mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

धक्कादायक! सोलापूर जिल्ह्यात बिबट्याने केलेल्या हल्ल्यात महीलेचे शीर धडापासून वेगळे

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
December 6, 2020
in सोलापूर
धक्कादायक! सोलापूर जिल्ह्यात बिबट्याने केलेल्या हल्ल्यात महीलेचे शीर धडापासून वेगळे

टीम मंगळवेढा टाईम्स ।

सोलापूर जिल्ह्यातील अंजनडोह (ता. करमाळा) येथे बिबट्याच्या हल्ल्यात एका विवाहित महिला ठार झाली आहे. ही घटना शनिवारी (ता. 5) सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास घडली. जयश्री दयानंद शिंदे (वय 25) असे मृत महिलेचे नाव आहे.

दोन दिवसांत दुसरा बळी बिबट्याने घेतला आहे. त्यामुळे करमाळा तालुक्‍यात प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, या बिबट्याला तत्काळ ठार मारण्याची मागणी केली जात आहे.

अंजनडोहपासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या गावडे वस्तीजवळ ही घटना घडली आहे.जयश्री शिंदे या दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास लिंबुणीच्या बागेत लिंबे गोळा करण्यासाठी गेल्या होत्या. सायंकाळी सहा वाजल्या तरी जयश्री शिंदे घरी आल्या नाहीत म्हणून लिंबुणीच्या बागेत तिच्या शोधासाठी तिचे पती दयानंद शिंदे हे गेले असता जयश्री शिंदे या दिसून आल्या नाहीत.

त्यानंतर त्यांनी हाका मारल्या, मात्र कोणताच आवाज न आल्याने दयानंद शिंदे यांनी बागेत शोधाशोध सुरू केली असता त्यांना लिंबुणीच्या बागेत रक्त सांडलेले दिसून आले. तेथेच त्यांचे मुंडके पडलेले दिसले.

घटनेची माहिती मिळताच तहसीलदार समीर माने, पोलिस निरीक्षक श्रीकांत पाडुळे, सहाय्यक वन संरक्षक संजय कडू, सहाय्यक वन संरक्षक बाळासाहेब हाके यांच्यासह वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी दाखल झाले.

करमाळा तालुक्‍यात आलेला बिबट्या अहमदनगर, बीड जिल्ह्यातून सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्‍यात आला असल्याचा वन अधिकाऱ्यांचा अंदाज आहे. अहमदनगर, बीड भागात बिबट्याने चार बळी घेतले आहेत.

बिबट्याला ठार मारण्याची मागणी

फुंदेवाडी येथे गुरुवारी (ता. 3) कल्याण फुंदे यांचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला. त्यानंतर आज (ता. 5) अंजनडोह (ता. करमाळा) येथे जयश्री शिंदे या विवाहितेचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे.

फुंदेवाडी ते अंजनडोह हे साधारणपणे 18 ते 20 किलोमीटर अंतर आहे. दोन दिवसांत करमाळा तालुक्‍यातील दोन जणांचा बिबट्याने बळी घेतल्याने या नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याची मागणी संपूर्ण तालुक्‍यातून होत आहे.

तर बिबट्याला मारण्याचे आदेश मिळण्याची प्रक्रिया सुरू असून, लवकर आदेश मिळताच बिबट्याला ठार केले जाईल, अशी माहिती वन विभागाचे सहाय्यक वन संरक्षक संजय कडू यांनी दिली आहे.

बिबट्यास गोळ्या घालण्याचे आदेश द्यावेत

करमाळा तालुक्यात बिबट्याने हल्ला करून दोघांना ठार केले आहे, ही घटना गंभीर असून नरभक्षक बिबट्यास संपविण्याची गरज असून बीड जिल्ह्यात बिबट्या दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश राज्य वनपरिक्षेत्र अधिकारी कपोडकर यांनी दिले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर करमाळा तालुक्यातील नरभक्षक बिबट्यास गोळ्या घालण्याचे आदेश द्यावेत.- आ.संजयमामा शिंदे,करमाळा.

मंगळवेढा टाईम्स आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: बिबट्यासोलापूर

संबंधित बातम्या

निवडणूक कामात हलगर्जीपणा; सोलापूर जिल्ह्यातील शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल; दिलेले काम मुदतीत केले नसल्याचा ठेवला ठपका

July 14, 2026
विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षांसाठी वीजपुरवठा सुरळीत ठेवा

कर्नाटकात ८ तास, महाराष्ट्रात फक्त २ तास वीज? भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांचा आक्रोश; शेती धोक्यात; आम्हाला कर्नाटकात जाऊ द्या; शेतकऱ्यांचा सरकारला थेट इशारा

July 12, 2026
जिल्हा दूध संघ अध्यक्ष निवडीची बैठक ‘या’ महिन्यात; आज सर्वच संचालक गैरहजर

तुकाराम मुंडे पॅटर्नचा सांगोल्यात थरकाप! ग्राहकांच्या जिवाशी खेळणारे रॅकेट रडारवर; १५ लाखांचे ३७ हजार लिटर भेसळयुक्त दूध ओतले गटारात

July 12, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

कागदपत्रे बनावट, विद्यार्थीही खोटे! सोलापुरात केंद्र सरकारच्या योजनेत मोठा गैरव्यवहार; बनावट विद्यार्थी दाखवून केंद्राची शिष्यवृत्ती लाटली

July 11, 2026
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

बँकेचे पैसे बुडवणे भोवले! धनश्री मल्टीस्टेटची आक्रमक वसुली; कारखान्याच्या माजी संचालकाची थेट तुरुंगात रवानगी; न्यायालयाचा मोठा दणका

July 10, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

आ.समाधान आवताडेंचा धडाका! मंगळवेढ्याला म्हैसाळचे, तर पंढरपूरला कॅनॉलद्वारे मिळणार पाणी; वीज पुरवठाही ८ तास होणार

July 10, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

हट्टापायी पोटचा मुलगा गेला…; सांगोल्यातील ‘या’ घटनेने पालकांचे डोळे उघडले, नक्की वाचा काय घडलं?

July 8, 2026
शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारणाऱ्या बँकांची आता गय नाही; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन स्वतः करणार अर्जांची तपासणी; ‘या’ ४ बँकांना नोटिसा

मंगळवेढ्यातील १ लाख ९९ हजार मतदारांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी! २००२ च्या यादीत नाव नसेल तर ‘या’ कागदपत्रांशिवाय पर्याय नाही

July 7, 2026
मोठी बातमी! सोलापूरचे नवे SP अतुल कुलकर्णी; शिरीष सरदेशपांडे यांची ‘या’ ठिकाणी झाली बदली

गुन्हेगारांनो सावधान! सुधारा, नाहीतर थेट कारवाई..; पोलिसांची सिंघम स्टाईल ॲक्शन; पोलीस अधीक्षकांनी गुंडांना बोलावून भर चौकात दिला सज्जड दम; लिहून घेतले हमीपत्र

July 7, 2026
Next Post
खळबळ! महिलांच्या जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, ७ जणींना अटक

खळबळ! महिलांच्या जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, ७ जणींना अटक

ताज्या बातम्या

पावसाचा कहर! उजनीतून दीड लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग, भीमाकाठी सावधानतेचा इशारा 

शेतकऱ्यांना दिलासा द्या, उजनी धरणातून पाणी सोडा; मंगळवेढ्यातून प्रा.शिवाजीराव काळुंगे यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे

July 14, 2026

निवडणूक कामात हलगर्जीपणा; सोलापूर जिल्ह्यातील शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल; दिलेले काम मुदतीत केले नसल्याचा ठेवला ठपका

July 14, 2026
धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

भयंकर! लग्नामध्ये सत्कारात नाव पुकारला नाही, रागाच्या भरात तलाठ्यानं तरुणाच्या डोक्यात टाकला लोखंडी माईक

July 14, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

भेसळीच्या विळख्यातून महाराष्ट्राला वाचवण्यासाठी तुकाराम मुंढेंचा ‘हा’ मास्टरप्लॅन; नागरिकांना केली मोठी विनंती

July 14, 2026
शिक्षक बँकेवर ‘गुरुजीं’चा डंका! शिवाजी पाटील गुरुजी व गुलाबराव पाटील यांच्या निवडीनंतर मुंढेवाडीत जल्लोष, भव्य नागरी सत्कार संपन्न

शिक्षक बँकेवर ‘गुरुजीं’चा डंका! शिवाजी पाटील गुरुजी व गुलाबराव पाटील यांच्या निवडीनंतर मुंढेवाडीत जल्लोष, भव्य नागरी सत्कार संपन्न

July 13, 2026
राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

मंगळवेढेकरांनो लक्ष द्या! सोमवारी सकाळी ७ वाजल्यापासून ‘या’ महत्त्वाच्या मार्गांवर अचानक मोठा बदल, नक्की काय घडणार? पालिकेचा मोठा निर्णय

July 13, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा