mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

महिला हॉस्पिटल मध्ये अतिदक्षता (ICU) व शस्त्रक्रिया विभाग सुरु आता सर्व सुविधा मिळणार एकाच छताखाली

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
November 19, 2020
in मंगळवेढा, आरोग्य
महिला हॉस्पिटलमध्ये सर्व सुविधा उपलब्ध; विविध विभाग सुरु, तज्ञ डॉक्टरांची टीम कार्यरत

टीम मंगळवेढा टाईम्स ।

सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी म्हणून उपेक्षित राहिलेल्या परंतु संताच्या पावन नगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या मंगळवेढा तालुक्यात तसे पाहिले तर आरोग्य सेवा पुरवणाऱ्या जेमतेम संस्था कार्यरत आहेत.

आता मंगळवेढा तालुक्यातील मानांकित व महिलांच्या आरोग्याबाबतच्या दर्जेदार सेवा पुरविण्यामुळे  नावारूपाला आलेल्या महिला हॉस्पिटल,बोराळे नाका, विजयपूर रोड वरील नवीन भव्य इमारतीत काही मंगळवेढा तालुका व शहरी भागातील डॉक्टर एकत्र येऊन मंगळवेढा हेल्थ एलएलपी संचलित एक नवीन विविध विभागाचे हॉस्पिटल सुरू केले आहे.

महिला हॉस्पिटल चे रूपांतर आता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये होत आहे यामध्ये अस्थीरोग, मेडिसिन,जनरल सर्जरी
बालरोग, यूरोलॉजी, डेंटल वगैरे अनेक विभाग सुरू  असून अद्यावत असे आयसीयू(ICU) अतिदक्षता विभाग सुरू झालेला आहे.

महिला हॉस्पिटल अँड मल्टीस्पेशालिटी मंगळवेढा येथे सध्या मेडिसीन व यूरोलॉजी विभाग सुरू झाले असून डॉक्टर अविनाश सुरवसे हे एमडी मेडिसिन असून त्यांचे वैद्यकीय शिक्षण सायन हॉस्पिटल मुंबई येथे झाले आहेत.

तर डॉक्टर शशिकांत आसबे एम एस जनरल सर्जरी व एमसीएच यूरोलॉजी असून वैद्यकीय शिक्षण पटियाला झाले असून मूत्ररोग संबधी सेवा देत आहेत.तसेच जनरल  सर्जरी मधील अपेंडिक्स,हर्निया ,गर्भ पिशवी काढणे आदी विविध प्रकारच्या शस्त्रकीया चालू झाल्या आहेत.

विविध विभागातील आरोग्य सेवा देत असताना लागणाऱ्या पॅथॉलॉजी लॅब, सोनोग्राफी,2D-इकोकार्डिओग्राफी सेवा सुरू झालेले असून एक्स-रे सिटीस्कॅन डायलिसिसच्या सेवाही त्वरित सुरू होत आहेत.

महिला हॉस्पिटलच्या नवीन इमारतीमध्ये सर्व प्रकारच्या सेवा उपलब्ध असून शास्त्रोक्त पद्धतीने बांधकाम आहे. उत्कृष्ट बांधकामासाठी महाराष्ट्रातील आर्किटेक इंजिनिअर आणि अल्ट्राटेक कंपनी मार्फत घेतलेल्या स्पर्धेत या इमारतीस नामांकनसुद्धा  प्राप्त झाले आहे.

या इमारतीचे वैशिष्ट्य म्हणजे स्वयंचलित अग्निशामक यंत्रणा, रुग्णाना ने-आण साठी रॅम्प,व लिफ्टची सोय आहे.काँफेरन्स हॉल, सीवेज वॉटर ट्रीटमेंट प्लांट, रेन वॉटर हार्वेस्टिंग, लाईटनिंग प्रोटेक्टर, 24 तास आर ओ वॉटर सप्लाय, 24 तास अखंड वीज पुरवठ्यासाठी 125 कवीचा जनरेटरचे अशा सोयींनी युक्त आहे. मोड्युलर ऑपरेशन थिअटर सह अन्य दोन अद्यावत असे शस्त्रक्रिया ग्रह कार्यान्वित आहेत.

तसेच वातानुकूलित स्पेशल रूम, सुपर डीलक्स रूम सुद्धा उपलब्ध आहेत. मंगळवेढ्या सारख्या ग्रामीण भागात प्रोस्टेट किडनीचे विकार, हर्निया, अपेंडिक्स ,आतड्यांचे आजार, मुतखडा ,मूत्राशयाचे आजार विविध प्रकारच्या हाडांचे आजार व फॅक्चर हृदय विकार, उच्च रक्तदाब मधुमेह, अस्थमा, विषबाधा, सर्पदंश, कावीळ

आणि लिव्हरचे इतर आजार, बालरोग तज्ञाकडून बालकांचे अतिदक्षता विभागातील उपचार, डेंटल ( दाताचे आजार )वगैरे अनेक प्रकारच्या सेवा देण्यासाठी तसेच काही डॉक्टरांनी एकत्र येऊन अशाप्रकारचे सर्व जनतेला तातडीची आरोग्यसेवा, किफायतशीर शुल्कामध्ये, सोनोग्राफी,एक्स-रे, व सीटी स्कॅन आदी यंत्राच्या साहाय्याने देण्याचा हा पहिलाच प्रयत्न आहे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

सध्या हॉस्पिटलमध्ये तालुक्यातील ग्रामीण भागात प्रथमच महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत वरील अनेक सेवा अगदी मोफत (नियम व अटीस अधीन राहून) सेवा देण्यात येत आहेत.

येत्या काळात अनेक तज्ञ डॉक्टरांना बोलवून हॉस्पिटलच्या सर्व विभागाच्या सेवा व सर्व स्त्री पुरुष ,लहान मुले व नवजात बालके यांच्या सुद्धा शस्त्रक्रिया मंगळवेढा ग्रामीण जनतेला उपलब्ध होणार असल्याने आता मंगळवेढाकराना मोठ्या शहरांकडे धाव घ्यावी लागणार नसल्याचे चित्र निर्माण होत आहे.

डॉ.पुष्पांजली शिंदे ह्या स्त्री रोग तज्ञ व प्रसुती तज्ञ असून 7 नोव्हेंबर 2005 पासून मंगळवेढा शहरात महिलांच्या आरोग्य सेवा पुरवण्यासाठी त्यांनी महिला हॉस्पिटल ची स्थापना की सुरू केली होती. ग्रामीणसह ,शहरातील अनेक महिलांना त्यांनी सेवा दिली आहे .प्रसूती बरोबर सोनोग्राफी केंद्रात व निवारण गर्भाशयाचे आजार व शस्त्रक्रिया सेवा त्यांनी दिलेल्या आहेत.

मंगळवेढा तालुक्यात अन्य भागातील अनेक रुग्ण मंगळवेढ्याला येऊ लागले आहेत सध्या महिला हॉस्पिटलची भव्य व अद्ययावत इमारत उभी राहिली असून महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या लाभार्थी मोठ्या प्रमाणात दिसून येत असल्याने हॉस्पिटलला मिनी सिव्हील हॉस्पिटलचे स्वरूप आलेले आहे.

महिला हॉस्पिटल मंगळवेढा या ठिकाणी शेकडो प्रसूती आणि सिझेरियन शस्त्रक्रिया अगदी नि:शुल्क होत असून मंगळवेढ्याचा तालुक्याच्या आजूबाजूच्या परिसरातील पंढरपूर, सांगोला, जत मोहोळ तालुक्यातील शेकडो मातांनी मोफत प्रसूती अथवा सिझरेयन च्या सेवा घेतल्या आहेत.

यासाठी प्रसूतीच्या वेळेस येताना केवळ आधार कार्ड, रेशन कार्ड व लसीकरण कार्ड सादर करावे लागते या योजनेअंतर्गत दाखल झाले पासून सर्व तपासण्या, औषधे मोफत दिली जातात व शेवटी घरी जाण्याचे पैसेसुद्धा दिले जातात . ग्रामीण भागातील जनतेला कोरोना (covid-19) महामारी च्या काळात मोठा आधार मिळत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

ग्रामीण भागातील जनतेला चांगल्या दर्जाची आरोग्यसेवा पुरविण्यासाठी स्वतःचे हॉस्पिटल सांभाळून अनेक डॉक्टरांनी एकत्र येऊन सर्व सुविधा या हॉस्पिटल मध्ये उपलब्ध करण्याचा हा मंगळवेढा तसा पहिला प्रयत्न असून विविध स्तरातून त्याचे कौतुक होत आहे.त्यामुळे तालुक्यातील ग्रामीण भागातील आरोग्य सेवेतील नंदादीपाचे स्थान निर्माण केले आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: डॉक्टरांची टीम कार्यरतमंगळवेढामहिला हॉस्पिटल

संबंधित बातम्या

‘चांगले दिवस येणार होते, पण तू सोडून गेलीस…’ रीलस्टार रोहिणी पारध्ये आत्महत्येप्रकरण; पतीची पहिली पोस्ट चर्चेत, नेमके कारण काय?

‘चांगले दिवस येणार होते, पण तू सोडून गेलीस…’ रीलस्टार रोहिणी पारध्ये आत्महत्येप्रकरण; पतीची पहिली पोस्ट चर्चेत, नेमके कारण काय?

May 31, 2026
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पांडुरंग परिवाराकडून गावोगावी बैठकांचे सत्र सुरू; विधानसभेसाठी मोर्चेबांधणी की…; कार्यकर्त्यांकडून असा आग्रह

ब्रेकिंग न्यूज! सोलापूर विधान परिषदेसाठी प्रशांत परिचारक फायनल? अधिकृत घोषणा बाकी; मात्र भाजपच्या ‘त्या’ नेत्याच्या एन्ट्रीने सस्पेन्स वाढला

May 30, 2026
राजनंदिनी महिला ग्रामीण बँकेचा आज मंगळवेढ्यात भव्य उद्घाटन सोहळा; निराधार महिलांना इतरांपेक्षा एक टक्का कमी व्याजदर

मंगळवेढ्यात सुवर्णसंधी! ‘राजनंदिनी महिला ग्रामीण पतसंस्थे’त विविध पदांसाठी थेट भरती; रविवारी मुलाखती

May 29, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

May 29, 2026
राजकीय खळबळ! मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट अन् मंगळवेढ्यात चर्चांना उधाण; बबनराव आवताडे कमळ हाती घेणार? काय घडलं ‘त्या’ भेटीत?

राजकीय खळबळ! मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट अन् मंगळवेढ्यात चर्चांना उधाण; बबनराव आवताडे कमळ हाती घेणार? काय घडलं ‘त्या’ भेटीत?

May 28, 2026
पोलिसांनी रोखला अल्पवयीन नवरदेवाचा विवाह; सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

पहिले लग्न आणि मुलगीही लपवली! नवरी नटून पोहोचली थेट जेलमध्ये; ३ मध्यस्थांवर गुन्हा दाखल; मंगळवेढ्यात लग्न फसवणुकीचा मोठा भांडाफोड

May 27, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

धक्कादायक! मंगळवेढ्यात हॉटेलच्या स्वयंपाकघरातच मालकिणीने उचलले टोकाचे पाऊल; घटनेने परिसरात खळबळ

May 27, 2026
माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या हस्ते देवेंद्र फडणवीसांचा सत्कार; मालकांनी ठरल्याप्रमाणे केलं… आता संधी मिळणार का? परिचारक समर्थकांचा सवाल

सोलापूर विधानपरिषद निवडणूक: उमेदवारीबाबत सस्पेन्स कायम; कार्यकर्त्यांची धाकधूक वाढली; मुंबईत लॉबिंग सुरू; परीचारकांचे नाव आघाडीवर पण…

May 26, 2026
मंगळवेढ्यात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची महत्त्वाची बैठक; पक्षबांधणीवर भर, तालुकाध्यक्ष व शहराध्यक्ष पदांच्या ‘या’ नावांची जोरदार चर्चा

मंगळवेढ्यात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची महत्त्वाची बैठक; पक्षबांधणीवर भर, तालुकाध्यक्ष व शहराध्यक्ष पदांच्या ‘या’ नावांची जोरदार चर्चा

May 26, 2026
Next Post
महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

तो पुन्हा येणार पुन्हा येणार! राज्यात काही 'या' जिल्ह्यांमध्ये ४८ तासांत पावसाची शक्यता

ताज्या बातम्या

बडा मासा! मंगळवेढा प्रांत कार्यालयातील तलाठी निघाला लाचखोर; लाचेची रक्कम घेऊन केला पोबारा; लाच कुणाच्या सांगण्यावरून?

मोठी बातमी! जन्म दाखल्याच्या ऑर्डरसाठी २ हजारांची लाच घेताना महसूल सहाय्यकाला रंगेहाथ पकडले

June 1, 2026
विद्यापीठाची पोलिसात धाव, अंतिम परीक्षेवर सायबर अटॅक

कामाची बातमी! व्हॉट्सअपवर लग्नाची पत्रिका अन् धोका, तुमचं बँक अकाऊंट होऊ शकतं रिकामं; सायबर पोलिसांकडून महत्त्वाचं आवाहन

June 1, 2026
महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

शेतकऱ्यांनो! सरकारने दिली बळीराजांची चिंता वाढविणारी अपटेड; मान्सून लांबणार, पेरणीची घाई करू नका…

June 1, 2026
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पांडुरंग परिवाराकडून गावोगावी बैठकांचे सत्र सुरू; विधानसभेसाठी मोर्चेबांधणी की…; कार्यकर्त्यांकडून असा आग्रह

सोलापूर विधानपरिषदेत भाजपचा मोठा डाव; प्रशांत परिचारकांना डावलून राजेंद्र राऊतांना उमेदवारी, परिचारक गट नाराज?

June 1, 2026
‘चांगले दिवस येणार होते, पण तू सोडून गेलीस…’ रीलस्टार रोहिणी पारध्ये आत्महत्येप्रकरण; पतीची पहिली पोस्ट चर्चेत, नेमके कारण काय?

‘चांगले दिवस येणार होते, पण तू सोडून गेलीस…’ रीलस्टार रोहिणी पारध्ये आत्महत्येप्रकरण; पतीची पहिली पोस्ट चर्चेत, नेमके कारण काय?

May 31, 2026

तरुणांनो सावधान! बॉडी फुगवण्यासाठी वापरले जाणारे घातक इंजेक्शन विकणारे रॅकेट जेरबंद; २ लाखांचा मुद्देमाल जप्त; सोलापूर जिल्ह्यात अवैध नशिल्या इंजेक्शनचा काळा बाजार उघड

June 1, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा