mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

पालकमंत्री दत्तात्रय भरणे उजनीच्या पाण्यावरून झाले आक्रमक! म्हणाले, राजकारणातून संन्यास घेईन…

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
April 25, 2021
in सोलापूर, राज्य
सोलापुरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्र्यांनी उद्या बोलावली बैठक; सर्व आमदार,खासदारांसह अधिकारी राहणार उपस्थित

टीम मंगळवेढा टाइम्स ।

सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणातून ५ टीएमसी पाणी इंदापुरला पळवल्याचा आरोप सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्यावर गेली दोन दिवस केला जातोय. यावर आज सोलापूरच्या पत्रकार परिषदेत पालकमंत्री भरणे आक्रमक झाले.

या पाण्यावरून राजकारण केलं जातंय. हे मोठं षडयंत्र आहे.मात्र सोलापूरचे एक थेंब पाणी जरी कमी झाल्याचे सिद्ध झाल्यास मंत्रीपद,आमदारकी सोडा राजकारणातून संन्यास घेईन असे थेट आव्हान त्यांनी विरोधकांना दिलंय.

काही दिवसांपूर्वी उजणीतून इंदापूरला ५ टीएमसी पाणी पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी पळवल्याचा आरोप केला जातोय.

यावर भावूक होऊन भरणे यांनी आपली भूमिका मांडली. इंदापूर माझा तालुका आहे. मात्र मला भाकरी मिळावी म्हणून दुसऱ्याची भाकरी पाळवण्याचे माझे संस्कार नाहीत. त्यामुळे सोलापूरकरांनी काळजी करू नये असे आश्वासन त्यांनी दिल.

सोलापूर शहर आणि ग्रामीण भागातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. सर्वांनी सहकार्य करावे. अडचणीचा काळ आहे.

अशावेळी राजकारण नको मिळून कोरोनावर मात करूया. ऑक्सिजन, लसीकरण , रेमाडीसीवीर इंजेक्शन साठी आम्ही प्रयत्न करतोय.

ऑक्सिजन साठी तर उस्मानाबाद आणि सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांमध्ये शालेय विद्यार्थ्यांप्रमाणे भांडण झाले. प्रशासकीय अधिकारी जीव तोडून काम करताहेत. त्यामुळे सर्वांनी सहकार्य करा असे आवाहन त्यांनी केलं.

उजनीचे पाणी पळविल्याचे सिध्द झाल्यास राजीनामा देईल

उजनी धरणातील पाणी इंदापूरला पळविल्याचा आरोप पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यावर करण्यात येत आहे. मात्र, उजनी धरणातील आरक्षित पाण्यातून एक थेंब जरी मी पळविल्याचे सिध्द झाल्यास, मंत्रीपदासह आमदारकीचा राजीनामा देईन, असे आव्हान त्यांनी दिले आहे.


उजनीतील पाणी सोलापुरातील शेतकऱ्यांना, सोलापूर शहरासाठी पुरेशा प्रमाणात मिळत नाही. तशातच इंदापूरला पाणी पळविल्याने नाराजीत भर पडली आहे. सत्ताधारी पक्षातील पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसह विरोधक आता म्हणत आहेत की, पालकमंत्री नुसतेच गोड बोलतात, आश्‍वासन देतात, परंतु कोरोना काळात त्यांनी पालकमंत्री म्हणून जिल्ह्यासाठी काहीच केले नाही, असा आरोपही त्यांच्यावर केला जात आहे.

सोलापूर : पंढरपूर-मंगळवेढा पोट निवडणुकीनंतर आचारसंहिता शिथिल करण्यास निवडणूक आयोगाने परवानगी दिली. त्यावेळी आपण आचारसंहितेमुळे जिल्ह्याकडे लक्ष देऊ शकलो नसल्याची दिलगिरी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्यक्‍त केली.

मात्र, इंदापूरसाठी उजनीतून पाणी पळविल्याचा आरोप आणि कोरोना काळात हॉस्पिटलमध्ये बेड नाहीत, ऑक्‍सिजन नाही, रेमडेसिव्हिर इंजेक्‍शन मिळत नाहीत. लसदेखील पुरेशा प्रमाणात मिळत नाही.

या पार्श्‍वभूमीवर पाकलमंत्र्यांवर सत्ताधारी पक्षातील पदाधिकाऱ्यांसह विरोधकांनी आरोप करीत पालकमंत्री बदल्याचीच मागणी केली आहे. आमदार प्रणिती शिंदे यांना पालकमंत्री करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

पंढरपूर-मंगळवेढा पोट निवडणुकीच्या प्रचारात गुंग असलेल्या पालकमंत्र्यांना कोरोना आढावा बैठकीसह ठोस, धोरणात्मक निर्णय घेण्यास निवडणूक आयोगाने नुकतीच परवानगी दिली. त्यानंतर त्यांनी मंगळवेढा, पंढरपूर, माळशिरस, बार्शी, मोहोळ या तालुक्‍यांची आढावा बैठक घेतली.

मागील तीन दिवसांपासून पालकमंत्री दत्तात्रय भरणे हे सोलापूर दौऱ्यावर आहेत. मात्र, त्यांच्याबद्दल नाराजी प्रचंड वाढली असून कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील यांनी त्यांच्यावर शनिवारी टीका केली.

तर आज सोलापुरातील नियोजन भवनात आयोजित बैठकीला शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गणेश वानकर यांना बैठकीला जाताना पोलिसांनी अडविले. त्यांनी वरिष्ठांना कॉल केल्यानंतर त्यांना प्रवेश देण्यात आला. तत्पूर्वी, महापालिकेचे सभागृह नेते श्रीनिवास करली यांनाही अडविण्यात आले.

माजी सभागृह नेत्यांना प्रवेश दिलाच नाही. या पार्श्‍वभूमीवर पालकमंत्रीच बदला, असा सूर आता महाविकास आघाडीच्या नेत्यांसह विरोधकांमधून ऐकायला मिळत आहे. दरम्यान, शनिवारी बार्शी व अन्य तालुक्‍यातील लोकांनी पालकमंत्र्यांना विरोध करून काळे झेंडे दाखविले होते.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: उजनीपाणीपालकमंत्री दत्तात्रय भरणे

संबंधित बातम्या

खास योजना! फक्त 90 दिवसांसाठी 9 टक्के सर्वाधिक व्याजदर; विठाई परिवार अर्बन बँकेची नवरात्रोत्सवानिमित्त घोषणा

फक्त भेट द्या आणि जिंका! नवरात्रीनिमित्त ‘विठाई परिवार मल्टीस्टेट’कडून मोफत लकी ड्रॉ कूपन योजना सुरू; प्रत्येक शाखेत नवदुर्गांचा सन्मान व होम मिनिस्टर कार्यक्रमांचे आयोजन

October 13, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ; सोलापूर शिक्षण विभागाचे शाळांना आदेश; शासनाच्या निर्णयानुसार ‘या’ परीक्षांसाठी शुल्कमाफी लागू

October 13, 2026
महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

हो पाऊस येणार! पंजाबराव डख यांनी थेट तारीख सांगितली; ‘जीवदान’ ठरणारा हवामान अंदाज समोर

October 13, 2026
गालबोट! मंगळवेढ्यात वर्ग वाटपावरून शिक्षक-मुख्याध्यापकात हमरीतुमरी, ‘या’ शाळेतील प्रकार; कारवाईसाठी ‘प्रहार’ संघटना आक्रमक

अद्भूत धाडस! विषारी ‘कोब्रा’ चावला, ब्लेडने रक्त काढले अन् सापाला सोबत घेऊन गाठला दवाखाना; मंगळवेढ्याच्या प्राचार्यांचा काळजाचा ठोका चुकवणारा थरार; अखेर मृत्यूवर मात

October 12, 2026
विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षांसाठी वीजपुरवठा सुरळीत ठेवा

दुहेरी संकट! दुष्काळात ‘करंट’चा झटका; अंगाची लाही अन् विजेचा खोडसाळपणा; भीषण दुष्काळात सोलापूर जिल्ह्यात भारनियमनाचा घाव

October 11, 2026
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिलासा: पंचनामे पूर्ण; केंद्रीय पथक पाहणीसाठी दाखल; आज मंगळवेढ्यात; मदत कधी आणि किती मिळणार?

October 10, 2026
मंगळवेढा तालुक्यात एकाच दिवशी कोरोनाने घेतला दोघांचा बळी; आज 10 जणांना लागण

मृतांच्या टाळूवरचं लोणी! कोरोनातील २२ मृतांवर कागदोपत्री ‘उपचार’ दाखवून लाटले २ कोटी; मृत्यूनंतर ६ वर्षांनी ‘उपचार’?

October 11, 2026
सोन्याच्या पावलांनी गौराई आली…; गौरी पूजनासाठी लागणारे साहित्य कोणते? ‘अशी’ करा पूजेची मांडणी

नवरात्र नऊ नाही, यंदा तब्बल १० दिवसांचे! सप्तमी तिथी वाढली; असा आहे घटस्थापनेचा मुहूर्त

October 10, 2026
पालकमंत्रिपदी नियुक्त झाल्यानंतर पहिल्यांदाच जयकुमार गोरे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

मागणी करा, चारा डेपो लगेच सुरू होणार; सोलापूरच्या शेतकऱ्यांना पालकमंत्र्यांचा मोठा दिलासा; रब्बी पेरणीपूर्वी ‘हे’ तपासण्याचे आवाहन

October 8, 2026
Next Post
टेन्शन वाढले! मंगळवेढ्यातील ‘हा’ भाग कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित; पाहा कुठे काय बंद आणि काय सुरू राहणार

मंगळवेढा तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला 'हे' गाव प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित

ताज्या बातम्या

खास योजना! फक्त 90 दिवसांसाठी 9 टक्के सर्वाधिक व्याजदर; विठाई परिवार अर्बन बँकेची नवरात्रोत्सवानिमित्त घोषणा

फक्त भेट द्या आणि जिंका! नवरात्रीनिमित्त ‘विठाई परिवार मल्टीस्टेट’कडून मोफत लकी ड्रॉ कूपन योजना सुरू; प्रत्येक शाखेत नवदुर्गांचा सन्मान व होम मिनिस्टर कार्यक्रमांचे आयोजन

October 13, 2026

आमदारांचे आदेश धाब्यावर, माफीनामा नाहीच! संतप्त सर्वसमाजाचा मंगळवेढ्यात लोकशाही मार्गाने एल्गार; आजपासून सह्यांची मोहीम

October 13, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ; सोलापूर शिक्षण विभागाचे शाळांना आदेश; शासनाच्या निर्णयानुसार ‘या’ परीक्षांसाठी शुल्कमाफी लागू

October 13, 2026
महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

हो पाऊस येणार! पंजाबराव डख यांनी थेट तारीख सांगितली; ‘जीवदान’ ठरणारा हवामान अंदाज समोर

October 13, 2026
मंगळवेढ्यात पक्षाची धुरा आता सचिन नागणे यांच्या खांद्यावर; राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) शहराध्यक्षपदी नियुक्ती

मंगळवेढ्यात पक्षाची धुरा आता सचिन नागणे यांच्या खांद्यावर; राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) शहराध्यक्षपदी नियुक्ती

October 12, 2026
गालबोट! मंगळवेढ्यात वर्ग वाटपावरून शिक्षक-मुख्याध्यापकात हमरीतुमरी, ‘या’ शाळेतील प्रकार; कारवाईसाठी ‘प्रहार’ संघटना आक्रमक

अद्भूत धाडस! विषारी ‘कोब्रा’ चावला, ब्लेडने रक्त काढले अन् सापाला सोबत घेऊन गाठला दवाखाना; मंगळवेढ्याच्या प्राचार्यांचा काळजाचा ठोका चुकवणारा थरार; अखेर मृत्यूवर मात

October 12, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा