mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मंगळवेढ्यात महाविकास आघाडी मार्फत केंद्र सरकारच्या शेती कायद्याचे विरोधी रास्ता रोको

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
February 6, 2021
in मंगळवेढा

टीम मंगळवेढा टाईम्स ।

मंगळवेढा येथील बोराळे नाका येथे केंद्र सरकारच्या शेतकरी विरोध कायदे निषेधार्थ व दिल्ली येथे शेतकरी अंदोलन करण्यात येत असलेल्या शेतकरी बांधवांच्या समर्थनार्थ मंगळवेढा शहर व तालुका येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, काँग्रेस पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, संभाजी ब्रिगेड, अन्य विविध संघटना यांचे नेतृत्वाखाली रास्ता रोको करण्यात आले.

यावेळी संभाजी ब्रिगेडचे समाधान क्षीरसागर यांनी आपल्या भाषणात शेतकरी बांधवांच्या व्यथा व्यक्त करत केंद्र सरकार हे शेतकरी व सामान्य माणसाचे विरोधी नवीन नवीन कायदे आमलात आणून उद्योगपती यांचे हित जोपासत आहे अशा सरकारचा संभाजी ब्रिगेड मंगळवेढा याचे वतीने निषेध व्यक्त केला.

त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष भारत बेदरे यांनी सरकारच्या धोरणांवर जोरदार टिका करत शेतकरी बांधवांना केंद्र सरकारने देशद्रोही म्हटलेचा निषेध मंगळवेढा शहर व तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे वतीने नोंदविला.

मंगळवेढा काँग्रेसचे वतीने युवक नेते मनोज माळी केंद्र सरकारने शेतकरी अंदोलन मार्गावर जसे खिळे रोवले आहेत तसे सीमेवर केले असते तर चिनने अतिक्रमण केले नसते वगैरे मनोगत व्यक्त करत निषेध केला.

किसान शेतकरी संघटनेचे सिध्देश्वर हेंबाडे यांनी केंद्र सरकार शेतकरी बांधवांना करत असलेल्या अन्याय म्हणजे ह्या सरकारचे पापाचा घडा भरला असून ह्याना हयाची जागा दाखवली पाहीजे ते शेतकरी करून दाखवतील म्हणून निषेध व्यक्त केला.

मंगळवेढा नगरपरिषद तर्फे अंदोलनास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्षा सौ. अरूणा माळी यानी केंद्र सरकार वर कायद्याचे विरोधी टिका करत शेतकरी वर्गाचा सूड घेणेचे उददेशाने उदयोजकांना हाताशी धरून सत्ता जोरावर मनमानी कायदे निषेधार्थ अंदोलनास साथ दिली.

मंगळवेढा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प. महाराष्ट्र अध्यक्ष राहूल घुले यांनी केंद्र सरकार हे जनेवराची कातडी घातलेला आहे. ह्याला सामान्य जनतेचे शेतकरी वर्गाचे हिताचे रक्षण करणे याचे काही नाही आज सत्तर दिवसापासुन दिल्ली येथे ऊन वारा पाऊस सोसून शेतकरी अंदोलन करत आहेत कित्येक शेतकरी शहीद झाले पण शेतकरी कायदा रद्द करणे ऐवजी अंदोलन कसे चिगळता येईल यासाठी नवनवीन योजना राबवल्या जातात या सरकारचा निषेध केला.

यावेळी सुत्रसंचालन मंगळवेढा शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक अध्यक्ष संदीप बुरकुल यानी केले. केंद्र सरकारच्या शेती कायद्याचे विरोधी रास्ता रोको आंदोलन करीता मंगळवेढा शहरातून व तालुक्यातून काँग्रेस पक्षाचे नंदकुमार पवार, राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभाग चे विजय खवतोडे, काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष मारूती वाकडे,राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष मुजम्मील काझी, काँग्रेस शहराध्यक्ष राजाराम सुर्यवंशी,पक्ष नेते अजित जगताप,नगरसेवक प्रवीण खवतोडे, जिल्हा सरचिटणीस दिलीप जाधव,  स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष तानाजी बागल, तालुकाध्यक्ष श्रीमंत केदार, बिराजदार, आबा खांडेकर, शहराध्यक्ष हर्षद डोरले, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य पी बी पाटील सर,सौ.संगीता कट्टे पाटील तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी महिला काँग्रेस, सौ.प्रफुलता स्वामी शहराध्य, मुरलीधर घुले, सोमनाथ माळी, प्रविण हजारे, दादा टाकणे, दयानंद सोनगे, संतोष सोनगे, पंडित गवळी, नाथा ऐवळे, अमोल बचुटे,  मंदा सावंजी, सारिका सलगर , रेखा साळुंखे , स्मिता अवघडे , सुनीता मेटकरी, महानंदा धुमाळे, विनायक दत्तू,अजित गायकवाड, स्वप्निल भगरे, युवक वर्ग मोठ्या संख्येने  उपस्तिथ होते .

मंगळवेढा येथे महाविकास आघाडी यांचे मार्फत केंद्र सरकारच्या गॅस दरवाढीच्या  विरोधी चूल पेटवून अंदोलन

मंगळवेढा येथील बोराळे नाका येथे केंद्र सरकारच्या  गॅस दरवाढीच्या निषेधार्थ शहर व तालुका येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस महिला, काँग्रेस पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, संभाजी ब्रिगेड, अन्य विविध संघटना यांचे नेतृत्वाखाली चूल पेटवून अंदोलन  करण्यात आले.

संध्या संपूर्ण जगभरात कोरोनो रोगाचा थैमान माजला असताना मागील दहा महीने पासून सामान्य माणसाला उपासमारीची वेळ आली आहे हाताला कामधंदा नाही.

कुटुंबीयांचे पालनपोषणाची जबाबदारी यातच वाढलेली महागाई व शेतकरी अंदोलन आशा विविध घटना मनुष्य जिवन खिळखिळा करत असताना सामान्य  वर्गाचा सूड घेणेचे उददेशाने उदयोजकांना हाताशी धरून सत्ता जोरावर मनमानी कायदे करणे गॅस दरवाढीचा मनमानी कारभार सुरु करणे.

सरकार हे जनतेचे हितासाठी आहे की उदयोजकांचे हिताचे हे समजणे अवघड झाले आहे. भारत देश हा शेती व त्यावर पुरक अशा कामावर जाणारा देश असताना शेतकरी वर्गाचे कबरटे मोडण्याचे काम केंद्र सरकार करत आहे. केंद्र सरकार हे जनावराची कातडी घातलेले सरकार आहे.

सरकारने घेतलेला गॅस दरवाढीचा निर्णय त्वरित मागे घेवून  सामान्य जनतेला न्याय दयावा म्हणून मंगळवेढा महाविकास आघाडी चे सर्व पदाधिकारी यांचे मार्फत मा. तहसीलदार मंगळवेढा यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी गॅस दरवाढीच्या आंदोलन करीता मंगळवेढा शहरातून व तालुक्यातून मंगळवेढा नगरपरिषद नगराध्यक्षा सौ. अरूणा माळी, सौ.संगीता कट्टे पाटील तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी महिला काँग्रेस, सौ.प्रफुलता स्वामी शहराध्यक्ष, काँग्रेस पक्षाचे नंदकुमार पवार, राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभाग चे विजय खवतोडे, काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष मारूती वाकडे,राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष भारत बेदरे, शहराध्यक्ष मुजम्मील काझी, काँग्रेस शहराध्यक्ष राजाराम सुर्यवंशी,पक्ष नेते अजित जगताप,नगरसेवक प्रवीण खवतोडे, जिल्हा सरचिटणीस दिलीप जाधव,  स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष तानाजी बागल, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राहूल घुले, तालुकाध्यक्ष श्रीमंत केदार, बिराजदार, आबा खांडेकर, शहराध्यक्ष हर्षद डोरले, किसान शेतकरी संघटनेचे सिध्देश्वर हेंबाडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य पी बी पाटील सर, संभाजी ब्रिगेड चे समाधान क्षीरसागर व संदीप फडतरे, राष्ट्रवादी शहर युवक अध्यक्ष संदीप बुरकुल, मुरलीधर घुले, सोमनाथ माळी, प्रविण हजारे, दादा टाकणे, दयानंद सोनगे, संतोष सोनगे, पंडित गवळी, नाथा ऐवळे, अमोल बचुटे,  मंदा सावंजी, सारिका सलगर , रेखा साळुंखे , स्मिता अवघडे , सुनीता मेटकरी, महानंदा धुमाळे, विनायक दत्तू,अजित गायकवाड, स्वप्निल भगरे, युवक वर्ग मोठ्या संख्येने  उपस्तिथ होते .

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: मंगळवेढामहाविकास आघाडीरास्ता रोको

संबंधित बातम्या

सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड, १० लाख रुपयांचे बक्षीस; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा होणार सन्मान

प्रधानमंत्री आवास योजनेतून बाद ठरलेल्या पात्र लाभार्थ्यांना मोठी संधी; ‘या’ तारखेपूर्वी हमीपत्र सादर करण्याचे सभापती दीपाली ताड यांचे आवाहन

August 26, 2026
हुलजंतीत ‘कृष्णा महिला पतसंस्थेच्या’ नवीन शाखेचा भव्य उद्घाटन सोहळा; १०० दिवसांच्या ठेवीवर १०% व्याजाची ‘शुभारंभ योजना’ लागू

हुलजंतीत ‘कृष्णा महिला पतसंस्थेच्या’ नवीन शाखेचा भव्य उद्घाटन सोहळा; १०० दिवसांच्या ठेवीवर १०% व्याजाची ‘शुभारंभ योजना’ लागू

August 24, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

आमदार समाधान आवताडेंना नार्वेकरांकडून ‘राजकीय बूस्टर डोस’; आवताडे समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण

August 23, 2026
शेतकर्‍यांना एफआरपीनुसार उसाची बिले दिली नाहीत; सोलापूर जिल्ह्यात ‘हे’ कारखाने रेड झोनमध्ये

साखरेचा भाव वाढला, मग उसाचा का नाही? शेतकऱ्याच्या घामाला योग्य किंमत मिळावी; प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष राकेश पाटील यांचा खरमरीत सवाल

August 23, 2026
तगडा उमेदवार! पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा; भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत निवडणूक लढवणार?

विद्यार्थी व प्रवाशांना मोठा दिलासा! मंगळवेढा आगारासाठी ५ नव्या एसटी बसेस दाखल; अनिल सावंत यांच्या पाठपुराव्याला यश; परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून मागणी मान्य

August 22, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

गावाचे अस्तित्व वाचवण्यासाठी लढा, पण पोलिसांचा 35 ग्रामस्थांवर गुन्हे; मंगळवेढ्यात बायपास आंदोलनावरून ग्रामस्थ आक्रमक; हक्क मागणे हा गुन्हा आहे का?

August 21, 2026
जिल्हा बँकेवर मंगळवेढ्यातून ‘नवी उमेद’! लिंगाणा पाटील पतसंस्था मतदारसंघातून रिंगणात उतरणार; तालुक्यातील दिग्गजांची साथ; मंगळवेढ्यात राजकीय घडामोडींना वेग

जिल्हा बँकेवर मंगळवेढ्यातून ‘नवी उमेद’! लिंगाणा पाटील पतसंस्था मतदारसंघातून रिंगणात उतरणार; तालुक्यातील दिग्गजांची साथ; मंगळवेढ्यात राजकीय घडामोडींना वेग

August 20, 2026
हक्काच्या पैशांसाठी वृद्धांची फरफट! ३ दिवस उलटले तरी चेअरमन-संचालक गायब; दामाजी कारखान्याला ‘गेट बंद’चा थेट इशारा; मंगळवेढ्यात संतापाचा भडका

​वर्षानुवर्षांचा वनवास संपणार कधी? थकीत रकमांचा निर्णय होईना; दामाजी कारखान्याचे निवृत्त कर्मचारी आक्रमक; आज कारखान्याला ठोकणार कुलूप?

August 19, 2026
धनश्री मल्टीस्टेटची ऐतिहासिक गरुडभरारी; १५ वर्षांत गाठला १,५०१ कोटींच्या ठेवींचा टप्पा; पारदर्शक कारभार अन् ग्राहकांचा विश्वास

धनश्री मल्टीस्टेटची ऐतिहासिक गरुडभरारी; १५ वर्षांत गाठला १,५०१ कोटींच्या ठेवींचा टप्पा; पारदर्शक कारभार अन् ग्राहकांचा विश्वास

August 19, 2026
Next Post

कै.कमलाकर पाटील यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्ताने पाटखळ येथे आज भजन व स्मरणिका प्रकाशन सोहळा

ताज्या बातम्या

सोलापूर ग्रामीणमध्ये आज 244 जण कोरोनामुक्त, 223 नवे रुग्ण; वीस वर्षीय तरुणीचा मृत्यू

मोठी बातमी! कोरोनानंतर आता पुन्हा एका आजाराने डोके काढले वर; रुग्णांची संख्या वाढतेय झपाट्याने, गेल्या 24 तासांत…

August 26, 2026
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड, १० लाख रुपयांचे बक्षीस; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा होणार सन्मान

प्रधानमंत्री आवास योजनेतून बाद ठरलेल्या पात्र लाभार्थ्यांना मोठी संधी; ‘या’ तारखेपूर्वी हमीपत्र सादर करण्याचे सभापती दीपाली ताड यांचे आवाहन

August 26, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

सोलापूर जिल्ह्यातील शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक प्रौढ व्यक्तीसाठी कडक आचारसंहिता लागू; शिक्षण विभागाकडून मुख्याध्यापकांना नोंदवही ठेवण्याचे आदेश

August 26, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

बाबो..! कुत्र्याने कोंबडी पळवल्यावरून दोन कुटुंबांमध्ये हाणामारी; चौघांवर गुन्हा; कोंबडीच्या मागे कुत्रे लागल्यावरून चौघांकडून मारहाण

August 25, 2026
खळबळ! मंगळवेढा तालुक्यात पंतप्रधान किसान सन्मान योजनेत तब्बल २ हजार ६०० बोगस लाभार्थी

सावधान! बचत गट अन् भिशीच्या नावाखाली अडीच कोटींची फसवणूक, तिघांवर गुन्हा; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

August 26, 2026
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी फडणवीस सरकारला मुदत दिली; मागण्या पूर्ण न झाल्यास ‘या’ तारखेपासून उपोषण सुरू करणार

August 25, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा