mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

महायुतीच्या उमेदवाराला अडचण होऊ नये म्हणून बंडखोरी केली नाही : शैला गोडसे

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
महायुतीच्या उमेदवाराला अडचण होऊ नये म्हणून बंडखोरी केली नाही : शैला गोडसे



सुधाकरपंत परिचारकांना गोडसेंचा पाठिंबा



मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-

शिवसेना पक्षाकडून अधिकृत उमेदवारी मिळाली नाही म्हणून जनतेच्या आणि काही शिवसैनिकांच्या आग्रहाखातर अपक्ष म्हणून भरलेला उमेदवारी अर्ज मागे घेतला. हा अर्ज मागे घेताना पक्षविरोधी बंडखोरी करायची नाही आणि महायुतीने  दिलेला उमेदवार निवडून आणायचा ही भूमिका मनात ठरवली होती. दोन वर्षे पक्षाचे निष्ठेने काम करूनही अधिकृत उमेदवारी मिळाली नाही म्हणून सुरुवातीला मला वाईट वाटले म्हणून काही दिवस घराच्या बाहेर हि गेले नाही अशावेळी  ज्यांना महायुतीतून उमेदवारी मिळाली आहे, त्यांनी किंवा त्यांच्या परिवारातील प्रतिनिधीने किमान विचारपूस करावी असे दुःख झालेल्या उमेदवारास वाटणे स्वाभाविक आहे व मलाही तसेच वाटत होते परंतु आजतागायत त्यांच्याकडून साधी विचारपूस सुद्धा झालेली नाही. तसेच स्वतःच्या पक्षातील जिल्हाप्रमुख किंवा तालुकाप्रमुख यांनी सुद्धा संपर्क साधायचे कष्ट घेतले नाही. 

उमेदवारी अर्ज माघार घेतल्यानंतर महायुतीच्या  उमेदवारांच्या प्रचारार्थ मा. मुख्यमंत्री महोदय यांची मंगळवेढा येथे झालेल्या सभेला तरी किमान मला बोलतील असे वाटले होते परंतु तसे काही झाले नाही त्यानंतर महायुतीच्या उमेदवाराचे गावभेट दौरे सुरू झाले या गावभेट दौऱ्याच्या वेळी प्रचारामध्ये आपण सहभागी होऊन महायुतीच्या  उमेदवारासाठी मत मागण्याची माझी प्रबळ इच्छा होती. परंतु उमेदवार किंवा त्याच्या प्रतिनिधीकडून साधी विचारणा सुद्धा होत नसेल तर आपण स्वतःहून कसे जायचे? प्रचारामध्ये माझ्या सहभागाने त्यांना अडचण वाटत असेल तर इच्छाशक्ती असूनही आपण स्वतःहून त्याच्यामध्ये मिसळणे योग्य होणार नाही, असे माझे वैयक्तिक मत होऊ लागले आणि मी त्यांच्या निरोपाची वाट पाहत राहिली

मा. मुख्यमंत्री महोदय यांची सभा झाल्यानंतर गावागावातील शिवसैनिकांचे आणि कामाच्या निमित्ताने जोडलेल्या कार्यकर्त्यांचे फोन येऊ लागले की, शैलाताई तुमची भूमिका काय आहे? आणि आम्ही काय करावे ते सांगा. एका बाजूला महायुतीच्या  उमेदवाराचा प्रचार करायची माझी स्वतःची प्रबळ इच्छा असताना महायुतील  नेते मंडळी कडून साधी विचारपूस सुद्धा होत नव्हती तर दुसऱ्या बाजूला जनतेकडून आणि शिवसैनिकांकडून सातत्याने विचारणा होऊ लागल्याने नाईलाजास्तव काही दिवस मला माझा मोबाईल फोन बंद ठेवावा लागला. 

उमेदवारी न  मिळाल्याच्या दुःखातून स्वतःला सावरण्यासाठी आणि ज्या कार्यकर्त्यांनी आपणास मदत केली होती, त्यांना भेटण्यासाठी मी पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघातील प्रत्येक गावातील त्या गावच्या ग्रामदेवतेचे दर्शन घेऊन सलग पाच दिवस शिवसैनिका बरोबर संवाद साधण्याचा प्रयत्न केला .माझा मोबाईल फोन जरी बंद असला तरी मी मतदारसंघांमध्ये नियोजित कार्यक्रमाप्रमाणे दौरा करीत होते यादरम्यान सुद्धा महायुतीचे नेते मंडळीकडून प्रचार कार्यात सहभागी होण्यासाठी विचारपूस झाली नाही त्यानंतर मात्र मला खात्री पटली की प्रचार कार्यामध्ये माझ्या सहभागाची महायुतीला  आवश्यकता राहिली नाही 

“महायुतीच्या उमेदवार निवडून यावा म्हणून पक्षप्रमुखांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत मी बंडखोरी केली नाही. मला उमेदवारी मिळाली नाही म्हणून मी नाराज नाही किंवा माझ्यावर अन्याय झाला आहे असेही नाही तसेच माझ्यावर कोणी अन्याय केला आहे असेही शिवसैनिक व जनतेने समज करून घेऊ नये कारण राजकारणात अशा घडामोडी घडत असतात हे समजून घेणे महत्वाचे आहे त्यामुळे शिवसैनिकांनी आणि जनतेने नाराज न होता महायुतीच्या उमेदवारा मागे आपली ताकद उभी करावी आणि प्रचंड बहुमताने विजयी करावे असे नम्र आवाहन मी शैला गोडसे शिवसेना महिला आघाडी जिल्हा प्रमुख या नात्याने करीत आहे.”

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
माझी उमेदवारी ही जनतेची उमेदवारी आहे : समाधान आवताडे

माझी उमेदवारी ही जनतेची उमेदवारी आहे : समाधान आवताडे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

धक्कादायक! सासरच्या छळास कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पती व सासूविरुद्ध फिर्याद दाखल

मंगळवेढ्यासाठी दुःखद बातमी! कोकणात ज्ञानदान करणाऱ्या शिक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या

July 28, 2026
मंगळवेढा तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी पोलिस भरतीसाठी मोफत ऑनलाईन टेस्ट सिरीजचे आयोजन

प्रशासनाचा मोठा निर्णय! सोलापूर ग्रामीण पोलीस दलाचे विभाजन; जाणून घ्या तुमच्या भागातील नवीन उपविभाग; नागरिक व भाविकांना कसा होणार फायदा?

July 28, 2026
जयश्री महिला अर्बन को-ऑप क्रेडीट सोसायटीचा आज मंगळवेढ्यात लोकपर्ण सोहळा; सर्व बँकिंग सुविधा आता एकाच छताखाली

वाटचाल सोनपावलांची! जयश्री महिला अर्बन बँकेचा आज पहिला वर्धापनदिन; बँकेची सोने तारण व ६ वर्षात दाम दुप्पट योजना झाली लोकप्रिय

July 28, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

आत्याच्या मुलाशी लग्न, पदरात 2 मुली, सुखाचा संसार सुरू असतानाच महिलेनं मुलीसह संपवलं जीवन, सोलापूर जिल्ह्यात हळहळ

July 28, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

मोठी बातमी! ग्रामपंचायतींच्या निवडणुका लांबणार; ‘या’ तारखेची मतदार यादी स्थगित? पाहा नवीन वेळापत्रक

July 27, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

पाणी वाहून जातंय अन् पिके करपताहेत! भीमा काठच्या शेतकऱ्यांसाठी ८ तास विजेची आमदार समाधान आवताडे यांची मुख्यमंत्र्यांकडे आग्रही मागणी

July 27, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा