मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
मंगळवेढा शहरातील चोखामेळा चौकात एका किराणा दुकानाजवळ एक २२ वर्षीय महिला आपल्या अॅक्टिवा गाडीवर थांबली असता चोरटयाने रोख रक्कम , मोबाईल असा पाच हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पर्समध्ये असताना ती पळवून नेल्याची घटना भर दुपारी एक वाजता घडली असून अज्ञात चोरटयाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
जाहिरातीसाठी संपर्क:7588214814
याबाबत अधिक माहिती अशी की , यातील फिर्यादी सविता निलेश खांडेकर या आपल्या होंडा कंपनीच्या स्कूटी नं . एम एच १३ डी . ई . २७७५ वरून चोखामेळा चौकातील कैलास दुकानाजवळ दि . २० च्या दुपारी १ . ०० वाजता थांबली असता अज्ञात चोरटयाने रोख दोन हजार रुपये , तीन हजार रुपयांचा मोबाईल असा मुद्देमाल फिर्यादीच्या संमतीवाचून लबाडीने चोरून नेला आहे . या प्रकरणी अज्ञात चोरटयाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलिस नाईक योगिराज खिलारे करीत आहेत .
दरम्यान , सोमवारी मंगळवेढयाचा आठवडी बाजार असल्यामुळे या दिवशी बाहेरील चोरटे मंगळवेढयात येवून प्रत्येक बाजार दिवशी हात साफ करून जात असल्याच्या यापुर्वी अनेक चोरीच्या घटना घडल्या आहेत . बाजारातून बाजारकरूंचे हातोहात चलाखीने मोबाईल तसेच बसस्थानकावरून महिला प्रवाशांच्या गळयातील मंगळसुत्र चोरण्याच्या घटना सातत्याने घडत असताना पोलिसांचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे .
आत्तापर्यंत पोलिसांना चोरीच्या घटनेतील एकही चोरटा जेरबंद करण्यात यश आले नसल्यामुळेच चोरटयांचे बळ वाढत असल्याने चोरीच्या घटनेत वाढ होत असल्याचे दिसून येत आहे . नव्याने दाखल झालेले पोलिस निरिक्षक जोतीराम गुंजवटे यांनी किमान बाजारदिवशी तरी साध्या गणवेशात पोलिसांची गस्त वाढवून होणाऱ्या चोऱ्यांना अटकाव करावा अशी मागणी होत आहे . बसस्थानकात सी . सी . टि . व्ही . कॅमेरे बसवले आहेत . मात्र चोऱ्यांच्या संख्येत वाढ होत असल्याचे दिसून येते आहे .

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज