mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

सोलापुरच्या 98 वर्षीय आजीचं कौतुक! सुने अगोदर ‘सासू’ची कोरोनावर मात; सुखरूप घरी परतली

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
April 30, 2021
in सोलापूर, राज्य
वायरमनला अतिरिक्त कामाचा बोजा; वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे मंगळवेढा महावितरणचे कर्मचारी असुरक्षित

टीम मंगळवेढा टाईम्स ।

सोलापूर जिल्ह्यातील बोरगाव (ता.माळशिरस) येथील तिघांची आठ दिवसापूर्वी श्वास घेताना अडचण निर्माण झाल्याने कोरोना टेस्ट करण्यात आली. यात ९८ वर्षीय आजी नागरबाई कृष्णात पाटील तसेच त्यांची सून कांचन हनुमंत पाटील (वय-५०) या कोरोना पॉझिटिव्ह निघाल्या.

त्यानंतर दोघींवर बोरगाव येथील कोविड केअर सेंटर मध्ये उपचार सुरू झाले. नियमित चांगला सकस आहार आणि टेन्शन फ्री जीवन जगणे हा स्थायीभाव लाभलेल्या ९८ वर्षीय सासूबाई या आठ दिवसात कोरोनावर मात करून घरी परतल्या.

त्यांच्या सुनेची तब्येत देखील चांगली असून त्यांच्यावर अद्याप केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. सुने अगोदर सासूने कोरोनावर मात करून सुखरूप घरी परतल्याने आजीचं बोरगावात कौतुक होत आहे.

नागरबाई आजीचा नातू वैजिनाथ पाटील हा सैनिक असून सिक्कीम येथील सीमेवर कार्यरत आहे. वैजिनाथ पाटील यांनीच त्यांच्या आजीबद्दल लोकमतला माहिती दिली. पाटील यांनी सांगितले, आमचं कुटुंब मोठे आहे. एकत्रित कुटुंब पद्धतीत आम्ही वाढलो. पूर्वीपासून आजींचा आहार सकस आहे.

रोज पौष्टिक आहार घेतात. मर्यादित जेवण तेही नियमितपणे घेतात. रोज एक ग्लास दूध पितात. त्यांची तब्येत पूर्वीपासून चांगली आहे. आठ दिवसापूर्वी श्‍वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे त्यांच्यासह घरातील तिघांची कोरोना टेस्ट करण्यात आली.

तिघेही पॉझिटिव्ह निघाले. त्यामुळे त्यांना तत्काळ श्रीपूर येथील कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. तिथे तिघांवर उपचार सुरू झाले. आजी पूर्वीपासून आरोग्याच्या बाबतीत काळजीपूर्वक वागत असल्यामुळे त्यांची तब्येत लवकर सुधारली.

कोविड उपचाराला त्यांनी लगेच प्रतिसाद दिला. त्यामुळे त्यांना आठ दिवसाच्या आत डिस्चार्ज मिळाला. बुधवारी आजींची पुन्हा एकदा कोरोना टेस्ट केल्यानंतर त्या निगेटिव्ह निघाल्या. त्यामुळे त्यांना घरी पाठवण्यात आले.

डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार केला उपचार

पाटील यांच्या कुटुंबातील आणखीन पाच सदस्य गुरुवारी सकाळी कोरोना पॉझिटिव्ह निघाले. त्यापूर्वी बुधवारी सायंकाळी कोरोनावर मात करून नागरबाई आजी घरी परतल्या. घरातील आणखी पाच सदस्य पॉझिटिव्ह निघाल्यानंतर आजींनी सर्वांना धीर दिला. घाबरू नका.

डॉक्‍टरांच्या सांगण्यानुसार औषधोपचार करून घ्या. सकस आहार घ्या. दूध प्या. टेन्शन फ्री रहा, असा सल्ला घरातील सदस्यांना दिल्यामुळे घरातील सदस्यही टेन्शन फ्री होऊन उपचारासाठी तयार झाले.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: कोरोना आढावासोलापूर कोरोना

संबंधित बातम्या

घरबसल्या रेशन कार्डमध्ये मोबाईल नंबर आणि पत्ता अशाप्रकारे करा अपडेट

नागरिकांनो! राज्यातील लाखो रेशन कार्ड्स होणार बंद; सरकारकडून 5 मोठे बदल, जाणून घ्या नवे नियम काय?

March 9, 2026
दहावी, बारावीच्या फेरपरीक्षेचा निकाल जाहीर, असा पहा निकाल

मोठी बातमी! कॉलेज आणि शाळांमध्ये मुलींना लाठ्याकाठ्यांचे प्रशिक्षण; कमवा आणि शिका योजनेतून ‘एवढे’ रुपये मिळणार; सरकारची घोषण

March 9, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

​धक्कादायक! शेतीचा वाद ठरला काळ; सुसाईड नोटमध्ये मांडली व्यथा आणि संपवलं आयुष्य

March 8, 2026
दादांचा वादा! मंगळवेढा पंचायत समितीच्या सभापतीपदी दीपाली ताड यांची वर्णी लागणार? महिला दिनी समर्थकांकडून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

दादांचा वादा! मंगळवेढा पंचायत समितीच्या सभापतीपदी दीपाली ताड यांची वर्णी लागणार? महिला दिनी समर्थकांकडून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

March 8, 2026
मंगळवेढ्यात विद्यार्थ्यांसाठी ‘सुवर्णसंधी’! एका कोर्सच्या फीमध्ये दुसरा कोर्स मोफत; ACTI कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटची ऑफर; महिला दिनानिमित्त मुलींना विशेष सवलत

मंगळवेढ्यात विद्यार्थ्यांसाठी ‘सुवर्णसंधी’! एका कोर्सच्या फीमध्ये दुसरा कोर्स मोफत; ACTI कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटची ऑफर; महिला दिनानिमित्त मुलींना विशेष सवलत

March 8, 2026
दिपावलीचा दुसरा हप्ता कारखान्यांनी देऊन शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी; ऊस उत्पादक शेतकरी बालाजी गरड यांचे भावनिक आवाहन

नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार नको, १ लाखाचा लाभ द्या; ​उपसरपंच बालाजी गरड यांची शासनाकडे आग्रही मागणी ​

March 7, 2026
पंतप्रधान मोदींचा पुणे दौरा रद्द झाल्यानं सोलापूर विमानतळाचे उद्घाटन लांबले; मुख्यमंत्र्यांचा दौरा सहाव्यांदा पुढे ढकलला, आता ‘या’ तारखेला नियोजन

सोलापूर विमानतळाचा फ्लाइंग ट्रेनिंग ऑर्गनायझेशनचा मार्ग मोकळा; विद्यार्थ्यांचे पायलट होण्याचे स्वप्न होणार साकार

March 7, 2026
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

शेतकऱ्यांना मोठा दिलासा! ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना’ जाहीर; ‘इतक्या’ लाखांपर्यंत कर्जमाफी; देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

March 6, 2026
बडा मासा! मंगळवेढा प्रांत कार्यालयातील तलाठी निघाला लाचखोर; लाचेची रक्कम घेऊन केला पोबारा; लाच कुणाच्या सांगण्यावरून?

खळबळजनक! सात हजारांची लाच स्वीकारताना चालकाला रंगेहाथ पकडले; मंडल अधिकाऱ्यांच्या गाडीतच पैसे घेतले

March 6, 2026
Next Post
सोलापुरात राष्ट्रवादीला मोठा धक्का ‘या’ बड्या नेत्याचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश

पालकमंत्र्यांनी सोलापूरचा नाद करायचा नाय! उजनी धरणातील पाण्याचा वाद, अन्याय सहन करणार नसल्याचा काँग्रेसचा इशारा

ताज्या बातम्या

मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

मुख्यमंत्र्यांच्या मुलाची राजकारणात एन्ट्री; आता थेट उपमुख्यमंत्री होणार, राजकीय चर्चांना उधाण

March 9, 2026
घरबसल्या रेशन कार्डमध्ये मोबाईल नंबर आणि पत्ता अशाप्रकारे करा अपडेट

नागरिकांनो! राज्यातील लाखो रेशन कार्ड्स होणार बंद; सरकारकडून 5 मोठे बदल, जाणून घ्या नवे नियम काय?

March 9, 2026
दहावी, बारावीच्या फेरपरीक्षेचा निकाल जाहीर, असा पहा निकाल

मोठी बातमी! कॉलेज आणि शाळांमध्ये मुलींना लाठ्याकाठ्यांचे प्रशिक्षण; कमवा आणि शिका योजनेतून ‘एवढे’ रुपये मिळणार; सरकारची घोषण

March 9, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

​धक्कादायक! शेतीचा वाद ठरला काळ; सुसाईड नोटमध्ये मांडली व्यथा आणि संपवलं आयुष्य

March 8, 2026
दादांचा वादा! मंगळवेढा पंचायत समितीच्या सभापतीपदी दीपाली ताड यांची वर्णी लागणार? महिला दिनी समर्थकांकडून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

दादांचा वादा! मंगळवेढा पंचायत समितीच्या सभापतीपदी दीपाली ताड यांची वर्णी लागणार? महिला दिनी समर्थकांकडून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

March 8, 2026
​’साप्ताहिक रणयुग टाईम्स’चा १४ वा वर्धापन दिन: मंगळवेढ्यात कर्तृत्ववानांचा होणार सन्मान; संपादक प्रमोद बिनवडे यांची माहिती

​’साप्ताहिक रणयुग टाईम्स’चा १४ वा वर्धापन दिन: मंगळवेढ्यात कर्तृत्ववानांचा होणार सन्मान; संपादक प्रमोद बिनवडे यांची माहिती

March 8, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..