मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
रंगभवन चौक परिसरात पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून तिघांनी एका तरूणाला बेदम मारहाण करून जखमी केले . ही घटना शनिवार दि . २५ जानेवारी रोजी घडली . विशाल विजय वडतिले ( वय १८ , रा . सिध्देश्वर पेठ , विजापूर वेस ) असे जखमीचे नाव आहे . हा घराकडे जात असताना अनोळखी तिघांनी त्याला अडवून , विश्वनाथ जाधव याच्याशी भांडण का करतो असे म्हणून बांबू आणि हॉकी स्टीकने मारहाण केली . त्यामध्ये डाव्या हाताला गंभीर जखम झाली , अशी फिर्याद विशाल वडतिले याने सदर बझार पोलीस ठाण्यात दिली त्यावरून पोलीसांनी अनोळखी तिघांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे .
बसस्थानकावर प्रवाशाचा मोबाईल लंपास
सोलापूर मध्यवर्ती बस स्थानकात एसटी बसमध्ये चढताना एका प्रवाशाचा खिशातील मोबाईल अज्ञात चोरट्याने चोरून नेला . ही घटना सोमवार दि . २७ जानेवारी रोजी सकाळी घडली . परसप्पा चंद्रकांत कोळी ( वय ३९ , रा . माळी लाईन मंद्रुप ता . दक्षिण ) हे पुण्याकडे जाण्यासाठी तुळजापूर – स्वागरगेट बसमध्ये चढत असताना त्यांच्या खिशातील सॅमसंग कंपनीचा ८ हजार रूपये किंमतीचा मोबाईल अज्ञात चोरटयाने चोरून नेला .
३८ हजाराच्या शेळ्या चोरीस
लक्ष्मी पेठ शेटे वस्ती परिसरात ३८ हजार रुपये किमतीच्या १६ शेळ्या आणि २ बोकड अज्ञात चोरट्याने चोरून नेले . ही घटना प्रजासत्ताक दिनाच्या पहाटे घडली . वसिम युसुफ कुणकी ( वय ३२ , रा . शेटे वस्ती लक्ष्मी पेठ ) यांनी त्यांच्या मालकीच्या पत्रा शेडमध्ये शेळ्या आणि बोकड ठेवले होते . त्यापैकी १६ शेळ्या आणि २ बोकड अज्ञात चोरट्याने चोरून नेले आणि ३८ हजाराचे नुकसान केले , अशी फिर्याद त्यांनी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात दिली . त्यावरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल केला .
शेतातील पाण्यावरून भावांमध्ये हाणामारी
हतूर गावात शेताला पाणी देण्याच्या कारणावरून दोघा भावाम ध्ये हाणामारी होऊन एक गंभीर जखमी झाला . ही घटना शनिवार दि . २५ जानेवारी रोजी घडली . काशिराम बनसिध्द वाघमोडे ( वय ४८ , रा . हत्तूरगांव , ता . दक्षिण ) असे जखमीचे नाव आहे . हे त्यांच्या शेतात बोअर चालू करून पाणी देत असताना त्यांचा लहान भाऊ सोमनाथ बनसिध्द वाघमोडे तेथे आला . तुझ्या शेताला पाणी देण्याचे बंद करून माझ्या शेताला पाणी दे असे म्हणून वाद घातला तसेच मारहाण केला त्यानंतर शेजारी पडलेल्या लोखंडी खोऱ्याने डोक्यात मारून जखमी केले , अशी फिर्याद वाघमोडे यांनी विजापूर नाका पोलीस ठाण्यात दिली .
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज