mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

सोलापूर ब्रेकिंग! अखेर पालकमंत्री दत्ता भरणे आज घेणार कोरोना आढावा बैठक

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
April 18, 2021
in सोलापूर
सोलापुरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्र्यांनी उद्या बोलावली बैठक; सर्व आमदार,खासदारांसह अधिकारी राहणार उपस्थित

टीम मंगळवेढा टाईम्स ।

सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांचे निधन झाल्याने या मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी  शनिवारी मतदान झाले आहे.

पोटनिवडणुकीची आचारसंहिता असल्याने पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांना सोलापुरातील कोरोनासंदर्भातील उपाय योजनांबाबतची आढावा बैठक घेण्यास अडचणी येत होत्या.

या पोटनिवडणुकीसाठी शनिवारी मतदान होताच पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी आज रविवारी सकाळी 11 वाजता सोलापूर जिल्हा प्रशासनातील प्रमुख अधिकाऱ्यांची आढावा बैठक बोलविली आहे.

पोटनिवडणुकीची आदर्श आचारसंहिता अद्यापही सुरु असल्याने या बैठकीसाठी त्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाची परवानगी घेतली आहे.

पालकमंत्री दत्तात्रय भरणे हे आज सोलापूरच्या दौऱ्यावर येत आहेत. सोलापुरातील सात रस्ता येथील नियोजन भवनात सकाळी 11 वाजता प्रमुख प्रशासकीय अधिकाऱ्यांची आढावा बैठक ते घेणार आहेत.

सोलापूर शहर व जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाय योजनांचा ते अधिकाऱ्यांकडून आढावा घेणार आहेत.

गेल्या काही दिवसांपासून सोलापूर शहर व जिल्ह्यात दररोज एक हजार ते दीड हजार नव्या कोरोनाबाधित रुग्णांची भर पडत आहे. पंचवीस ते तीस व्यक्तींचा रोज कोरोनामुळे मृत्यू होत आहे. सोलापूर शहर व जिल्ह्यात कोरोनाच्या संकटात रेमडेसिव्हिर इंजेक्‍शन व ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे.

कोरोनाबाधित रुग्णांना सोलापुरात बेड उपलब्ध होत नाहीत, अशी विदारक स्थिती सोलापूर शहर व जिल्ह्यात सध्या झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री भरणे आजच्या बैठकीत काय निर्णय घेतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मंगळवेढा-पंढरपूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात भरणे यांनी सोलापुरात कोरोना संदर्भात आढावा बैठक घेतली होती.

आचारसंहिता कालावधीत बैठक घेण्यासाठी पालकमंत्र्यांना केंद्रीय निवडणूक आयोगाची परवानगी आवश्‍यक असल्याने ही परवानगी घेऊन त्यांनी ही बैठक घेतली होती. त्यानंतर मात्र पालकमंत्री भरणे यांनी पंढरपुरातील राष्ट्रवादीचे उमेदवार भगिरथ भालके यांच्या प्रचारासाठी बहुतांश वेळ दिला होता.

काल या पोटनिवडणुकीसाठी मतदान होताच भरणे यांनी सोलापुरातील कोरोनाच्या प्रश्‍नाकडे पुन्हा एकदा लक्ष घातले आहे. आजच्या बैठकीत कोरोनाच्या नियमांचे व सूचनांचे पालन करण्यासोबतच पोटनिवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेचे पालन होईल, याची दक्षता प्रशासनातील अधिकाऱ्यांनी घ्यावी, अशी स्पष्ट सूचना पालकमंत्री भरणे यांनी केली आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: कोरोना आढावापालकमंत्री दत्तात्रय भरणेसोलापूर

संबंधित बातम्या

नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

सोलापूर जिल्ह्यातील शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक प्रौढ व्यक्तीसाठी कडक आचारसंहिता लागू; शिक्षण विभागाकडून मुख्याध्यापकांना नोंदवही ठेवण्याचे आदेश

August 26, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

बाबो..! कुत्र्याने कोंबडी पळवल्यावरून दोन कुटुंबांमध्ये हाणामारी; चौघांवर गुन्हा; कोंबडीच्या मागे कुत्रे लागल्यावरून चौघांकडून मारहाण

August 25, 2026
खळबळ! मंगळवेढा तालुक्यात पंतप्रधान किसान सन्मान योजनेत तब्बल २ हजार ६०० बोगस लाभार्थी

सावधान! बचत गट अन् भिशीच्या नावाखाली अडीच कोटींची फसवणूक, तिघांवर गुन्हा; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

August 26, 2026

शाळेत ‘तालिबानी’ कृत्य! शिक्षकाने लाकडी पट्टी अन् बुक्क्यांनी मुलाला तुडवले, २६ दिवसांनंतर अखेर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील घटना

August 24, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

आमदार समाधान आवताडेंना नार्वेकरांकडून ‘राजकीय बूस्टर डोस’; आवताडे समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण

August 23, 2026
महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

बळीराजाचे डोळे आभाळाकडे! सोलापूर जिल्ह्यात कधी पडणार चांगला पाऊस? पंजाबराव डखांनी दिली महत्वाची माहिती

August 25, 2026
जिल्हा बँकेवर मंगळवेढ्यातून ‘नवी उमेद’! लिंगाणा पाटील पतसंस्था मतदारसंघातून रिंगणात उतरणार; तालुक्यातील दिग्गजांची साथ; मंगळवेढ्यात राजकीय घडामोडींना वेग

जिल्हा बँकेवर मंगळवेढ्यातून ‘नवी उमेद’! लिंगाणा पाटील पतसंस्था मतदारसंघातून रिंगणात उतरणार; तालुक्यातील दिग्गजांची साथ; मंगळवेढ्यात राजकीय घडामोडींना वेग

August 20, 2026
धनश्री मल्टीस्टेटची ऐतिहासिक गरुडभरारी; १५ वर्षांत गाठला १,५०१ कोटींच्या ठेवींचा टप्पा; पारदर्शक कारभार अन् ग्राहकांचा विश्वास

धनश्री मल्टीस्टेटची ऐतिहासिक गरुडभरारी; १५ वर्षांत गाठला १,५०१ कोटींच्या ठेवींचा टप्पा; पारदर्शक कारभार अन् ग्राहकांचा विश्वास

August 19, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

सावधान! इन्स्टाग्रामवर ओळख झाली अन्… मंगळवेढ्यातील महिलेची मोठी फसवणूक, पोलिसांत गुन्हा दाखल

August 18, 2026
Next Post
पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीसाठी पहिल्या दिवशी दाखल झाले ‘एवढे’ अर्ज; बावीस इच्छुकांनी घेतले 24 उमेदवारी अर्ज

मंगळवेढा ब्रेकिंग! मतदान करतानाचा फोटो केला व्हायरल; मंगळवेढा पोलिसात गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

जि.प. अन् पं.स.मध्ये नामनिर्देशित सदस्यांसाठी नियम निश्चित; विविध क्षेत्रांतील अनुभवी व तज्ज्ञ व्यक्तींना मिळणार प्रतिनिधित्व

August 28, 2026
रक्षाबंधन आजच! दिवसभरात ‘या’ 5 मुहूर्तात कधीही बांधा राखी; फक्त ‘ही’ वेळ सांभाळा

रक्षाबंधन आजच! दिवसभरात ‘या’ 5 मुहूर्तात कधीही बांधा राखी; फक्त ‘ही’ वेळ सांभाळा

August 28, 2026
खास योजना! फक्त 90 दिवसांसाठी 9 टक्के सर्वाधिक व्याजदर; विठाई परिवार अर्बन बँकेची नवरात्रोत्सवानिमित्त घोषणा

विठाई परिवार बँकेचा उद्या तिसरा वर्धापन दिन; अवघ्या ३ वर्षांत १५० कोटींच्या व्यवसायाचा टप्पा पूर्ण; मोफत आरोग्य तपासणी आणि महिलांसाठी रक्षाबंधन विशेष ठेव योजना जाहीर

August 27, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

काम कागदावर, पैसे खिशात! ‘या’ गावात बोगस बिले काढून लाखोंचा अपहार; मंगळवेढा BDO कडे तक्रार दाखल

August 27, 2026
मंगळवेढ्याच्या शेतकऱ्यास राष्ट्रीय कृषी पुरस्कार; भारतीय कृषी अनुसंधान परिषेदेची घोषणा

संतभूमी मंगळवेढ्याच्या सर्वांगीण विकासासाठी नागरिकांची वज्रमूठ; पक्षभेद विसरून एकत्र येण्याचे आवाहन

August 27, 2026
सोलापूर ग्रामीणमध्ये आज 244 जण कोरोनामुक्त, 223 नवे रुग्ण; वीस वर्षीय तरुणीचा मृत्यू

मोठी बातमी! कोरोनानंतर आता पुन्हा एका आजाराने डोके काढले वर; रुग्णांची संख्या वाढतेय झपाट्याने, गेल्या 24 तासांत…

August 26, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा