mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

बर्ड फ्ल्यू! राज्यात हाय अलर्ट जारी; आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, ‘हा’ आजार अत्यंत धोकादायक

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
January 12, 2021
in राज्य
बर्ड फ्ल्यू! राज्यात हाय अलर्ट जारी; आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, ‘हा’ आजार अत्यंत धोकादायक

टीम मंगळवेढा टाईम्स ।

बर्ड फ्लू हा आजार अत्यंत धोकादायक असून याचा मृत्यूदर हा 10 ते 12 टक्के इतका आहे. त्यामुळे राज्यात हायअलर्ट जारी करण्यात आला आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

जालना येथे ते बोलत होते. टोपे म्हणाले, देशातील अनेक राज्यांमध्ये सध्या बर्ल्ड फ्लूने थैमान घातले असून महाराष्ट्रातही त्याचा शिरकाव झाला आहे.

यामुळे या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी पशुसंवर्धन आणि आरोग्य विभागाने अलर्ट जारी केला असल्याचे त्यांनी सांगितले.

करोनाशी सामना करणाऱ्या महाराष्ट्रापुढे आता बर्ड फ्लूचे संकट उभे ठाकले आहे. परभणी, मुंबई, ठाणे, बीड आणि दापोलीमधील कोंबड्यांचा मृत्यू झाला होता.

या कोंबड्यांच्या मृत्यूचा अहवाल भोपाळ येथील एका प्रयोगशाळेकडून देण्यात आला असून त्यात बर्ड फ्लूमुळेच मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे बर्ड फ्लूचा फैलाव झालेले महाराष्ट्र हे देशातील आठवे राज्य ठरले आहे.

तथापि, अंडी किंवा कोंबडीचे सेवन करणे पूर्णपणे सुरक्षित आहे. कारण विषाणू स्वयंपाकाचे तापमान सहन करू शकत नाही. यामुळे नागरिकांनी चिंता करण्याची गरज नाही, असे राज्याचे पशुसंवर्धन विभाग सचिव अनूप कुमार यांनी सांगितले.

परभणी येथील मुरंबा गावामध्ये एका पोल्ट्री फार्ममध्ये 800 कोंबड्या मृत अवस्थेत आढळून आल्यामुळे खळबळ उडाली होती. या कोंबड्यांना बर्ड फ्लू झाला, अशी अफवा असतानाच पशुसंवर्धन विभाग आणि प्रशासनाने पक्ष्यांचे नमुने प्रयोगशाळेत पाठवले होते.

या कोंबड्यांचा मृत्यू हा बर्ड फ्लूमुळेच झाला, असे आता निष्पन्न झाले आहे.तसेच मुरंबा येथे पोल्ट्री फार्ममध्ये मृत कोंबड्या आढळून आल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने मुरंबा गाव आणि परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले आहे.

या ठिकाणी असलेल्या नागरिकांना, बाहेर पडण्यास मज्जाव करण्यात आला असून, नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी केले आहे.

ठाण्यात आढळलेल्या मृत तीन पोपटांनाही या विषाणूची लागण झाल्याचे एका चाचणी अहवालातून स्पष्ट झाले आहे. तसेच बीड आणि दापोली येथील मृत कावळयांमध्येही हे विषाणू आढळून आले आहेत.

ठाणे महापालिकेने या परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी नियंत्रण कक्ष स्थापन केले असून शहरातील पक्षी मृत्यूच्या कोणत्याही घटनेची तातडीने अहवाल द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

दरम्यान, राज्यात बर्ड फ्लूची प्रकरणे समोर आल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याची दखल घेत या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी तातडीने एक बैठक बोलावली आहे. या बैठकीत या आजाराची तीव्रता आणि एकूण परिस्थिती समोर येईल.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: बर्ड फ्ल्यूमहाराष्ट्रराजेश टोपे

संबंधित बातम्या

विधानपरिषद निवडणुकीचा निकाल जाहीर, कोणाकोणाचा विजय? महाविकास आघाडीला मोठा धक्का; निकाल जाणून घ्या एका क्लिकवर

मोठी बातमी! ‘या’ महामार्गास कॅबिनेटची मंजुरी, महाराष्ट्र GST कायद्यात सुधारणा; मंत्रिमंडळ बैठकीत ‘हे’ 8 मोठे निर्णय

June 24, 2025

कामाची बातमी! सतरंज्या उचलणारे कार्यकर्ते होणार अधिकारी; निवडणुकीपूर्वी फडणवीस सरकारकडून खास संधी

June 24, 2025
सर्वात मोठी बातमी! लोकसभा निवडणुकीच्या तारखा ‘या’ दिवशी जाहीर होणार?; निवडणूक आयोगाच्या हालचाली सुरु

कधी होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका? प्रभागरचना प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर; असे असणार महत्त्वाचे टप्पे

June 24, 2025
सोलापुरातील शेतकऱ्यांच्या फायद्याची बातमी; ‘कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी’ आता नव्याने ‘असा’ अर्ज करता येणार

शेतकऱ्यांसाठी खास बातमी; केंद्रीयमंत्री नितीन गडकरींची ‘ट्रॅक्टर’ बाबत मोठी घोषणा

June 24, 2025
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

तीस दिवसांत पालकांचे घर सोडा! आई-वडिलांच्या इच्छेविरुद्ध मुलगा-सून घरात राहू शकत नाहीत; उच्च न्यायालयाने केले स्पष्ट

June 23, 2025
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

हृदय पिळवटणारी घटना! परीक्षेत कमी गुण मिळाल्याने वडिलांच्या मारहाणीत पोटच्या लेकीचा मृत्यू; पप्पा, तुम्ही कलेक्टर झालात का? उलट उत्तर देताच…

June 23, 2025
विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून, सर्वसामान्यांना काय मिळणार? असं असेल अधिवेशनाचे कामकाज

सरकार लाडक्या बहिणींना खुश करणार! स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महिला मतांवर डोळा; आता लाडक्या बहिणींना मिळणार ९ टक्के व्याजाने ‘इतक्या’ लाखापर्यंत कर्ज

June 22, 2025
डाळिंबातील ‘बी’ श्‍वासनलिकेत अडकल्याने बालिकेचा मृत्यू; सोलापूरातील ‘या’ गावातील दुर्दैवी घटना!

शैतानी वृत्ती! मदरशाला सुट्टी मिळावी म्हणून अल्पवयीन मुलाने केली मित्राची हत्या; तोंडांत बोळा कोंबून दिला इलेक्ट्रिक शॉक

June 19, 2025
वीस दिवसांपूर्वी लग्न झालेल्या तरुणीची एकविसाव्या दिवशी प्रियकरासह आत्महत्या

बँकेच्या गेटवर गळफास! लेकीच्या लग्नासाठी ठेवीचे पैसे मिळेनात; चकरा मारुन थकलेल्या बापाचं टोकाचं पाऊल

June 19, 2025
Next Post
पंढरपूर ब्रेकिंग! कार्तिकी यात्रेच्या पार्श्वभूमीवर विठ्ठल-रुक्मिणीचे मुखदर्शन तीन दिवस बंद राहणार

आनंदाची बातमी! आता पासविनाही भक्तांना विठुरायाचे मुखदर्शन घेता येणार

ताज्या बातम्या

विधानपरिषद निवडणुकीचा निकाल जाहीर, कोणाकोणाचा विजय? महाविकास आघाडीला मोठा धक्का; निकाल जाणून घ्या एका क्लिकवर

मोठी बातमी! ‘या’ महामार्गास कॅबिनेटची मंजुरी, महाराष्ट्र GST कायद्यात सुधारणा; मंत्रिमंडळ बैठकीत ‘हे’ 8 मोठे निर्णय

June 24, 2025

कामाची बातमी! सतरंज्या उचलणारे कार्यकर्ते होणार अधिकारी; निवडणुकीपूर्वी फडणवीस सरकारकडून खास संधी

June 24, 2025
पावसाचा कहर! उजनीतून दीड लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग, भीमाकाठी सावधानतेचा इशारा 

‘उजनी’त ३० हजारांचा विसर्ग धरणातील पातळी ‘इतके’ टक्के; भीमेत विसर्ग वाढला, बंधारे पाण्याखाली जाण्याची भीती

June 24, 2025
सर्वात मोठी बातमी! लोकसभा निवडणुकीच्या तारखा ‘या’ दिवशी जाहीर होणार?; निवडणूक आयोगाच्या हालचाली सुरु

कधी होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका? प्रभागरचना प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर; असे असणार महत्त्वाचे टप्पे

June 24, 2025
सोलापुरातील शेतकऱ्यांच्या फायद्याची बातमी; ‘कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी’ आता नव्याने ‘असा’ अर्ज करता येणार

शेतकऱ्यांसाठी खास बातमी; केंद्रीयमंत्री नितीन गडकरींची ‘ट्रॅक्टर’ बाबत मोठी घोषणा

June 24, 2025
नागरिकांनो! अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त ‘खोमनाळ’मध्ये आज इंदुरीकर महाराजांचे कीर्तन; हजारोंच्या संख्येने असणार गर्दी

नागरिकांनो! अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त ‘खोमनाळ’मध्ये आज इंदुरीकर महाराजांचे कीर्तन; हजारोंच्या संख्येने असणार गर्दी

June 24, 2025
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा