मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
जिल्ह्यातील प्रलंबित प्रकल्प मार्गी लावण्याबरोबरच भूसंपादन, पायाभूत सुविधा, विकास आणि समाजकल्याण विभागाच्या योजना राबविण्यावर भर राहील, असे नूतन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज येथे सांगितले.
जाहिरातीसाठी संपर्क:7588214814
शंभरकर यांनी आज सायंकाळी डॉ.राजेंद्र भोसले यांच्याकडून जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारला त्यानंतर त्यांनी अधिका-यांची बैठक घेतली. बैठकीनंतर त्यांनी ही माहिती दिली. तत्पूर्वी डॉ. भोसले यांनी श्री. शंभरकर यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. शंभरकर यांनी सांगितले, ‘आर्थिक वर्ष संपायला अवघे दोन महिने उरले आहेत, त्याअनुषंगाने राज्य शासनाने दिलेली विविध उद्दीष्टे पूर्ण करण्यावर भर राहील, केंद्र सरकारच्या त्याचबरोबर राज्य शासनाच्या फ्लॅक्सीप योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी प्रयत्नशील राहील.
जिल्ह्यातील भूसंपादन विषयक कामे सुरु आहेत ही कामे गतीने करण्याबरोबरच त्याचा मोबदला मिळवुन देणे यास प्राधान्य राहील. जिल्ह्यात पंढरपूर, अक्कलकोट यासारखी महत्वाची तीर्थक्षेत्रे असून त्यांचा नियोजनबध्द विकास आणखी गतीने व्हावा यासाठी प्रयत्न राहील. असे त्यांनी सांगितले.
समाजकल्याण विभागाच्या योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील असेही श्री. शंभरकर यांनी सांगितले. नियेाजन विकास आराखडा तयार करुन त्या माध्यमातून जिल्ह्याच्या विकासाला गती मिळेल यासाठीही प्राधान्य राहील. असे त्यांनी सांगितले.
यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख, क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंकुश चव्हाण, उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, शैलेश सुर्यवंशी, स्नेहल भोसले, उत्तम पाटील, जिल्हा माहिती अधिकारी रवींद्र राऊत, नगर प्रशासन अधिकारी पंकज जावळे, जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर आदी उपस्थित होते.
शंभरकर मूळचे चंद्रपुरचे असून त्यांचे शिक्षण नागपूर येथे झाले आहे. श्री. शंभरकर यांनी यापूर्वी मुंबई उपनगर येथे निवासी उपजिल्हाधिकारी, कोकण विभागीय आयुक्त कार्यालय, मुंबई महानगरपालिका, मंत्रालय येथे विविध पदावर काम केले आहे. पुण्यात ते समाज कल्याण आयुक्त म्हणून कार्यरत होते. त्यांची जिल्हाधिकारी म्हणून ही पहिलीच नियुक्ती आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज