mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मतदारसंघाचा सर्वांगीण विकास हेच माझे ध्येय  – समाधान आवताडे

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
मतदारसंघाचा सर्वांगीण विकास हेच माझे ध्येय  – समाधान आवताडे

मंगळवेढा – पंढरपूर विधानसभा गावभेट दौरा; 

गावातील समस्यांचा घेतला आढावा 




मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-



मंगळवेढा – पंढरपूर तालुक्यात उद्योग, शिक्षण, आरोग्य, पर्यटन अशा एकही क्षेत्रात ठोस विकास झाला नाही. करोडो रुपयांची तरतूद करण्यात आली. पण अद्याप विकासापासून दोन्ही तालुके वंचित आहे. त्यामुळे येत्या काळात लोकप्रतिनिधी राजकारण करणारा नको असून दूर दृष्टी ठेवून सर्वांगीण विकास करणारे नेतृत्व हवे आहे. कुटनिती पेक्षा बेरोजगारी, रस्ते, उद्योग, शिक्षण, आरोग्य, पर्यटन अशा विविध क्षेत्रातील अडचणी सोडवून मतदार संघाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मी कटिबध्द आहे. आजपर्यंत न सोडविलेले प्रश्न सोडवून सर्वांगीण विकास करण्याचे माझे ध्येय आहे. त्यासाठी मतदारांनी मला संधी देण्याचा निश्चय करावा असे मत दामाजी साखर कारखान्याचे चेअरमन समाधान आवताडे यांनी व्यक्त केले. 




        

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समाधान आवताडे यांनी फटेवाडी, खोमनाळ, हिवरगाव, हाजापूर, जालिहाळ, भाळवणी, तळसंगी या गावांना भेटी दिल्या. यावेळी आवताडे यांनी गावातील महिला, युवक व शेतकऱ्यांशी संवाद साधला. विकासाचा सक्षम पर्याय म्हणून तालुक्याचे प्रश्न पोट तिडकिने सोडविण्यासाठी सक्षम नेतृत्व म्हणून समाधान आवताडे यांना विधानसभेत पाठविणार अश्या भावना गावकऱ्यांनी व्यक्त केल्या.  



 नकारात्मक राजकारणामुळे मंगळवेढा व पंढरपूर तालुक्यातील जनता आजही अनेक समस्यांशी झगडत आहे. गावांमधील मुख्य रस्ते, पिण्याचे पाणी, आरोग्याच्या समस्या, शैक्षणिक आणि रोजगाराच्या संधी, उद्योग, शेतीसाठी पाणी यामधील एकही प्रश्न अद्याप सुटला नाही. गेल्या वर्षी उजनी धरण शंभर टक्के भरले होते. पण त्यातील एकही थेंब मिळाला नाही.शेतकऱ्यांना पाणी मिळण्यासाठी लोकप्रतिनिधींनी कोणताही पाठपुरावा केला नाही. सध्या जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. मात्र जबाबदार नेते याकडे गंभीरतेने विचार करत नाही त. सक्षम नेतृत्व नसल्याने प्रश्न प्रलंबित आहेत. मला केवळ एकदा संधी द्यावी. कामे कशी करायची, प्रश्न कसे सोडवावे याचा ब्लू प्रिंट तयार आहे. सर्वांगीण विकासासाठी अधिकाधिक निधी आणून विकास करण्याचे माझे ध्येय असल्याने मतदारांनी माझ्या पाठीशी खंबीपणे उभे राहावे, असे मत समाधान आवताडे यांनी व्यक्त केले. 



  यावेळी पुढे बोलताना आवताडे म्हणाले कि, 



तालुक्याचे वैशिष्टय ओळखून त्यावर काम करणे गरजेचे आहे. स्थानिक प्रश्न, गरज ओळखून कामे केल्यास विकास घडत असतो. त्यामुळे प्रत्येकाने विचार करावा. सत्तेची भाकरी पलटण्याची गरज आहे. ती न पलटल्यास करपेल. त्यामुळे ही शेवटची संधी असून मला साथ द्यावी. शेतकऱ्यांना पाणी, गावच्या पाण्याचा प्रश्न, बेरोजगारी सोडविण्यासाठी मी नक्की सोडवेन अशी ग्वाही दिली. उपस्थित गावकऱ्यांनी आपली मते व्यक्त करत विकासाचे आशास्थान केवळ समाधान आवताडे असल्याचे सांगत यंदा एकदिलाने सर्व शक्ती पणाला लावून आमदार करणार असल्याचे सांगितले. 



  तालुक्यात निर्माण झालेली राजकीय पोकळी भरून काढण्यासाठी आपल्यासमोर समाधान आवताडे हे एकमेव पर्याय आहेत. त्यांच्या माध्यमातून तालुक्यातील प्रश्न सोडविण्यासाठी अधिक प्रभावीपणे प्रयत्न करता येईल. त्यामुळे निःपक्षपाती कामे करावयाची असल्यास आवताडे यांना एकदिलाने सहकार्य करण्याचे मनोगत शिवसेना नेते येताळा भगत यांनी व्यक्त केले. तर तालुक्याचे सक्षम युवा नेतृत्व म्हणून समाधान आवताडे यांना सर्वजण पाठिंबा देणार असे मनोगत संचालक सचिन शिवशरण यांनी व्यक्त केले.  



 या संवाद दौऱ्यात शिवसेना नेते येताळा भगत, पंचायत समिती सभापती प्रदीप खांडेकर, दामाजी साखर कारखान्याचे संचालक सचिन शिवशरण,बसवेश्वर पाटील, विजय माने,भारत निकम, पप्पू काकेकर, सरपंच राजेंद्र फटे, विष्णुपंत फटे,बलभीम माने, शामराव फटे, सुनील फटे, दादासो मेटकरी, आनंद खावेकर, विशाल घुले, सोमनाथ टोमके, संभाजी चव्हाण, सर्जेराव गणपाटील, दगडू फटे, मनोहर फटे, दिगंबर शिंदे राजेंद्र फटे, राजेंद्र फटे, चंद्रकांत लेंडवे, मंगेश फटे, सुरेश चव्हाण, नवनाथ चव्हाण, सागर कौडुभैरी, संजय कटे,पोपट फटे, सरपंच रविकांत खांडेकर, रामचंद्र होनराव, बंडू वाघमोडे, अशोक बुरंगे, रघुनाथ खरवडे, राजू लोकरे, समाधान नागणे, अनिल शेंडगे, अरुण पाटील, महादेव खांडेकर, सहदेव, खांडेकर, तानाजी ढोमे, रामचंद्र खांडेकर, तानाजी कुपाडे, गणेश देशमुख, ज्ञानदेव मोठे, अविनाश लावते, नामदेव लोकरे, युवराज खरबडे, युवराज खांडेकर, संग्राम गायकवाड, सरपंच उत्तम लंगडे, श्रीकांत पुकळे, रंगनाथ कालुबर्मे, प्रमोद इंगळे, बाबासो बिले, दिलीप हजारे, बाबासो इंगळे, विठ्ठल इंगळे, रवीकुमार शिंदे, अजित पवार, डॉक्टर कदम, औदुंबर मोरे, दादासो इंगळे, शिरीष सरवदे, शिवाजी लंगडे, सिद्धेश्वर जाधव, रामचंद्र जाधव, लिंबाजी खांडेकर, रामचंद्र इंगळे, सचिन शिंदे, मोहन नागाने, रोहित इंगळे, नीलकंठ देशमुख, आण्णासो वाकडे, पोपट आवताडे, दयानंद काळे, शिवाजी फटे, श्रीकांत गावंड, राजेंद्र देवकुळे, तानाजी देवकाते, कुंडलिक बिचुकले, अरुण वाघमोडे, शिवाजी याजगार, मारुती बिचुकले, विश्वंभर कारचे, खंडू बहिस्ते, शिंदे भाऊसाहेब, शाम आकुळे, माजी सरपंच महादेव खांडेकर, सचिन चौगुले, रायगोंडा पाटील, दामू मोटे, शिवाजी लोखंडे, रामभाऊ शेंबडे, अशोक चौंडे, लक्ष्मण बरफडे, लक्षण सोनलकर, बाबसो इंगळे, दत्ता साबणे, चौगुले सर, बलभीम शिंदे, अंशुमन शिंदे, अशोक नागणे, धनाजी पाटील, सुभाष साखरे, महादेव साखरे, चारुदत्त पाटील, चंद्रकांत मोरे, रामहरी जाधव, हुकुम मुलाणी, अण्णा शिंदे, नामदेव चव्हाण, शिवाजी शेणवे, रामभाऊ सरवदे, चंद्रकांत पाटील, दादासो दोडके, रमेश मुंगसे, दत्ता गायवाले, रकमाजी दुधाळ, विजय कावनाळे, बंडू शेणवे यांच्यासह गावातील सरपंच, उपसरपंच, सहकारी संस्थांचे पदाधिकारी, सदस्य व मोठ्या प्रमाणत ग्रामस्थ, कार्यकर्ते  उपस्थित होते. सूत्रसंचालन दिगंबर यादव यांनी केले. 



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
मंगळवेढ्यात जनहितचे आज थाळीनाद आंदोलन    

मंगळवेढ्यात जनहितचे आज थाळीनाद आंदोलन    

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मोठी बातमी! केंद्र सरकारचा ऊस उप्तादक शेतकऱ्यांना दिलासा, महिला सुरक्षेवर भर, मोदी कॅबिनेटमधील पाच मोठे निर्णय

मोदीजी! सामान्यांनी जगायचं कसं? ​‘अच्छे दिन’ कुठे गेले? महागाईने गाठला उच्चांक; काँग्रेसची महागाई हटवण्यासाठी भाजपला आणले, पण आता जनतेवरच ‘महागाईचा सर्जिकल स्ट्राईक’

June 8, 2026
राज्यात साडे सहा लाख शेतकऱ्यांच्या थेट बांधावर पोहोचवले खते आणि बियाणे : कृषिमंत्री दादाजी भुसे

शेतकऱ्यांनो, पेरणीची घाई नको! मुख्यमंत्र्यांचे आवाहन, ‘या’ तारखेनंतर महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार

June 8, 2026
मंगळवेढ्याची लेक चीनमध्ये फडकवणार तिरंगा! पण… गरिबी आड येतेय; ‘प्रज्ञा’च्या स्वप्नांना पंख देण्यासाठी पुढे या; दानशूर व्यक्तींना मदतीचे नम्र आवाहन

मंगळवेढ्याची लेक चीनमध्ये फडकवणार तिरंगा! पण… गरिबी आड येतेय; ‘प्रज्ञा’च्या स्वप्नांना पंख देण्यासाठी पुढे या; दानशूर व्यक्तींना मदतीचे नम्र आवाहन

June 8, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

जनगणनेच्या कर्तव्यावर निघालेल्या ‘आदर्श शिक्षका’चा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू; कुटुंबाचा एकमेव आधारस्तंभ हरपला

June 7, 2026
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पांडुरंग परिवाराकडून गावोगावी बैठकांचे सत्र सुरू; विधानसभेसाठी मोर्चेबांधणी की…; कार्यकर्त्यांकडून असा आग्रह

दोन पावले मागे, की मोठ्या झेपची तयारी? समर्थक निराश, जाणकार खूश; प्रशांत परिचारकांच्या शांत भूमिकेमागे दडलंय काय?

June 7, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

शाळेची भीती संपणार! सोलापूर जिल्ह्यात ‘या’ शाळेतच अंगणवाडी भरणार; बालवयात शाळेची गोडी लागणार; ग्रामीण शिक्षणाला मिळणार नवी दिशा

June 6, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा