mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणतात, ‘आजपासून तरुणांचं लसीकरण, पण लशी आहेत कुठे?

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
May 1, 2021
in राज्य
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलवली आज बैठक

टीम मंगळवेढा टाईम्स ।

महाराष्ट्रात आणखी कडक लॉकडाऊन करण्याची वेळ आलेली नाही, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलंय. आजपासून 18-44 वयोगटाचं लसीकरण पुरवठ्यानुसार सुरू करणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, “केंद्राने लसीकरण करण्याची जबाबदारी आपल्यावर टाकली.

आपल्याला 12 कोटी डोस लागतील. जीव महत्त्वाचा आहे. आपण एकरकमी पैसे देऊन लस घेण्याची तयारी आहे. पण लसीकरणाच्या पुरवठ्यावर मर्यादा आहे.

मे महिन्यात केंद्राकडून 18 लाख डोसेस मिळणार आहेत. पण लस मिळण्याची तारीख मिळालेली नाही. लसीकरण केंद्रावर गर्दी करू नये, असंही आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलंय.

18 ते 44 वयोगटातल्या नागरिकांसाठी 3 लाख लशी आल्याचं त्यांनी जाहीर केलं. लशीचा जास्तीत जास्त पुरवठा करून द्यावा, असंही आवाहन उद्धव ठाकरेंनी केंद्र सरकारला केलं आहे.

जी काही बंधन आज लावलेली आहेत, त्याहीपेक्षा कडक लॉकडाऊन लावण्याची गरज आहे का असं उच्च न्यायालयाने महाधिवक्तांना विचारलं होतं. मी तुम्हाला विचारतो. मला वाटतं ती वेळ आली असली, तरी तसा कडक लॉकडाऊन लावण्याची गरज नाही.

निर्बंध लावून काय झालं, तर रुग्णसंख्या कमी झाली. आपण जर बंधन घातली नसती तर आजच्या दिवशी महाराष्ट्रात 9.30 ते 10 लाख सक्रिय रुग्ण असू शकले असते. रुग्णवाढ उताराला लागलेली नाहीये. पण आपण ती 6-6.30 लाखापर्यंत थांबवली आहे. अजूनही काही काळ आपल्याला बंधन पाळण्याची आवश्यकता आहे.

इतर राज्यांनी महाराष्ट्रापेक्षा चांगल्या गोष्टी केल्या असल्यास, त्याचं अनुकरण करण्यास आपण तयार आहोत.

कोव्हिडची तिसरी लाट आली तर त्यावेळी ऑक्सिजनची कमतरता भासू नये, यासाठी तरतूद करण्यात येत आहे.

राज्य सरकार 275 PSA ऑक्सिजन प्लांट उभारत असून, केंद्र सरकारने 10 प्लांट्स दिले आहेत. पुढचे दोन महिने शिवभोजन थाळी मोफत देण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं. राज्यात 290 शिवभोजन केंद्रं असल्याचं त्यांनी सांगितलं.

सगळ्या जगात लाटांमागून लाटा येत आहेत. एकूण लाटा किती येणार, हे आपण किती काळजी घेतोय यावर अवलंबून आहे. दुसरी लाट एवढ्या मोठ्या प्रमाणात येईल असं वाटलं नाही.

उद्योग आणि कामगार नेत्यांशी मी बोललो. त्यांना काय करायचं याची सूचना दिली आहे. तिसरी लाट आपण सगळ्यांच्या सहकार्याने थोपवल्याशिवाय राहणार नाही.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: कोरोना उद्रेकमुख्यमंत्री उद्धव ठाकरेलसीकरण

संबंधित बातम्या

न्यूरोसर्जन डॉ.शिरीष वळसंगकर प्रकरणाला वेगळं वळण; आरोपी महिलेच्या वकिलाचा मोठा खुलासा

बापरे..! सोलापुरातील वकिलास जीएसटीची १२१ कोटी दंडाची नोटीस; काय आहे नेमके प्रकरण?

April 12, 2026
शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा; पोलीस संरक्षणासह ‘ही’ फी बंद करणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

कामाची बातमी! ‘या’ परवानग्यांचे अधिकार आता थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा मोठा निर्णय

April 9, 2026
बाबो..! अशोक खरातच्या मोबाइलमधील डेटा पाहून पोलीसही चक्रावले, धक्कादायक माहिती समोर; पुन्हा गूढ वाढले

मोठी बातमी! भोंदूबाबाचा पाय आणखी खोलात; अशोक खरात विरोधात ‘हा’ गुन्हा दाखल

April 6, 2026
जनता संभ्रमात! भगीरथ भालकेंचे नेमकं चाललंय तरी काय, दोन दिवसात दोन वेगवेगळ्या पक्षाकडून भरले अर्ज; पंढरपूर-मंगळवेढ्याच्या जागेबाबत सस्पेन्स आणखी वाढला?

जनता संभ्रमात! भगीरथदादा, तुमची निष्ठा नेमकी कुणाकडे? ​बीआरएस, काँग्रेस, राष्ट्रवादी अन् आता शिवसेना; भालकेंच्या वारंवार बदलणाऱ्या भूमिकांमुळे कार्यकर्त्यांमध्ये संताप

April 6, 2026
मास्क वापरा अन्यथा भरा ‘एवढा’ दंड! सोलापूर जिल्हा प्रशासनानं जारी केला नवा आदेश

कामाची बातमी! SIR म्हणजे काय? SIR यादीत नाव आहे की नाही? कसं चेक करायचं?

April 1, 2026
बाबो..! अशोक खरातच्या मोबाइलमधील डेटा पाहून पोलीसही चक्रावले, धक्कादायक माहिती समोर; पुन्हा गूढ वाढले

बाबो..! अशोक खरातच्या मोबाइलमधील डेटा पाहून पोलीसही चक्रावले, धक्कादायक माहिती समोर; पुन्हा गूढ वाढले

March 30, 2026
‘मी देवेंद्र फडणवीस शपथ घेतो की.’, महाराष्ट्रात ‘देवेंद्र’ पर्वाला सुरुवात; आजपासूनच फडणवीस यांच्यापुढे असतील ‘हे’ 5 आव्हान

नागरिकांनो! देशात इंधनाचा तुटवडा नाही, लॉकडाऊनच्या अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई करणार; मुख्यमंत्री फडणवीसांचा कडक इशारा

March 29, 2026
शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा; पोलीस संरक्षणासह ‘ही’ फी बंद करणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

शेतकऱ्यांनो! शेतरस्ता अडवाल तर महागात पडेल, ५ वर्ष शासनाचा कोणताही लाभ मिळणार नाही; नवा निर्णय काय?

March 28, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

पुण्यातील मंगळवेढेकर बांधवांसाठी सुवर्णसंधी! आमदार समाधान आवताडे साधणार थेट ‘संवाद’; अडीअचणी जाणून घेण्यासाठी विशेष बैठक

March 28, 2026
Next Post
शाळांची वेळ ठरविण्याचा अधिकार मुख्याध्यापकांना; दोन शिफ्टमध्ये भरतील शाळा

सरकारचा मोठा निर्णय! आजपासून शाळांना उन्हाळी सुट्टी जाहीर; नवे शैक्षणिक वर्ष 'या' तारखेपासून सुरु होणार

ताज्या बातम्या

पालकमंत्रिपदी नियुक्त झाल्यानंतर पहिल्यांदाच जयकुमार गोरे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

​भगीरथ, मला बोलायला लावू नका; तुम्ही मला का भेटला होता, ते जाहीर करू का?– पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खळबळजनक इशारा

April 15, 2026
धडपड गावासाठी! सामाजिक कार्यकर्ते नागराज व्हनवटे यांच्याकडून जयंतीनिमित्त गावाला ‘बाकडे’ भेट; पुणे येथे कार्यरत असूनही जपली गावाची नाळ

धडपड गावासाठी! सामाजिक कार्यकर्ते नागराज व्हनवटे यांच्याकडून जयंतीनिमित्त गावाला ‘बाकडे’ भेट; पुणे येथे कार्यरत असूनही जपली गावाची नाळ

April 14, 2026
धक्कादायक! मंगळवेढा तालुक्यात एकाच दिवशी कोरोनाने घेतला दोघांचा बळी; आज 20 जण कोरोनामुक्त

खळबळजनक! पंढरपुरातील ॲसिड हल्ला प्रकरणाला नवं वळण; तरुणीचा धक्कादायक खुलासा

April 15, 2026
मोठी बातमी! मंगळवेढ्यात हुंड्यासाठी सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पती, सासू, दीर, सासर्‍यांविरोधात गुन्हा दाखल

आम्हाला मुलगाच हवा होता! पोटच्या लेकीला आणि सुनेस ठरवले ‘पांढऱ्या पायाची’; उपाशी ठेवून काढले घराबाहेर; मंगळवेढ्यात सासरच्यांचा अमानुष छळ; पतीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

April 15, 2026
जनता संभ्रमात! भगीरथ भालकेंचे नेमकं चाललंय तरी काय, दोन दिवसात दोन वेगवेगळ्या पक्षाकडून भरले अर्ज; पंढरपूर-मंगळवेढ्याच्या जागेबाबत सस्पेन्स आणखी वाढला?

भगीरथदादा आता प्रवास पुरे! ‘पक्षांतराचा प्रवास आता थांबवा’; सिद्धाराम म्हेत्रेंचा भगीरथ भालकेंना रोखठोक सल्ला

April 13, 2026
दुर्दैवी घटना! सांगोल्यातील ‘या’ गावात दोन बहिणींचा शेततळ्यात बुडून मृत्यू

काळीज पिळवटून टाकणारी घटना! शेततळ्यात बुडून बहीण-भावाचा अंत; आजीसमोरच काळाचा घाला; सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

April 14, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा