टीम मंगळवेढा टाईम्स ।
गव्हाणीतील कचरा काढत असताना पाय घसरुन गव्हाणीत पडुन चैन मध्ये अडकल्याने महाविर माणिक गर्जे (वय.18 रा.हातोला ता.आष्टी,जि.बिड) या कामगाराचा मृत्यू झाला आहे. ही घटना आज दामाजी साखर कारखान्याच्या गव्हाणीत घडला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की,आज पहाटे 5 च्या सुमारास मंगळवेढा येथील दामाजी कारखाना येथे फिर्यादीचा नातु महाविर माणिक गर्जे हा दामाजी कारखाना येथील ऊस टाकण्याच्या गव्हाणीतीलल कचरा काढत असताना पाय घसरुन गव्हाणीत पडुन चैन मध्ये अडकुन मयत झाला आहे.
मयताची खबर मच्छिंद्र निवृत्ती गर्जे (वय- 50 वर्षे व्यवसाय- शेती , रा. हातोला ता आष्टी जि.बिड) यांनी दिली आहे.
या घटनेची माहिती मंगळवेढा पोलीस ठाण्यात अकस्मात मयत म्हणून दाखल करून मयताचा जाहिर रिपोर्ट तहसिलदार कार्यालयात पाठवुन मयताचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल बामणे हे करीत आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
![ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा](https://mangalwedhatimes.in/wp-content/uploads/2021/12/WhatsApp-Add.gif)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज