mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मंगळवेढ्यात नमाज पठणाची चारशे वर्षांची परंपरा खंडित; औरंगजेबकालीन ईदगाह मैदान दुसऱ्या वर्षीही सुनेसुने

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
May 14, 2021
in मंगळवेढा
मंगळवेढ्यात नमाज पठणाची चारशे वर्षांची परंपरा खंडित; औरंगजेबकालीन ईदगाह मैदान दुसऱ्या वर्षीही सुनेसुने

टीम मंगळवेढा टाईम्स ।

रमजान महिन्यातील 30 दिवसांच्या कडकडीत रोजाच्या समाप्तीनंतर मंगळवेढा ते सांगोला रस्त्यावरील औरंगजेबकालीन ईदगाह मैदानावरील नमाज पठणाची 400 पेक्षा अधिक वर्षांची परंपरा सलग दुसऱ्या वर्षी कोरोनामुळे खंडित झाली.

मुस्लिम बांधवांच्या अनुपस्थितीमुळे यंदा ईदगाह मैदान सुनेसुने दिसून आले.मंगळवेढा शहरातील विविध प्रभागांत असलेल्या मशिदी व ईदगाह मैदानांवर रमजान महिन्याच्या समाप्तीचे नमाज पठण करण्यासाठी मुस्लिम बांधव दरवर्षी मोठ्या संख्येने उपस्थित राहतात.

परंतु शासनाने कोरोना रोगाचा प्रादुर्भाव लक्षात घेता जमावबंदी व संचारबंदीचे आदेश दिल्यामुळे सध्या सर्वच धर्मीयांच्या विविध सणांवर मोठी संक्रांत आली. त्यामुळे त्यांना आपले सण व विधी घरातच साजरे करावे लागले.

दरवर्षी तालुक्‍यात दुधाची मोठ्या प्रमाणात विक्री होते. परंतु कोरोनाचा दूध विक्रीसह बाजारपेठेतील रमजान खरेदीवर परिणाम जाणवला. त्यामुळे मोठ्या उत्साहाऐवजी अगदी साध्या पद्धतीने ईद साजरी करावी लागली.

अशा परिस्थितीत शहर व ग्रामीण भागातील सिद्धापूर, मरवडे, डोणज, नंदूर, सलगर बुद्रूक, भोसे, नंदेश्‍वर, आंधळगाव, खुपसंगी, खोमनाळ, निंबोणी, बावची, मारोळी, लवंगी, हुन्नूर, गोणेवाडी, डोंगरगाव, ब्रह्मपुरी, माचणूर, लक्ष्मी दहिवडी, भाळवणी, रड्डे आदी गावांतील नागरिकांनी आपापल्या घरात नमाज पठण करून चांगला पाऊस व पीकपाणीसह सध्या जगावर घोंघावणाऱ्या कोरोनापासून मुक्ती व सर्व समाजातील जनतेला सुखी ठेवण्याची दुवा अल्लाहकडे मागितली.

रमजाननिमित्त आमदार समाधान आवताडे, आमदार प्रशांत परिचारक, विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष भगीरथ भालके, आवताडे स्पिनिंगचे संजय आवताडे, शहा बॅंकेचे अध्यक्ष राहुल शहा, युटोपियनचे उमेश परिचारक,भैरवनाथचे अनिल सावंत, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष दिलीप चव्हाण, शीला शिवशरण,

उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले, तहसीलदार स्वप्नील रावडे, उपविभागीय पोलिस अधिकारी राजश्री पाटील, पोलिस निरीक्षक ज्योतिराम गुंजवटे, गटविकास अधिकारी सुप्रिया चव्हाण, मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव, राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षा अनिता नागणे, नगराध्यक्षा अरुणा माळी, उद्योजक सरोज काझी,उपनगराध्यक्ष चंद्रकांत घुले, पक्षनेते अजित जगताप, प्रवीण खवतोडे,

सभापती प्रेरणा मासाळ, सरोज काझीमाजी सभापती प्रदीप खांडेकर, बाजार समितीचे अध्यक्ष सोमनाथ आवताडे, खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष सिद्धेश्‍वर आवताडे यांच्यासह शशिकांत चव्हाण, मुझ्झमील काझी, गौरीशंकर बुरकूल, संतोष मोगले,ऍड. नंदकुमार पवार, तुकाराम कुदळे, ऍड. राहुल घुले, सुहास पवार यांनी मोबाईल व सोशल मीडियाच्या माध्यमातून मुस्लिम बांधवांना रमजना ईदच्या शुभेच्छा दिल्या.(सकाळ)

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: रमजान ईद

संबंधित बातम्या

नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

साप चावला तर जबाबदार कोण? मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ शाळेतील धोकादायक इमारतीच्या अवशेषांवरून पालकांचा प्रशासनाला थेट सवाल

August 30, 2026
धर्मगावच्या शिरपेचात मानाचा तुरा! बहुजन साहित्य संघाच्या राज्य संमेलनात कै. बाबुराव जाधव विद्यालयाला आदर्श शाळा पुरस्कार

धर्मगावच्या शिरपेचात मानाचा तुरा! बहुजन साहित्य संघाच्या राज्य संमेलनात कै. बाबुराव जाधव विद्यालयाला आदर्श शाळा पुरस्कार

August 30, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

राखी पौर्णिमेच्या दिवशीच काळाचा घाला: बहिणीकडे राखी बांधण्यासाठी गेलेल्या भावाचा भीषण अपघातात मृत्यू; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावावर शोककळा

August 29, 2026
खास योजना! फक्त 90 दिवसांसाठी 9 टक्के सर्वाधिक व्याजदर; विठाई परिवार अर्बन बँकेची नवरात्रोत्सवानिमित्त घोषणा

विठाई परिवार बँकेचा उद्या तिसरा वर्धापन दिन; अवघ्या ३ वर्षांत १५० कोटींच्या व्यवसायाचा टप्पा पूर्ण; मोफत आरोग्य तपासणी आणि महिलांसाठी रक्षाबंधन विशेष ठेव योजना जाहीर

August 27, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

काम कागदावर, पैसे खिशात! ‘या’ गावात बोगस बिले काढून लाखोंचा अपहार; मंगळवेढा BDO कडे तक्रार दाखल

August 27, 2026
मंगळवेढ्याच्या शेतकऱ्यास राष्ट्रीय कृषी पुरस्कार; भारतीय कृषी अनुसंधान परिषेदेची घोषणा

संतभूमी मंगळवेढ्याच्या सर्वांगीण विकासासाठी नागरिकांची वज्रमूठ; पक्षभेद विसरून एकत्र येण्याचे आवाहन

August 30, 2026
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड, १० लाख रुपयांचे बक्षीस; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा होणार सन्मान

प्रधानमंत्री आवास योजनेतून बाद ठरलेल्या पात्र लाभार्थ्यांना मोठी संधी; ‘या’ तारखेपूर्वी हमीपत्र सादर करण्याचे सभापती दीपाली ताड यांचे आवाहन

August 26, 2026
हुलजंतीत ‘कृष्णा महिला पतसंस्थेच्या’ नवीन शाखेचा भव्य उद्घाटन सोहळा; १०० दिवसांच्या ठेवीवर १०% व्याजाची ‘शुभारंभ योजना’ लागू

हुलजंतीत ‘कृष्णा महिला पतसंस्थेच्या’ नवीन शाखेचा भव्य उद्घाटन सोहळा; १०० दिवसांच्या ठेवीवर १०% व्याजाची ‘शुभारंभ योजना’ लागू

August 24, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

आमदार समाधान आवताडेंना नार्वेकरांकडून ‘राजकीय बूस्टर डोस’; आवताडे समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण

August 23, 2026
Next Post

शेतकऱ्यांचा जल्लोष! म्हैसाळ योजनेचे पाणी मंगळवेढ्यात दाखल; आ.आवताडे,आ.परीचारकांनी केले पूजन

ताज्या बातम्या

नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

साप चावला तर जबाबदार कोण? मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ शाळेतील धोकादायक इमारतीच्या अवशेषांवरून पालकांचा प्रशासनाला थेट सवाल

August 30, 2026
धर्मगावच्या शिरपेचात मानाचा तुरा! बहुजन साहित्य संघाच्या राज्य संमेलनात कै. बाबुराव जाधव विद्यालयाला आदर्श शाळा पुरस्कार

धर्मगावच्या शिरपेचात मानाचा तुरा! बहुजन साहित्य संघाच्या राज्य संमेलनात कै. बाबुराव जाधव विद्यालयाला आदर्श शाळा पुरस्कार

August 30, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

राखी पौर्णिमेच्या दिवशीच काळाचा घाला: बहिणीकडे राखी बांधण्यासाठी गेलेल्या भावाचा भीषण अपघातात मृत्यू; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावावर शोककळा

August 29, 2026
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ ४ तालुक्यांत उभारणार १२ कृषी अवजार बँका; संस्थांकडून प्रस्ताव आमंत्रित

August 29, 2026
मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

जि.प. अन् पं.स.मध्ये नामनिर्देशित सदस्यांसाठी नियम निश्चित; विविध क्षेत्रांतील अनुभवी व तज्ज्ञ व्यक्तींना मिळणार प्रतिनिधित्व

August 29, 2026
रक्षाबंधन आजच! दिवसभरात ‘या’ 5 मुहूर्तात कधीही बांधा राखी; फक्त ‘ही’ वेळ सांभाळा

रक्षाबंधन आजच! दिवसभरात ‘या’ 5 मुहूर्तात कधीही बांधा राखी; फक्त ‘ही’ वेळ सांभाळा

August 28, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..