टीम मंगळवेढा टाईम्स । कोरोनामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत अस्थिरता निर्माण झाली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठ्या प्रमाणावर घडामोडी घडत आहेत. त्याचा परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर होत आहे.
बडे गुंतवणूकदार कोणत्याही प्रकारची जोखीम नको म्हणून मोठ्या प्रमाणावर सोने आणि चांदी खरेदी करत आहेत. त्यामुळे आपल्याकडे सोने आणि चांदीचे दर अस्थिर आहेत.
गेल्या काही दिवसांपासून सुवर्ण बाजारात असलेल्या अस्थिरतेचा परिणाम अजूनही कायम असून, मंगळवारी (दि.२२) एकाच दिवसात चांदीच्या दरात सहा हजार रुपये तर सोन्याच्या दरात ६०० रुपयांनी घसरण झाली. त्यामुळे चांदी ६८ हजार रुपयांवरून थेट ६२ हजार रुपये प्रतिकिलोवर, तर सोने ५१ हजार ९०० रुपयांवरून ५१ हजार ३०० रुपये प्रति तोळ्यावर आले.
सोन्या-चांदीच्या दरात सतत चढ-उतार होत आहेत. चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. मंगळवारी सराफा बाजारात चांदीच्या किंमती 5700 रुपयांपर्यंत घसरले आहेत.
अमेरिकी डॉलरमध्ये आलेल्या मजबुतीमुळे ग्लोबल बाजारात सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाल्याचं बोललं जात आहे. दिल्लीत सराफा बाजारात एक किलो चांदीच्या किंमतीत 5781 रुपयांची मोठी घसरण झाली आहे. तर सोन्याच्या दरात 672 रुपये प्रति 10 ग्रॅम घसरण झाली आहे.
HDFC सिक्यरिटीजनुसार, दिल्लीत 99.9 टक्के शुद्ध असणाऱ्या सोन्याच्या दरात 672 रुयांची घसरण होऊन 51,328 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका आहे.
परदेशी बाजारात सोन्याच्या दरात 3 टक्क्यांहून अधिक घसरण झाली असून एका महिन्याच्या निचांकी पातळीवर पोहचले आहेत.
चांदीच्या दरातही मोठी घसरण झाली आहे. मंगळवारी एक किलो चांदीचा दर 5781 रुपयांनी घसरुन 61,606 रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहचला आहे. सोमवारी चांदीचा भाव 67,387 रुपये प्रति किलोग्रॅम इतका होता.
कोरोना काळात शेअर बाजारात अनिश्चिततेचं वातावरण आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांचा सोन्याच्या गुंतवणूकीकडे मोठा कल आहे.
A big drop in the price of silver; See what is the price of gold and silver
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज