मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
आपसातील जुन्या वादातून व वर्चस्वातून मित्राचाच मित्रांनी पोटात हत्यार भोसकून खून केला. त्यानंतर दुचाकीवरुन मृतदेह नेत एका ढाप्यात टाकला. तिथे दुचाकीच्या टाकीतून पेट्रोल काढून त्याच्यावर ओतून पेटवून दिले व पळ काढला.
गाजलेल्या चित्रा डकरे खूनातील संशयित अमोल घुगेचा अशा पद्धतीने मारेकऱ्यांनी काटा काढला. यातील मुख्य संशयितासह दोघांना औरंगाबादेतील सिडको पोलिसांनी बेड्या ठोकल्या. ही कारवाई बुधवारी (ता. 15) करण्यात आली.
पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, सौरभ नाना वानखेडे (वय 22, रा. त्रिवेणीनपगर, सिडको एन-सात) व रितेश उर्फ विक्की भगवान पूसे (वय 22 रा. अयोध्यानगर सिडको एन-सात) अशी संशयितांची नावे आहेत.
सौरव व रितेशने 31 डिसेंबर 2019 ला अर्थात थर्टीफस्टच्या रात्री घरातून अमोल घुगे याला बोलाविले. त्याला शिवनेरी कॉलनीत नेले. तेथे सौरभ व रितेशचे सहकारी गौरव नाना वानखेडे व शुभम विसपूते यांना हाताशी घेत संशयितांनी अमोलला जून्या वादातून मारहाण केली. यानंतर त्याच्या पोटात वार करुन खून करण्यात आला.
यानंतर त्याला सौरभच्या दुचाकीवरुन अमोलचा मृतदेह अयोध्यानगर भागातील गार्डनच्या भिंतीलगतच्या नाल्याजवळील ढाप्यात टाकण्यात आला. यानंतर दुचाकीच्या टाकीमधून पेट्रोल काढून मृतदेह पेटवून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न संशयितांनी करून तेथून पळ काढला होता. या प्रकरणात गौरव व शुभम यांना पोलिसांनी अटक केली होती. ते सध्या हर्सूल कारागृहात आहेत.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज