टीम मंगळवेढा टाइम्स ।
मंगळवेढा येथील जगदज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या नियोजीत स्मारकाबाबतचे निवेदन आ.समाधान आवताडे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना सादर केले. पंढरपूर – मंगळवेढा मतदार संघात मंगळवेढा शहर जगदज्योती महात्मा बसवेश्वर यांची कर्मभूमी म्हणून ओळखली जाते.
तसेच महात्मा बसवेश्वरांनी या मंगळवेढा शहरात सुमारे ५ वर्षे वास्तव्य केले असून त्यांच्या पावनस्पर्शाने धन्य झालेली मंगळवेढा नगरी ही संतांची भूमी म्हणून जगामध्ये परिचित आहे. संपूर्ण राज्यातून तसेच कर्नाटक, राज्यातूनही लिंगायत , विरशैव समाजाचे लाखो अनुयायी व पर्यटक मंगळवेढा भूमीत येत असतात.
गेल्या अनेक वर्षापासून शासनाच्या उदासीन धोरणामुळे या संतांच्या भूमीचा विकास झाला नव्हता ही बाब निदर्शनास आल्यावर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकारने याची दखल घेवून राज्य शासनाने दि . १४/०२/२०१८ रोजी झालेल्या बैठकीमध्ये जिल्हाधिकारी सोलापूर यांना आरखडा तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.
त्यानंतर उपरोक्त प्रकरणी जिल्हाधिकारी सोलापूर यांनी सदर स्मारकाबाबतचा सुमारे १०० कोटी रुपयांचा आराखडा तयार करून राज्य शासनाकडे सादर केला होता. त्यामुळे उपरोक्त प्रकरणी स्मारकाच्या आराखडयास दि.१ नोव्हेंबर २०१८ रोजी अर्थमंत्री यांनी मंजूरी दिली होती.
परंतू यानंतर राज्यामध्ये सत्तांतर होवून नियोजीत महात्मा बसवेश्वर यांच्या स्मारकाचे काम थांबविण्यात आले. अदयापही सदरचे काम सुरु झालेले नाही. त्यामुळे संपूर्ण राज्यातील महात्मा बसवेश्वर यांच्या विचारांच्या लाखो अनुयायांवर अन्याय झाला आहे.
तसेच मंगळवेढा शहराच्या विकासाच्या, पर्यटनास चालना मिळण्यास बसत आहे. तरी मंगळवेढा येथील महात्मा बसवेश्वर यांच्या नियोजीत स्मारकाबाबत आपले स्तरावर तातडीने बैठक आयोजित करून महात्मा बसवेश्वर यांचे जागतिक दर्जाचे यथोचित स्मारक तात्काळ उभारणेसाठी संबंधीतास तातडीने आदेश व्हावेत अशी विनंती करण्यात आली आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज