टीम मंगळवेढा टाईम्स ।
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार स्व.भारत भालके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर होणाऱ्या पोटनिवडणूकीत स्व.भालके यांच्या वारसांनाच उमेदवारी देण्यात यावी.
मतदार संघाची लोकभावना असल्याने जिल्हा राष्ट्रवादीकडून खा शरद पवार,उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे करण्यात आली आहे. त्यामुळे नानांच्या वारसानांच उमेदवारी मिळेल.
पार्थ पवार यांना या पोटनिवडणुकीत उमेदवारी अशी अफवा पसरवून घाणेरडे राजकारण करण्यात येत आहे या संदर्भात उपमुख्यमंत्र्यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली आहे. असे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांनी सांगितले.
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघातील निवडणूक बिनविरोध व्हावी. यासाठी राष्ट्रवादी प्रयत्न शील आहे. ही निवडणूक बिनविरोध करणे म्हणजेच भारतनानांना खरी श्रद्धांजली असून, यास विरोधी पक्षाचेही दुमत असण्याचे कारण नाही.
शेवटच्या श्वासापर्यंत लोककल्याणासाठी आपले आयुष्य वेचणाऱ्या स्व.भालके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर सर्वसंमतीने त्यांच्या वारसदारांपैकी एकाला उमेदवारी ही काळया दगडावरची रेघ आहे.
मात्र, मध्यंतरी पार्थ पवार यांचे नाव पुढे आणून अफवा पसरवण्याचे घाणेरडे राजकारण करून वातावरण ढवळून काढण्याचा प्रयत्न केला गेला. ही बाब चुकीचे असल्याचे साठे म्हणाले.(पुण्यनगरी)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज