अवजारे व त्यांची दुरुस्ती हे उपक्रम सकाळी सात ते दुपारी दोन वाजेपर्यंत सुरू राहणार असल्याचे आदेशात म्हटले आहे . अत्यावश्यक सेवा या प्रकारात जी दुकाने आहेत त्या दुकान मालकांनी व तेथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी लसीकरण करून घ्यावे.

अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या दुकान मालकांना, काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने कोरोना नियमांचे पालन करावे , नियमांचे पालन न केल्यास पाचशे रुपये दंड करण्यात येणार आहे.

सार्वजनिक वाहतूक ऑटो रिक्षामध्ये ड्रायव्हर आणि दोन प्रवासी , टॅक्सी , कारमध्ये आरटीओच्या नियमानुसार ५० टक्के क्षमतेस परवानगी राहणार आहे. बसमध्ये बसण्याच्या जागेच्या पूर्ण क्षमतेने परवानगी असेल. उभे राहून प्रवास करता येणार नाही.

सर्व शासकीय कार्यालयांत कर्मचाऱ्यांच्या एकूण क्षमतेच्या १५ टक्के उपस्थिती कर्मचारी ठेवता येईल.कोरोनासंबंधी शासकीय कार्यालयात कर्मचारी उपलब्ध ठेवण्यात येणार आहेत. सरकारी कंपन्या , सरकारी कार्यालयांत सर्व बैठका ऑनलाइन पद्धतीने घ्यायच्या आहेत.

केंद्र शासन , राज्य शासनाची कार्यालये व स्थानिक स्वराज्य संस्था यांना सूट देण्यात आली आहे. सहकारी सार्वजनिक उपक्रमातील आणि खासगी बँका , इन्शुरन्स , मेडिकल कंपनी , औषधी उत्पादनाचे व्यवस्थापन वितरण करणाऱ्या कंपन्यांची कार्यालये , डीलर्स यांचा यामध्ये समावेश आहे.

खासगी बस सेवा ही फक्त आणीबाणीच्या सेवेसाठी वापरण्यात येणार आहे. खासगी वाहतूक सेवा एकूण क्षमतेच्या ५० टक्के क्षमतेने सुरू करण्यास परवानगी आहे . आंतरजिल्हा व आंतर शहर सेवा प्रवासाच्या राहत्या शहरापुरती मर्यादित असावी.

रेस्टॉरंट , हॉटेल आणि बार हे एकत्रित बसून सेवा देण्यास बंद राहतील , हॉटेल आणि रेस्टॉरंट आवारात वास्तव्यास असलेल्या आणि हॉटेलचा भाग असलेल्या अंतर्गत सुरक्षेसाठी रेस्टॉरंट अँड बार सेवा सुरू राहतील.

हॉटेलमध्ये फक्त होम डिलिव्हरी आणि पार्सल सेवेला परवानगी आहे. रेस्टॉरंट किंवा बारमध्ये प्रवेश नसेल. होम डिलिव्हरी देणाऱ्या कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात यावे , या नियमाचा भंग केल्यास एक हजार रुपये दंड करण्यात येणार आहे, संबंधित आस्थापनेकडून दहा हजार रुपये दंड आकारणी करण्यात येणार असल्याचे आदेशात म्हटले आहे.

रस्त्याकडेची खाद्यपदार्थ विक्री करण्यास परवानगी राहणार नाही. पार्सल सेवा व घरपोच सेवा सकाळी ७ ते रात्री आठ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे . जे ग्राहक व विक्रेते नियमांचे पालन करणार नाहीत त्यांना पाचशे रुपये दंड आकारण्यात येणार आहे.

वृत्तपत्रे , मासिके , नियतकालिके यांची छपाई व वितरण सुरू राहील . यामध्ये फक्त घरपोच सेवा देण्याची मुभा देण्यात असेल. उत्पादन क्षेत्रे ही वेगवेगळ्या शिफ्टमध्ये सुरू राहतील.कामाच्या ठिकाणी प्रत्येक कामगाराचे तापमान तपासावे एखादा कर्मचारी बाधित आढळून आल्यास संपर्कातील सर्व कामगारांची आरोग्य तपासणी करावी.

काय बंद राहणार…

शहर-जिल्ह्यातील सलून दुकाने उघडण्यास परवानगी नाहीच

मंदिरे, धार्मिक स्थळांना परवानगी नाहीच; नियम पाळून नित्यपूजा करता येईल

सिनेमागृहे, नाट्यगृहे व मनोरंजनाची कोणतीही सेवा सुरू राहणार नाही

अत्यावश्‍यक सेवेतील दुकाने वगळता अन्य कोणत्याही दुकानांना परवानगी नाही

आदेशातून शेतकऱ्यांना दिलासा

पावसाळ्याच्या तोंडावर आता शेतीच्या कामाला वेग येतो. त्यामुळे शेतीशी निगडित सेवा आणि कृषी उत्पादनाविषयक सर्व सेवा सुरळीत राहण्यासाठी बियाणे, खते, कृषी अवजारे, त्याची दुरुस्ती या दुकानांना सकाळी सात ते दुपारी दोन वाजेपर्यंत परवानगी राहील, असे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: लॉकडाउनसोलापूर

संबंधित बातम्या

सोलापुरात पावसामुळे झालेल्या पिकाच्या नुकसानीची माहिती ‘अशी’ भरा ऑनलाइन

बटईने दिली जमीन आणि रातोरात मालकच बदलला! माजी आमदारावर गंभीर आरोप; काय आहे २० एकरांचं गूढ?

October 14, 2026
खास योजना! फक्त 90 दिवसांसाठी 9 टक्के सर्वाधिक व्याजदर; विठाई परिवार अर्बन बँकेची नवरात्रोत्सवानिमित्त घोषणा

फक्त भेट द्या आणि जिंका! नवरात्रीनिमित्त ‘विठाई परिवार मल्टीस्टेट’कडून मोफत लकी ड्रॉ कूपन योजना सुरू; प्रत्येक शाखेत नवदुर्गांचा सन्मान व होम मिनिस्टर कार्यक्रमांचे आयोजन

October 14, 2026
गालबोट! मंगळवेढ्यात वर्ग वाटपावरून शिक्षक-मुख्याध्यापकात हमरीतुमरी, ‘या’ शाळेतील प्रकार; कारवाईसाठी ‘प्रहार’ संघटना आक्रमक

अद्भूत धाडस! विषारी ‘कोब्रा’ चावला, ब्लेडने रक्त काढले अन् सापाला सोबत घेऊन गाठला दवाखाना; मंगळवेढ्याच्या प्राचार्यांचा काळजाचा ठोका चुकवणारा थरार; अखेर मृत्यूवर मात

October 12, 2026
विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षांसाठी वीजपुरवठा सुरळीत ठेवा

दुहेरी संकट! दुष्काळात ‘करंट’चा झटका; अंगाची लाही अन् विजेचा खोडसाळपणा; भीषण दुष्काळात सोलापूर जिल्ह्यात भारनियमनाचा घाव

October 11, 2026
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिलासा: पंचनामे पूर्ण; केंद्रीय पथक पाहणीसाठी दाखल; आज मंगळवेढ्यात; मदत कधी आणि किती मिळणार?

October 10, 2026
सोन्याच्या पावलांनी गौराई आली…; गौरी पूजनासाठी लागणारे साहित्य कोणते? ‘अशी’ करा पूजेची मांडणी

नवरात्र नऊ नाही, यंदा तब्बल १० दिवसांचे! सप्तमी तिथी वाढली; असा आहे घटस्थापनेचा मुहूर्त

October 10, 2026
पालकमंत्रिपदी नियुक्त झाल्यानंतर पहिल्यांदाच जयकुमार गोरे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

मागणी करा, चारा डेपो लगेच सुरू होणार; सोलापूरच्या शेतकऱ्यांना पालकमंत्र्यांचा मोठा दिलासा; रब्बी पेरणीपूर्वी ‘हे’ तपासण्याचे आवाहन

October 8, 2026
दिपावलीचा दुसरा हप्ता कारखान्यांनी देऊन शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी; ऊस उत्पादक शेतकरी बालाजी गरड यांचे भावनिक आवाहन

मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी उपसरपंच बालाजी गरड यांची आक्रमक भूमिका; सर्व शेतकऱ्यांना विनाविलंब आर्थिक मदत व दुष्काळ निधी देण्याची मागणी

October 6, 2026
मोठी बातमी! सिद्धेश्वर रणे यांच्याकडे मंगळवेढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची धुरा; खा.धैर्यशील मोहिते पाटील यांनी सोपवली जबाबदारी

मोठी बातमी! सिद्धेश्वर रणे यांच्याकडे मंगळवेढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची धुरा; खा.धैर्यशील मोहिते पाटील यांनी सोपवली जबाबदारी

October 5, 2026
Next Post
शेतमाल विक्रीसाठी हक्काची बाजारपेठ आता मंगळवेढ्यात; आजपासून हमीभाव मका खरेदीस सुरवात

मराठा समाज आक्रमक; मंगळवेढ्यात आरक्षणासाठी १ दिवसीय लाक्षणिक उपोषण : सिध्देश्वर आवताडे

ताज्या बातम्या

दादांचा वादा! मंगळवेढा पंचायत समितीच्या सभापतीपदी दीपाली ताड यांची वर्णी लागणार? महिला दिनी समर्थकांकडून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

संवेदनशील पाऊल! मंगळवेढा सभापती दीपाली ताड थेट शेतकऱ्यांच्या बांधावर; मानधनाची रक्कम दुष्काळ निवारणासाठी सुपूर्द; ​आमदार आवताडे यांच्या नेतृत्वाखाली दुष्काळी उपाययोजनांना वेग

October 16, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

मोठी खळबळ! सुटे मसाले विक्रीवर बंदी, तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय; दुकानदारांचं टेन्शन वाढलं

October 16, 2026
मंगळवेढयातील मुला-मुलींसाठी नोकरीची संधी; ‘या’ दुकानात सेल्समन पदासाठी होणार आहे मोठी भरती

तरुणांसाठी मोठी संधी! मंगळवेढ्यातील नामांकित ‘अर्जुन पीव्हीसी पाईप’ कंपनीत तातडीने भरती सुरु; दररोज मिळणार आकर्षक वेतन व सुविधा; आजच 9673635511 संपर्क साधा

October 15, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

शिक्षण क्षेत्रात खळबळ! खासगी शिक्षण संस्थांचा काळाबाजार; विद्यार्थी खरेदी विक्रीचा महाघोटाळा उघड

October 15, 2026
तयारी! बँक ठेवी विमा संरक्षण ‘एवढ्या’ लाखांपर्यंत वाढवण्याचा विचार; सध्या मर्यादा ५ लाख; खातेधार व ठेवीदारांना याचा होणार लाभ

सहकारी बँकांमध्ये दहा वर्षे तळ ठोकलेले बँक संचालक अपात्रच; कोल्हापूर सर्किट बेंचचा निर्णय : ‘हे’ दिग्गज येणार अडचणीत

October 15, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

शेतकऱ्यांवर पाणी विकत घेण्याची वेळ येणार नाही! जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी आ.समाधान आवताडे सरसावले; प्रशासनाला तात्काळ टँकरचे आदेश

October 14, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा