टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा शहर व तालुक्यात कोरोना वेगाने वाढू लागला असतानाच भारतीय स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मंगळवेढा शाखेतील कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह निघाल्यामुळे बँकेने आर्थिक व्यवहार अनिश्चित काळासाठी बंद केले आहेत.त्यामुळे बँकेत पैसे काढण्यासाठी आलेल्या खातेदारांना मात्र रिकाम्या हाती परतावे लागले. Corona Positive at State Bank of India’s Mangalwedha Branch
कोरोना काळात फिजिकल डिस्टन्स , मास्क याशिवाय विविध नियमाचे पालन करणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मंगळवेढा येथील शाखेत कोरोनाने प्रवेश केला. शाखेतील एक कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह निघाल्यामुळे बँकेने आर्थिक व्यवहार अनिश्चित काळासाठी बंद केले आहेत.
कोरोना रुग्णांची संख्या शहर व तालुक्यात हजाराच्या पुढे गेली आहे. बँकेतील एक कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने ग्राहकांच्या सुरक्षेसाठी नगरपालिका प्रशासनाने पुढील आदेश येईपर्यंत बँकेचे कामकाज बंद ठेवण्याचे लेखी पत्र दिले आहे.
यामुळे बँक व्यवस्थापनाने नगरपालिका प्रशासनाच्या आदेशानुसार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. शहरातील भारतीय स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये सर्वात जास्त आर्थिक व्यवहार होत आहेत. शाखेमध्ये सॅलिटायझरची व्यवस्था करण्यात आली आहे.
कर्मचाऱ्यांना सुरक्षा कवच देखील दिले आहे. अशा परिस्थितीतही खातेदारांकडून सोशल डिस्टन्स पालन न करणे, अनावश्यक कामासाठी बॅंकेत येणे, मास्क व्यवस्थित न लावणे यामुळे खातेदाराकडून संसर्गाचा प्रसार झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, बॅंक व्यवस्थापनाने अनिश्चित काळासाठी आर्थिक व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे बँक ऑफ इंडियानंतर सर्वात मोठी असलेल्या भारतीय स्टेट बँक ऑफ इंडियाला याचा फटका बसल्याने खातेदारांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागणार आहे.
बँकेतील कर्मचारी रॅपिडमध्ये निगेटिव्ह
भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया मंगळवेढा शाखेतील एक कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने बाकीच्या सर्व कर्मचाऱ्यांची रॅपिड टेस्ट करून घेतली असून सर्व टेस्ट निगेटिव्ह आल्या आहेत.
पण आम्ही सर्व कर्मचाऱ्यांची स्वब टेस्ट करणार असून त्याचे रिपोर्ट आल्यानंतर बँक सुरू करण्याबाबत प्रशासनाला कळवणार आहोत.- धनंजय देशपांडे, बँक मॅनेजर
Corona Positive at State Bank of India’s Mangalwedha Branch

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज