mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मंगळवेढ्यात भाजपच्या अध्यक्षनिवडीत ग्रामीण भाग दुर्लक्षित

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
मंगळवेढ्यात भाजपच्या अध्यक्षनिवडीत ग्रामीण भाग दुर्लक्षित

मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-



पाच वर्षाच्या सत्ता उपभोगानंतर घडलेल्या सत्ता नाट्यातील पराभवाने सर्वात जास्त आमदार निवडून आणलेल्या भाजपला विरोधी बाकावर बसण्याची वेळ आली असताना देवेंद्र फडणवीस यांचे ‘मी पुन्हा येईन’ हे वाक्य वारंवार भाजपला आपण सत्तेत जाणार हे स्वप्न दाखवत आहे अशा परिस्थितीत सोलापूर जिल्ह्यातील काही तालुक्यातील भाजप पदाधिकाऱ्यांची खांदेपालट केली आहे  या खांदेपालटामध्ये मंगळवेढा तालुक्यासाठी निवडलेला भाजपाध्यक्ष हा  शहरातीलच निवडल्यामुळे ग्रामीण भागातील अनेक कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त करत भाजपच्या सोशल मीडिया ग्रुपमधून बाहेर पडणे पसंत केले  त्यामुळे अनेकांना ही निवड पचनी पडले नसल्याचे  दिसत आहे .

नुकतेच भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा नेतृत्वाने पदाधिकारी निवडीत शहराध्यक्ष व तालुकाध्यक्ष निवडीत दोन्ही पदाधिकारी शहरातीलच निवडल्याने  ग्रामीण भागातील प्रश्न आणि इच्छुक पदाधिकाऱ्यांच्या आशेवर विरजण पडले आहे.

       

 मागील पाच वर्षांच्या काळात केंद्रातील सत्तेबरोबर राज्यात सत्ता असलेल्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना मंगळवेढा तालुक्यात भाजप पक्ष वाढविणे म्हणावे तसे जमले नाही तालुक्यातील अनेक रखडलेल्या प्रश्नाचसंदर्भात आ. प्रशांत परिचारक,पालकमंत्री विजयकुमार देशमुख,सहकारमंत्री सुभाष देशमुख व खा.शरद बनसोडे यांच्या माध्यमातून तालुक्यातील पदाधिकाऱ्यांना तालुक्याचे नंदनवन करता आले असते पण अनेक प्रश्न प्रलंबित आहेत यामध्ये बहुचर्चित 35 गावांचा पाणी प्रश्न,महात्मा बसवेश्वर स्मारक,चोखोबाचे स्मारक,बंद पडलेल्या पाणीपुरवठा योजना, दुष्काळ निधी वाटपात झालेला दुजाभाव,दुष्काळी यादीतून तालुका वगळणे यासह अनेक प्रश्नाचा सामना तालुक्यातील जनतेला करावा लागल्यामुळे ग्रामीण जनतेमध्ये नाराजी पसरली होती त्याचा फटका नुकत्याच झालेल्या विधानसभा व लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला मताच्या रुपात बसला आहे.

         

याउलट भारतीय जनता पार्टीच्या सरकारने राबविलेल्या योजना,अनेक खात्याचा सुरू केलेला ऑनलाइन कारभार, तालुक्यामध्ये सुरु असलेली महामार्गाची कामे,राबविलेली कर्जमाफी योजना,थेट जनतेतून निवडी,विविध योजनांचा थेट बँक खात्यावर लाभ ,उज्वला व आयुष्यमान भारत योजना,प्रधानमंत्री जीवन ज्योती व जीवनसुरक्षा आशा महत्वकांक्षी योजना जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी तालुकास्तरावर काम करणारा पदाधिकारी ग्रामीण भागातील जनतेच्या संपर्कात असणारा हवा असतो मात्र मंगळवेढा तालुक्यातील पदाधिकाऱ्यांचा आणि ग्रामीण भागातील जनतेचा कधी जास्त संपर्कच आलेला कुणी पहिला नाही त्यामुळे पक्षाने केलेली कामे लोकांमध्ये मांडण्यात भाजपाचे पदाधिकारी कमी पडले,ऐन विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या काही प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पक्षाची साथ सोडली मुखमंत्र्यांनी विधानसभेला प्रचारसभा घेऊनही पक्षाची बांधणी व्यवस्थित न झाल्याने त्यांच्या उमेदवाराला पराभव स्वीकारावा लागला त्यानंतर पक्षाने धडा घेत भविष्यात मतदार खेचण्यासाठी शहरी आणि ग्रामीण जनतेचा समन्वय साधणारा,स्थानिक प्रश्नांची जाण असलेला पदाधिकारी निवडणे गरजेचे होते त्या दृष्टीने ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांनी जिल्हा नेतृत्वाकडे तश्या ईच्छाही व्यक्त केल्या होत्या पण नुकत्याच झालेल्या अध्यक्ष निवडीत तालुका अध्यक्ष पद शहरातच देऊन  ग्रामीण भागातील इच्छुकांच्या आशेवर पाणी पडल्याचे पहावयास मिळाले

       

 सध्या भाजप विरोधी बाकावर आहे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आवाज उठविणारे,सामान्यांच्या प्रश्नांना न्याय देणारे, प्रसंगी शेतकर्‍यांच्या बरोबर रस्त्यावर उतरून आंदोलन करणारा चेहरा भाजप तालूकाअध्यक्ष म्हणून हवा होता परंतु जिल्हा नेत्यांनी ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष केल्याने आगामी काळातही भाजपच्या मतदार वाढीत सुधारणा होईल असे वाटत नसून  विविध प्रश्नासाठी रस्त्यावर उतरणारी स्वाभिमानी शेतकरी संघटनाच तालुक्यात विरोधी पक्षाची भूमिका बजावणार असे सध्या तरी चित्र दिसत आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
मंगळवेढा शहरातील उजनी कॉलनीतून दोघेजण बेपता;शहरात खळबळ

मंगळवेढा शहरातील उजनी कॉलनीतून दोघेजण बेपता;शहरात खळबळ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मंगळवेढ्यातील दोन महिलांनी अनेकांना घातला लाखोंचा गंडा; मोठे रॅकेट उघडकीस येणार

​पोलिसांचा आशीर्वाद की यंत्रणेचा सुस्तपणा? गुन्हा दाखल असलेले ‘ते’ १० विद्यार्थी अजूनही मोकाटच; मनसेचा पोलीस महानिरीक्षकांना सवाल

March 18, 2026
सोलापुरात चोरट्यांची नवी शक्कल!  खिडकीतून बांबूच्या साह्याने केली चोरी

मंगळवेढा हादरलं! चाकूचा धाक दाखवून भरवस्तीत घरफोडी; सव्वा लाखांचा मुद्देमाल लंपास; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

March 18, 2026
दक्षिण भागात म्हैसाळचे पाणी “टेल टू हेड” मिळणेसाठी आ.आवताडे यांची विधानसभेत मागणी; देवेंद्र फडणवीस यांचे सकारात्मक उत्तर

नदी वाचवा, निधी द्या! भीमेच्या शुद्धीकरणासाठी १०० कोटी द्या; आमदार आवताडेंची सरकारकडे आग्रही मागणी; विधानसभेत घुमवला आवाज

March 17, 2026
बडा मासा! मंगळवेढा प्रांत कार्यालयातील तलाठी निघाला लाचखोर; लाचेची रक्कम घेऊन केला पोबारा; लाच कुणाच्या सांगण्यावरून?

मोठी बातमी! ​गरीबांच्या हक्काच्या पैशावर डल्ला; लाचखोर ग्रामपंचायत कर्मचारी अटकेत

March 17, 2026
कामाची बातमी! मंगळवेढ्यातील गजानन लोकसेवा हॉस्पिटलमध्ये महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया उपचार सुरू

मंगळवेढ्यातील गजानन लोकसेवा हॉस्पिटलच्या वर्धापन दिनानिमित्त भव्य आरोग्य शिबीर: मोफत तपासणी आणि उपचारांची सुवर्णसंधी

March 17, 2026
सांगोल्यात जुगार खेळणाऱ्या सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

संतांच्या भूमीत जुगाराचा विळखा; तरुणाई कर्जबाजारी, प्रशासन मात्र सुस्त; जुगार क्लबमुळे तरुणांचे भविष्य पणाला, यंत्रणेचे मात्र दुर्लक्ष?

March 17, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा