टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा शहर , संत दामाजी नगर ग्रामपंचायत व संत चोखामेळा ग्रामपंचायत मधील सर्व नागरिकांना व व्यवसायिकांना कळविण्यात येते की जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर तथा अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण समिती सोलापूर यांच्या दि.14 मे 2021 रोजीच्या आदेशानुसार दि.15 मे पासून ते दि.1 जून सकाळी 7 वाजेपर्यंत किराणा दुकान, भाजीपाला व फळे यांना सकाळी 7 ते 11 या वेळेत फक्त होम डिलिव्हरी साठी परवानगी असेल.
यासाठी भाजी, फळ विक्रेते घरोघरी फिरून विक्री करू शकतात. कोणत्याही परिस्थीत मंडई , चौकात , प्रमुख रस्त्यावर थांबून विक्री करता येणार नाही. कृषी अवजारे व कृषीसेवा केंद्र दुकाने सकाळी 7 ते 11 या कालावधीत चालू राहतील . मेडिकल दुकाने व दवाखाने उघडी राहतील.
विनाकारण कोणीही घराच्या बाहेर पडू नये. सर्वांनी मास्कचा वापर करावा . सुरक्षित अंतर पाळावे. मेडिकल दुकान यांना विनंती की आपल्या दुकानासमोर होणारी गर्दीचे नियोजन करावे. नागरिकांनी ही दुकानासमोर गर्दी करू नये.
गोल सर्कल आखावे , सावली करावी . आता पर्यंत आपण सर्वांनी कोरोना विषाणूचा प्रतिबंध करण्यासाठी काटेकोर पणे नियमांचे पालन केले आहे त्यामुळे कोरोना कंट्रोल मध्ये आहे. यापुढे ही आपण नियमांचे पालन करावे. जे दुकान मालक कोरोना नियमांचे काटेकोर पालन करणार नाहीत त्यांचे दुकान सील केले जाईल असे मुख्याधिकारी निशिकांत परचंडराव यांनी सांगितले आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज